Showing posts with label आंदोलन. Show all posts
Showing posts with label आंदोलन. Show all posts

Thursday, September 4, 2014

चल उठ आणि लढायला सुरुवात कर...!

आज महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणावरुन बऱयाच मोठ्या प्रमाणात राजकीय गोंधळ चालु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मराठा आरक्षणाबाबत गंभीर नाही, असा समज झालेले आ. विनायक मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस साथ सोडुन महायुतीशी हात मिळवणी केली व पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणी वर आला. त्यामुऴे राष्ट्रवादी काँग्रेसला आपला घोषणापत्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा घ्यावा लागला. पण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजापेक्षा अत्यन्त बिकट स्थिती असणारे अनेक समाज अस्तित्वात

Saturday, August 9, 2014

धनगरानो षडयंत्र वेळीच ओळखा...

आजपर्यंत बारामती, इंदापूर, फलटण, सोलापूर जिल्हा, सांगली, नगर या पट्ट्यातील लोकानी पिढ्यानपिढ्या धनगर समाजाला ग्रुहित धरुन राजकारण केले. आज समाजाला जाणीव झाली कि हे राज्यकर्ते आपला वापर करुन घेताहेत. त्यातच आरक्षण प्रश्नावर सरकारने चालवली दिरंगाई ही धनगर समाजाच्या असंतोषात भर घालणारी ठरली. हा सरकारविरोधातला असंतोष आणि महादेव जानकर यांची महायुतीशी हातमिळवणी यामुळे हा समाज महायुतीकडे झुकला.

धनगरांचा ओढा महायुतीकडेच का ?

गेली पासष्ट वर्षे धनगर समाज आरक्षणाची मागणी करतोय. त्यांचा प्रश्न समजून न घेता राज्यकर्त्यानी धनगरांची क्रूर चेष्टा केली. केंद्रात आणि राज्यात अपवाद वगळता कोंग्रेस आणि मित्रपक्षांची सत्ता आहे. त्यांच्या नेत्याना भेटून धनगर समाज आपली आरक्षणाची मागणी पटवून देतोय. परंतू झोपेचं सोंग घेतलेल्या राज्य सरकारला धनगरांचा प्रश्न सोडवण्याची इच्छा नाही. राजीव गांधींपासून ते शरद पवारांपर्यंत सर्व लोकाना धनगरांची मागणी योग्य आहे हे माहित आहे. परंतू फक्त आश्वासन देण्यापलीकडे या नेत्यांकडून काहीच झाले नाही. 

हर्षवर्धन पाटलांवर शाई आणि अजितदादांची घाई

अजित पवार
धनगर आरक्षणाचे आंदोलन ऐन भरात असताना हर्षवर्धन पाटलांवर शाई फेकण्याचा दुर्दैवी प्रकार घडला. आरक्षण क्रुती समीती आणि सर्व समाजाने या घटनेबद्दल खेद व्यक्त केला. कोणतीही मागणी लोकशाही प्रक्रियेच्या चौकटीत राहूनच करावी. त्यासाठी अर्ज-विनंत्या, मोर्चे, सभा हे मार्ग आहेतच. सरकारी, सामाजिक मालमत्तेचे नुकसान करणे, एखाद्या व्यक्तीला इजा पोहचवणे अशा प्रकारचे आंदोलन चुकीचे आहे. त्यामुळे सदर घटनेचा निषेध केलाच पाहिजे.

Monday, August 4, 2014

या सरकारच डोक तरी ठिकाणावर आहे का ?


विजय गावडे, अभ्यासक आणि विचारवंत.
------------------------------------
परवा रविवारच्या पूण्यनगरीच्या मुलाखतीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ST मध्ये धनगर समाजाचा समावेश अस म्हणत आहेत ?

आहो आमचा समावेश 1950 च्या प्रेसिड़ेंशीअल ऑर्डरने झालेलाच आहे .काका कालेलकर आयोगाने सात क्रमांकचे परीच्छेदात केला आहे .आस आसताना आता तुम्ही पुन्हा कसला समावेश करताय ?

धनगर बांधवांसाठी अतिशय महत्वाची सुचना


निर्लज्ज सरकार तिसरी सुची आपले धनगरांचे माथ्यावर मारण्याच्या पुर्ण तयारीमधे कामे चालु आहेत, बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले धनगर आरक्षण एस.टी.चे आहे आणी एस.टी.चेच आरक्षण आमला घ्यायचे आहे!
35 जिल्हयाचे प्रतिनीधी हजारोंच्या संख्येने मुंबई मध्ये 5 आँगस्ट रोजी सकाळी10-30 वाजता आझाद मैदान मुंबई येथे पोहचत आहेत.