Thursday, July 31, 2014

पुरके, मोघे, पिचड, वळवी हे घ्या पुरावे - भाग - 2

होमेश भुजाडे
-----------------------------------------------------------
६) GOVERNMENT OF INDIA REPORT OF THE Bakward Classes Commission Vol. ll ( lists) 1955 या शासनाच्या पुस्तकात अतिशय मागास म्हणून ' धनगर ' जमातीचा उल्लेख पृष्ठ क्र. ६६ वर करण्यात आलेला आहे. मग आजपर्यंत या मागास जमातीची शासनानने दखल का घेतली नाही ? शब्दछल करून ST च्या सवलतीपासून दूर का का ठेवले ?
७) DESCRIPTIVE ETHNOLOGY OF BENGAL - 1872 च्या या पस्तकात पृष्ठ क्रमांक २१५ वर ' ओरान ' या जमाती बद्दल माहिती दिलेली असून ती ' धनगर ' या जमातीची समकक्ष असणारी आणि या दोंन्ही जमाती डोंगर, द-या, खो-यात राहून पशुपालन करणारी जमात असल्याचे स्पष्टपणे नमुद केलेले
असतांना देखिल धनगरांना ST च्या सवलतीपासून आजपर्यंत शासनकर्त्यांनी जाणिवपूर्वक दूर का ठेवले. ?

८) Government of India Ministry of Planning Department of Statistics National Sample Survey Organisation या विभागाचे Joint Director श्री गंगाधरन यांनी प्रा. पी. एन. कोकणे ( आँल इंडिया धनगर समाज महासंघाचे सचीव) यांना लिहिलेल्या ६ सप्टेंबर १९८९ च्या पत्रामध्ये महाराष्ट्रातील ' धनगड 'चा समावेश 'धनगर 'आणि 'ओरान ' मध्ये असल्याचा आणि ह्या जमाती एकच असल्याचा तसेच त्या महाराष्ट्रात अनुसूचित जमातीत समावेश होत असल्याचे पत्रात स्पष्टपणे नमूद केलेले आहे .
तरी धनगरांना ST च्या सवलती महाराष्ट्र सरकार का नाकारत आहे ? विधीमंडळात ठराव परित करून केंद्र सरकारला पाठवून पाठपुराव करण्यात दिरंगाई का करत आहे ?

९) भारत का राजपत्र ( THE GAZETTE OF INDIA)
THE SCHEDULD CASTES AND SCHEDULED TRIBES ORDERS ( AMENDMENT) act, 2002 मध्ये असलेल्या नोंदी पुढील प्रमाणे आहेत.
१) पृष्ठ क्र. २१० वर ( c) in part lll Bihar मध्ये ( Vll) in entry 26 at the end insert "Dhangar ( Oraon) "
२) पृष्ठ क्र. २१२ वर ( k) in part Xll Orissa ( Xlll) in entry 53 , at the end, insert, " DHANGAR, URAN "
३) पृष्ठ क्र. २१३ वर (r) in part XXll - jharkhand ( Vll) in entry 25, at the end, insert " DHANGAR ( ORAON) "
वरील संदर्भावरून लक्षात येते की धनगर आणि ओरान या समकक्ष जमाती असून त्या एकच आहेत. यावरूनही हे सिद्ध होते की महाराष्ट्रातील धनगर हे ST च्या आरक्षणाचे हक्कदार असतांना देखील मराठावादी व मनुवादी प्रवृत्तिच्या राज्यकर्त्यांनी जाणीव पूर्वक टाळाटाळ केली व करत आहेत.

1 comments:

Smita System Solution said...

Dear respected bolg writter,
This is very great work.
we saluate your work about our samaj.
Thank you sir,
Regards,
sachin p malgunde
Director of company
smita systems solution,
pune,
cell no- 9175358072