Monday, July 14, 2014
आरक्षण संघर्ष पदयात्रा
बरी आर्थिकस्थिति आसणारे धनगर बांधव जागे झाले आहेत आता प्रश्न नक्की सुटेल .कारण त्याना सधन नव्हे पण बरी आर्थिक परिस्थिति असलेमुळे तसा हतावरील पोटाचा प्रश्न नाही .ईथ पर्यंतच आंदोलन हातावरील पोट आसणारया जंगल दरयाखोर्या ,माळरानावरील वर्गाने प्रवाहाचे विरोधी पाहून चालवले आहे .
कोणताही प्रश्न वा सामाजिक आव्हान बुध्दि, विवेक वा सारासार विचार न करता रगित सर्व जिरवण्याची मराठा समाजाची सवय लागलेला धनगर समाजातील अन्न वस्त्र निवारा या मुलभुत गरजा संपलेले बरी आर्थिक परिस्थिति असलेला वर्ग हा समान आवडीमुळे
राष्ट्रवादी पक्षाबरोबर आज अखेर राहिला आहे .
अनिष्ट रुढी परंपरा ना मुठमाती देऊन जग ज्या गतीने विकासाचे दिशेने जाते आहे हे ओळखून त्या दिशेने हा वर्ग हा "पंढरपुर ते बारामती संघर्ष पदयात्राचे पाऊल " सोडले तर कधीच आला नाही .असेल तर जरुर सांगाव
मराठा समाजाप्रमाणे संख्याबळाचे जोरावर त्यांचीच नक्कल हा वर्ग करत राहिला आहे . कुस्ती हिच एकमेव कला शैक्षणिक सांस्कृतिक वा कलाक्रीडा क्षेत्रात आपण कुठे आहोत याचा विचात या वर्गाने आजखेर केला नाही . मोठा आर्थिक मिळकतीच्या उसशेतीला यानी बांधून घेतले व त्यामुळे ज्ञानप्राप्ती करून बुध्दिजीवी होणेचा प्रयत्नच केला नाही . त्यामूळे असे का ? कुणी ? कधी ? कसे ?कुणासाठी ? ही क़ ची बाराखडी यानी कधी वापरलीच नाही . सरपंच वा चेअरमनचे पुढे फार फार तर सभापति वा जिल्हा परिषद अध्यक्ष पदापुढे जाणार नाहित हे जाणीवपूर्वक ठेवणेच षडयंत्र मा. महादेव जानकर सोडले तर या भागातील कोणताच नेता ओळखु शकला नाही हे धनगर समाजाचे दुर्दैव दुसर काय ?
राजकारणात सगळे निर्णय वाड्यावरूनच होत आसलेमुळे व उच्च शिक्षणाची कधीच कास न धरलेमुळे नेते जे जे सांगतील तीच पूर्वदिशा तेच आपले पांडुरंग हीच धारणा आजअखेर राहिली .कोल्हापुर सांगलीतील तालमीतली मूल तिथल्या नेत्यानी धाकदपटशाही मराठा समाजाचे वर्चस्ववादी राजकारणासाठीच वापरली कारण मा .आ ह साळुंखे यानी म्हटले प्रमाणे "आमच्या धडावर आमचे डोके कधीच नव्हते "
लोकप्रतिनिधी वा डायरेक्टर म्हणजे भट्टीची पांढरी कपड़े घालून मीटिंगमधल्या चाय बिस्कुटावरील "सालगडी " च होते .स्वत:चे घरासमोरील गटारदेखिल बंगल्यावरून ईशारा झालेनंतरच ठरावात घातली जाते हे सर्व जनतेला आता कळू लागलय. राजकारणात शरद पवारांना देतो तो देव या न्यायाने वैयक्तीक लाभ व खोटया प्रतिष्टेसाठी या आमच्या भावंडाना पध्दतशीरपणे षढ़यंत्राने गुंतवले आहे .ते त्यामुळे आजअखेर शरद पवारांना देव मानत आले आहेत.आपलच ST गाडीत पाकिट मारून हे टिकिट काढत आले आहेत हे आता कुठे कळू लागले म्हणायचे .
धनगर समाजाची मोठी मतदार संख्या त्यामुळे "आपली मत आपला माणूस " हां नियम मतदान करताना आपण लावतो पण खरच हा आपला माणूस आसतो का ?
त्याचे नाकातील कॉंग्रेस वा राष्ट्रवादी या नावाची वर्चस्ववादी मुजोर लोकानी घातलेली नाकातली वेसन आपल्याला खरेच दिसत नाही का ?
या निवडून आलेल्या आपल्या माणसाला लोकशाही पध्दतीने स्वत: निर्णय घेउन पै खर्च करणेचा तरी हक्क असतो का ?
हीच माणस आपण अपक्ष वा राष्ट्रिय समाज पक्षासारखे मुजोर वर्चस्ववादी नव्हे तर बुध्दिजीवी पक्षाची माणस सोलापुर जिल्हा परिषदेत निवडून पाठवली तर आपण आपली काम आपल्याच ताकदीवर करू शकतो कारण आपण ठामपणे जिल्हा परिषद सभागृहात सुशीलकुमार शिंदेना ठामपणे म्हणु शकतो " मोहिते पाटिल आम्ही पाठिंबा दिला तर हि १५ आमची कामे करणार आहेत बोला आम्ही पाठिंबा दिला तर तुम्ही आमची किती कामे मंजूर करणार ?
जर या दोघात समान सदस्य संख्या निवडून आल्या असतील तर तुम्हीच ऐकीच्या बळावर अध्यक्ष पद सहज स्वाभिमानाने मिळवाल लाचारीची गरजच नाही
पुन्हा एकदा धनगर समाजासाठी तुम्ही स्वत: साधन असून देखिल गरीब जंगल माळरानावरील धनगर समाजाला डोळयासमोर ठेउन १५ ते २१ जुलैची संघर्ष पदयात्रा " देता की जाता " हा जाब विचारणेसाठी काढत आहात त्याबद्दल महाराष्ट्रातील समस्त धनगर समाजाचे वतीने लाख लाख धन्यवाद !
तुमचे आन्न वस्त्र निवारा हे आर्थिक प्रश्न उस वा बागायती शेतीमुळे संपले असताना आपल्या दुःखी कष्टी शोषित भावासाठी "देता की जाता " हा जाब आपण विचारत आहात हा खरे तर उपकारकच आहे .कारण आम्हाला भाकरीमागेच यानी लावले असलेमुळे समाजातील मोठा वर्ग रोजीरोटीत अडकलाय .त्यामुळे तुम्हाला कदाचित कमी उपस्थिति दिसली तरी नाराज होऊ नका कारण बारामती, माढा प्रमाणे गुप्त मतदान पध्दतीने ओबीसी ,मागासवर्गीय व राजकीय उपेक्षित वरिष्ट जाती ज्या महाराष्ट्रात 75% आहेत त्याही या 25 % लोकसंख्या असुनही 60 ते 70 % सत्तेची निर्णय घेणेची पदे या जिरवणेच्या रगेल असनारया टग्यानी काबिज केली आहेत . सर्व लोक टगेशाहिला कंटाळले आहेत कारण 80 % दलितावरील अत्याचार या मुजोर वृत्तीनेच ग्रामीण वा शहरी भागात घडवले आहेत .त्यामूळे राज्यात सत्ता परिवर्तन अटळ आहे . .आपले लोक आमदार खासदार झाले पाहिजेत .भोजन पंक्तित वाढणारे वाढ्पी वरील प्रमाणे स्वयंभू स्वाभमानी सर्व जातीधर्मियाना सोबत घेउन जाणरे हवेत .
धनगर आरक्षण आता नक्की मिळेल असे मी म्हणालो कारण मा. पंतप्रधान मोदिनी तुम्हा सर्वांच्या साक्षीने हा विषय मांडलाय ,मा.देवेन्द्र फाडणवीस व सेनेचे सुभाष देसाई यानी लेखी आश्वासन दिलय,महायुती जाहिरनाम्यात आलेल आहे.
परवा ओरिसाहुन निवडून येत असलेले बाजपेयी व सध्या मोदी सरकारमध्ये आदिवासी मंत्री असलेले मा.ज्युवेल ओरान यानी व मा. नितिन गडकरी यानी हा विषय लवकरात लवकर सोडवणेचे प्रयत्न सुरु केलेत कारण त्यांचेसमोर आमच्या शिष्टमंडळाने खालील मुद्दे ठेवलेत >>>>
साधा विचार करा आगदी आमचे मा. महादेव जानकरसाहेब जरी घटना समिति सदस्य असते तरी भारतीय घटनेच्या हिंदी भाषेतील प्रतीत जस ओरिसाच ओडिसा लिहल जात तस धनगरच धनगड असच लिहाव लागल असत हे हे महाराष्ट्रातले राज्यकर्ते का विसरतात .धनगड या नावाची महाराष्ट्रच नव्हे तर जगात जात नाही .मग १९५६ पासून धनगड आरक्षण कसे ? आपण ज्याला देव मानलय त्यानी का समजुन घेतल नाही ?
आपण शिक्षणाला महत्व न दिल्यामूळे कळलच नाही
हां प्रश्न" ड चा र करणे चा नाही " समाविष्ट करणेचाही नाही केवळ भारतीय घटनेप्रमाणे धनगर समाजास आदिवासी सवलतिंची अंमलबजावणी करणेचाच आहे कुणी कहिहि सांगो ,बुध्दिभेद करून घेऊ नका ही नम्र विनंती
तुम्ही तालुक्याचे नावाने छावनी नव्हे तर दिंडी घेउन चालला आहात .खर तर तो बारामतीचा देव मागेच विसर्जित करायला हवा होता .
नेहमी दिंडी कोठे जाते हे तुम्हाला माहीत आहे .त्यामूळेच "देता क़ी जाता "हा जाब ही दिंडी बारामतीकराना विचारणार की नाही ही शंका काही जणांच्या मनात आहे यावर आवश्य विचार व्हावा .
भारतीय धनगर परिषद धनगर समाजाचे हितासाठी आवाज देनारया प्रत्येक नेत्याच्या पाठीशी आहे. जो पर्यंत वैयक्तिक स्वार्था पोटी समाज हिताचा बळी दिला जाणार नाहीत तो पर्यंत नक्की आमची ताकद आशा प्रश्नासाठी पाठीशी असेल .
विजय ग.गावडे ,महासचिव , भारतीय धनगर परिषद
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment