Thursday, July 17, 2014
धनगर आरक्षण संघर्ष यात्रा - २१ जूलै चलो बारामती
१७ जुलै २०१४
"फिटे अंधाराचे जाळे झाले होत आहे मोकळे आकाश"
आज यात्रेचा तिसरा दिवस >>
आज सर्णव राज्यातील लोकांचा प्रतिसाद यात्रेला मिळू लागलाय या पदयात्रेतील आनेक संस्था ,संघटना ,पक्षाचे नेते कार्यकर्ते सर्व गटातटाचे भेद विसरून " धनगर सारा एक " ही मानसिकता त्यांच्या सहवासातुन आज साकारली .सर्व राज्यभर झालेल्या फोन संपर्कामूळे नागपुर चंद्रपुरपासून समाज बांधव एक दिवस आगोदरच यात्रेकड़े येत आहेत
आज यात्रेत किती तरी चांगल्या गोष्टी घडल्या .
यात्रामार्गाच्या वळणावळणावर फटाक्याच्या आतिषबाजीत ढोलाच्या गजरात यात्रेच स्वागत पँकबंद पाणी बाटल्या ,नाष्टा देऊन प्रेमाने विसाव्याचा आग्रह करत होते.
हळूहळू संघर्ष यात्रेच रुपांतर महायात्रेच्या दिशेन आपल्या सर्वांच्या सहकार्यान होत आहे .
अकलूज शहरात यात्रेच स्वागत अभूतपूर्व जल्लोषात झाल सर्व धनगर पक्षीय भेद विसरून भंडारयाची उधळण करत ढोलाचे निनादात रंगले होते .सशक्त तरुणाच्या पलटणी गगनभेदी आरोळयानी आरक्षणाचा गजर करत होती . सर्व तरुण यात्रेत आनेकाना खांद्यावर घेउन लोक नाचले .महिलाशक्तीची लक्षणीय उपस्थिति हेही आजच विशिष्ट या मातृशक्तीच्या घोषणानी सर्वांच लक्ष वेधून घेतल सर्व रस्ते भांडारयानी भरले होते .
यात्रा सराटीच्या निरानदीच्या पुलावरून पुणे जिल्हात प्रवेशली तेव्हा इंदापुर तालुक्यातील सर्व मान्यवर समाज बांधव स्वागतासाठी सामोरे आले विशेष वेगळ म्हणजे आप्पासाहेब जगदाळे यानीही स्वागत केल.
इलेक्ट्रोनिक मिडियाने यात्रेत आज हाजेरी लावली .ढोलाच्या तालावर सुरु असलेल्या गजनृत्याचे पार्श्वभूमीवर तरुनांच्या गराड्यात अनेकांच्या मुलाखतीतुन आरक्षण मागणीचा आक्रोश रेकॉर्ड झाला. या मोकळया वातावरणात खुल्या चर्चा चलता चलता घडत होत्या .एकमेकाला मदत करणेच्या आनाभाका घेतल्या जात होत्या मुक्कामी चैतन्यमय वातावरणात बूंदीच्या गोड जेवणाचा अस्वाद दहा ते बारा हजार लोकानी घेतला या जेवणातील चपात्या घराघरातुन गोळा केल्या होत्या
हे जरी आसल तरी हे आपल्या लेकराबाळासाठी करतोय ६५ वश् आरक्षण नाही किती नुकसान झालय मोठया प्रभावासाठी लाखोची संख्या हवी हे विसरु नका
राज्यातील सर्व धनगर बांधवानी लाखोच्या संख्येने यात्रेत सहभागी व्हावे ही पुन्हा कळकळीची विनंती
विजय ग़. गावडे
पांडुरंगआन्ना मेरगल
( यात्रेतील बावड़ा ,शेटफळ मुक्कामावरून )
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment