Saturday, July 26, 2014

धनगरांच्या आदिवासी असण्याचे पुरावे

#SanjaySonawani-

कोणता समाज आदिवासी आहे आणि कोणता नाहीहे ठरवण्यासाठी केंद्राने खालील ५ निकष ठरवलेले आहेत.

(a)Indications of primitive traits;
(b)Distinctive culture;
(c)Geographical isolation;
(d)Shyness of contact with the community at large; and
(e)Backwardness

यानुसार धनगर समाज आदिवासी आहे कि नाही हे ठरवता येईल.

अ. आदिक अंश असणे हा निकष आहे. धनगर समाज आदिम काळापासून मेंढपाळीचा निमभटका व्यवसाय करत आहे. धनगर हे आर्यपूर्व काळापासूनचे तोच व्यवसाय करत असलेली जमात आहेअसे इंथोव्हन व रसेलने नोंदवून ठेवले आहे. आजही धनगर बव्हंशी तोच व्यवसाय करतात. धनगर हा शब्दही "धनाचे आगर" या अर्थाने संस्कृतमधून निघाला नसून अनार्य भाषिक शब्द आहे असे इंथोवन नोंदवतो.

ब. वेगळी संस्कृती: धनगरांच्या धर्मपरंपरा व प्रथा स्वतंत्र असून बिरोबा, खंडोबाया त्यांच्याच लोकदेवता आहेत. भंडारा, तळी भरणे वगैरे प्रथा ते आदिमकाळापासून जपत आहेत. धनगरी ओव्या, गजानृत्य, सुंबरान हे त्यांचे स्वतंत्र संस्कृतिक आविष्कार आहेत.

क. नागर संस्कृतीपासून स्वतंत्र भौगोलिक अस्तित्व. धनगर हे स्वतंत्र वाड्यांत राहतात. गांवापासून हे वाडे दूर असतात. मेंढपाळीमुळे रानोमाळ, डोंगरकपा-यांत त्यांना नागर जीवनापासून दूर भटकावे/रहावे लागते.

ड. बुजरेपणा. आजही धनगर किती बुजरा असतो हे मी स्वत: पाहिले आहे. याला शतकानुशतके "मूक समाज"म्हणून ओळखले जाते. नागर जीवनापासून दूर व अलिप्त राहिल्याने त्याच्यात हे इतर आदिवासींप्रमाणेच गूणधर्म विकसीत झाले आहेत.

इ. मागासपणा: येथे कालेलकर आयोग काय म्हणतो हे त्यांच्याच शब्दांत वाचा. 7. We have inour Report, given a list of backward classes andput a star(*) against those communities which are extremely backward andare leading a sub-human existence (e.g. The Class of Shepherd Community i.e. Dhangar /Hatkar/Hatgar / Gadri /Gadaria / Kurmar /Mirdha / Bharwad (Sr.No.27 Vol II, pg 66) (Their condition is far from satisfactory (Vol I pg. 76-77) (Found inBombay, Hyderabad, Madhya Pradesh(Now Maharashtra, A.P., M.P. Gujarat)

उत्तर प्रदेश (अलाहाबाद) उच्च न्यायालय म्हनते, "Dhangar/Dhangad" is thus scheduled caste in Bihar, Uttar PradeshandWest Bengal whereas it is scheduled tribe in Madhya Pradesh and Maharashtra. As noted above, with regard to caste in Central India, North West India andBengal there has already been study by the renowned ethnographist and sociologists. The caste "Dhangar" is a recognised shepherd caste of Western India. Mr. R.V. Russell inthe Tribes andCastes of Central Provinces of India (Vol.I)

केंद्रीय मागासवर्ग आयोगाने ३ डिसेंबर २०१२ साली दिलेला हा निर्णय...
...Moreover theChief Secretary, Govt. of UP dated 21.10.2008 issued instructions to all the Collectors of UP that the Caste certificate in the name of (Dhangar) may be issued to the members of that community. Thus it is observed that only (Dhangar) in UP inhabitedandno community in the name of Dhangad is in existence.
Hence, this is neithera case of deletion or addition to the list. This is rathera matter of clarification resulting into replacement of an entry (with no inhabitants) by clarifying another entry(which is in practice).
Accordingly, it is decided that SC certificates can be
given only to „Dhangar‟ and not to „Dhangad‟ ((Action: SSW)

मला वाटते अधिक स्पष्टीकरणाची गरज नाही. वरील पाचही निकष धनगर समाज पूर्ण करत असल्याने त्यांना अनुसुचीत जमातींमद्ध्ये घेतलेले आहे, परंतू महाराष्ट्र सरकारने तशी दुरुस्ती करण्यासाठी कसलेही हालचाल केलेली नाही. आता त्याला आदिवासीविरुद्ध धनगर असे रूप देवून मुळ विषय भरकटवण्याचे घाणेरडे राजकारण खेळले जात आहे. बेशरमीचा कळस काय असतो हे पाहून खेदवाटतो. या देशातशोषकांनाच शोषितम्हतले जाते पण ख-या शोषित-वंचितांना न्याय मिळत नाही हे दुर्दैव आहे. खेद वाटतो.

0 comments: