Tuesday, July 8, 2014
मुंडे साहेब आणि जानकर साहेब
मा.महादेवजी जानकर हे साहेबांचे मानसपुत्र आहेत... त्यामुळे रा.स.प. चा प्रत्येक कार्यकर्ता व नेता हा वंजारी समाजासाठी कुटुंबातला घटक झाला आहे. साहेबांचे घर राष्ट्रवादीने फोडले तेव्हा जानकरांनी बहुजन समाजाची गरज म्हणून बीड जि.प. निवडणूकीत साहेबांचे काम करून समाजाची मोठी सहानुभूती मिळवली आहे. याची परतफेड म्हणून आ.पंकजाताईंनी बारामती मतदारसंघात झंझावात निर्माण करून सुप्रिया सुळे यांच्या वर मतदानासाठी रडण्याची व अजितदादावर मासाळवाडी गावात दमदाटी करण्याची वेळ आणली होती.
मा.जानकर साहेबांच्या व स्व.गोपीनाथराव मुंडेसाहेबांच्या या पॅटर्नचा धसका घेऊन नुकतेच झालेल्या राज्यपाल नियुक्त वि.प. आमदार निवडणूकीमध्ये काॅन्ग्रेस व राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी एक एक असे दोन आमदार धनगर समाजाचे दिले आहेत. आगामी काळात आ.पंकजाताईंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी चा नायनाट करण्यासाठी त्यांना गुरूबंधु मा. महादेव जानकर यांची समर्थ साथ लाभणार आहे हेही नक्की..
हे विचार अंबाजोगाई येतील प्रसिध्द डॉ .नितीनजी चाटे सर यांचे आहेत . आमचे दैवत मुंडे साहेब गेले जाता जाता वंजारी धनगर समाजाची वज्र मुठ बांधून गेले.
Labels:
गोपीनाथ मुंडे साहेब,
चळवळ,
मा. महादेव जानकर,
राजकीय.
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment