Showing posts with label आरक्षण. Show all posts
Showing posts with label आरक्षण. Show all posts

Thursday, September 11, 2014

घोळ धनगर, धनगड, धांगड चा....

धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत असूनही शासन या मुद्द्यावर अक्षम्य उदासीनता दाखवत आहे. धनगर समाजाने अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अमलबजावणी शासनाने त्वरीत करावी म्हणून दोन महिने जोरदार आंदोलन छेडले. परंतु झोपेचे सोंग घेतलेले सरकार आणि संबंधित यंत्रणा धनगर समाजाला घटनात्मक सवलतींपासून वंचित ठेवण्याचे पातक करीत आहेत. धनगर आरक्षणाबाबत अनुसूचित जमाती मंत्रालयाला माहितीच्या अधिकाराखाली काही प्रश्न विचारले. धनगर समाजाचा समावेश महाराष्ट्रात अनुसूचित जमातीत आहे का असे विचारले असता,

Tuesday, September 9, 2014

महादेव जानकर ! एक खडतर, तरीही “यशस्वी” प्रवास

माणूस कोठे पोहोचला, या पेक्षा तो कोठुन कोठे पोहोचला यावरून त्याला यशस्वी ठरविले पाहिजे, असे कोण्या एका विचारवंताने म्हटले आहे. राजाचा मुलगा जन्मताच राजपुत्र बनतो., नंतर तो राजा बनतो. एखादा दिल्लीस एका तासात पोहोचतो कारण तो जवळच आग्र्याला रहात असतो. परंतु दूर दक्षिणेत, सातार्याच्या रानमाळावर जन्म घेणारा जेंव्हा दिल्लीची वाट चालू लागतो, तेव्हा तो दिल्लीत पोहोचला की नाही या पेक्षा आता तो कोठे पोहोचला, यावरून त्याच्या यश-अपयशाचे मोजमाप केले जावे. वरील विचारवंताच्या म्हणण्याचा तोच मतितार्थ आहे.

Thursday, September 4, 2014

धनगरांच्या कुंडलीतला "ड"!

धनगर समाजाला आपला हक्क मिळायलाच हवा
-राजा मइंद, कार्यकारी संपादक, अपाविमं

प्रश्न कुजवत ठेवण्याच्या बाबतीत महाराष्ट्रातील सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा हात कोणीच धरू शकणार नाही. गेल्या १५ वर्षांच्या सत्ताकाळात त्यांनी याची अनेक उदाहरणे घालून दिली आहेत. मराठा आरक्षण हे त्यातीलच एक उदाहरण. मोठा झटका बसल्यानंतर त्यांनी मराठा आरक्षण मार्गी लावले. हे करताना त्यांनी मुस्लिम आरक्षणाचे घोडे मध्ये दामटवलेच. (आता ही दोन्ही आरक्षणे कोर्टात टिकतात किंवा कसे याबाबत खात्री नाही.) मराठा आरक्षणाच्याही

Wednesday, September 3, 2014

राजकीय स्वार्थासाठी धनगर समाजाच्या आरक्षणाचे राजकारण

एखाद्या इमानदार जमातीला चोर संबोधने किंवा रक्ताची गंगा वाहली तरी चालेल पण एखाद्या अत्यंत मागास असणाऱ्या समाजाला आरक्षन मिळु देणार नाही, अश्या प्रकारची वक्तव्य राज्य शासनाच्या महत्वाच्या पदावर असणाऱ्या एखाद्या नेत्याने करणे हे कितपत योग्य आहे?  हा एक जनसामान्यात चर्चेचा विषय ठरलेला आहे. परंतु असाच काही प्रकार साधुसंताच्या चरणांच्या

Friday, August 29, 2014

होमेश भुजाडे यांचे मुख्यमंञ्यांना खुले पत्र-1

पृथ्वीराज चव्हाण

प्रति,

मान. मुख्यमंत्री,
पृथ्वीराज चव्हाण साहेब,
मुंबई (महाराष्ट्र राज्य).

प्रिय महोदय ,

आपणास होमेश भुजाडे यांचा जय अहिल्याई ! जय मल्हार !! वि. वि.

गेल्या दीड - दोन महिन्यापासून धनगर जमातीचे अनूसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहे. त्या अनुषंगाने योग्य ते सर्व पूरावे आपल्या सुपूर्द करण्यात आलेत . तरी सुद्धा आपण

Sunday, August 17, 2014

मा. शरद पवार ( राष्ट्रिय अध्यक्ष राष्ट्रवादी पार्टी ) यांना पत्र


शरद पवार
माननीय शरद्चंद्रजी पवार यांना होमेश भुजाडे यांचा सप्रेम जय मल्हार वि. वि.


अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून धनगर समाजाचे महाराष्ट्रात राज्यव्यापी आंदोलन प्रचंड ताकदिनीशी सुरू आहे.
धनगड - धनगर एकच असून त्यांना संविधानाप्रमाणे आरक्षण मिळावे यासाठी अनेकदा आंदोलनं झालित. ही मागणी काही नविन नाही. धनगर जमातीवर गेली ६४ वर्षे झालेला अन्याय व या जमातीचे एवढी वर्षे झालेले सर्वांगिण नूकसान भरून न निघणारे आहे.

Sunday, August 10, 2014

महाराष्ट्रातील धनगरांच्या राजकीय अस्मितेचा खून कोणी केला ?

अजित पवार 
गेली दिड महिने लोकशाही मार्गानेच धनगरांचे ST आरक्षण अम्मलबजावणी करण्यासंबंधीचे आंदोलन सुरू आहे. काही तुरळक प्रकार सोडले तर हे आंदोलन अत्यंत संयमाने ,शांततेने व अहिंसक मार्गानेच सूरू आहे. या आंदोलनाचा कोणीही पूढारी नाही.गाव, जिल्हा, तालूका व शहरी स्तरावर सुरू असलेले हे आंदोलन त्या त्या भागातील तरूण व वृद्धांनी स्वयंस्पृर्तीने सुरू केलेले आहे. आंदोलना संबधी कोणत्यातरी पुढा-यांनी त्यांना सांगितले म्हणून केले असे मूळीच नाही. म्हणूनच हे जन आंदोलन ठरलेले आहे. नेत्यांच्या पुढाकाराशिवाय आंदोलन होऊच शकत नाही हा आतापर्यंतचा समज धनगरांच्या या आंदोलनाने खोटा ठरविलेला आहे.

Saturday, August 9, 2014

धनगरानो षडयंत्र वेळीच ओळखा...

आजपर्यंत बारामती, इंदापूर, फलटण, सोलापूर जिल्हा, सांगली, नगर या पट्ट्यातील लोकानी पिढ्यानपिढ्या धनगर समाजाला ग्रुहित धरुन राजकारण केले. आज समाजाला जाणीव झाली कि हे राज्यकर्ते आपला वापर करुन घेताहेत. त्यातच आरक्षण प्रश्नावर सरकारने चालवली दिरंगाई ही धनगर समाजाच्या असंतोषात भर घालणारी ठरली. हा सरकारविरोधातला असंतोष आणि महादेव जानकर यांची महायुतीशी हातमिळवणी यामुळे हा समाज महायुतीकडे झुकला.

Wednesday, August 6, 2014

धनगराना आरक्षण नाकारणे हा राज्यघटनेशी द्रोह

6 ऑगस्टच्या लोकसत्तामध्ये सुशिम कांबळे यांचे धनगर आरक्षणाविषयी पत्र वाचले. अनुसूचित जमातीत समावेश असणार्या धनगरसद्रुश्य जमातींची यादी देवुन यात धनगर किंवा धनगड या शब्दांचा उल्लेख नाही असे ते म्हणतात. याबाबत अनु. जमाती मंत्रालयाच्या 2008-09 च्या वार्षिक अहवालातील अनु. जमातीची इंग्रजी यादी पाहू. छत्तीसगढ-(33) oran, dhanka, dhangad, गुजरात-(24) rabari, हिमाचलप्रदेश-(2) gaddi,

Monday, August 4, 2014

या सरकारच डोक तरी ठिकाणावर आहे का ?


विजय गावडे, अभ्यासक आणि विचारवंत.
------------------------------------
परवा रविवारच्या पूण्यनगरीच्या मुलाखतीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ST मध्ये धनगर समाजाचा समावेश अस म्हणत आहेत ?

आहो आमचा समावेश 1950 च्या प्रेसिड़ेंशीअल ऑर्डरने झालेलाच आहे .काका कालेलकर आयोगाने सात क्रमांकचे परीच्छेदात केला आहे .आस आसताना आता तुम्ही पुन्हा कसला समावेश करताय ?

Tuesday, July 29, 2014

पुरके -मोघे -पिचड -वळवी हे घ्या पुरावे

Prof. Homesh Bhujade

Homesh Bhujade, Writer & Social activists.

१) पहिल्या मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष काकासाहेब कालेलकर यांच्या अहवालानुसार धनगड व धनगर एकच असल्याचे नोंदवलेले आहे. धनगर हे अतिमागास असून त्यांना आदिवासीच संबोधलेले आहे.
केंद्र सरकारने OBC करिता जरी हा आयोग स्विकारलेला नसला तरी SC व ST च्या अनुषंगाने सुचवलेल्या शिफारशी व दुरूस्त्या मात्र स्विकारलेल्या आहेत. मग धनगरांना ST चे आरक्षण का नाकारले जाते ?

२) केद्र सरकारने डी. पी मंडल आयोग देशातील मागास जाती जमातीची पाहणी करण्यासाठी नेमलेला होता. त्या आयोगाने महाराष्ट्रातील सर्व भागात दौरे करून धनगर जमातीची पाहणी केली. तेव्हा त्यांनी 'धनगर ' व 'धनगड' या दोंन्ही जमाती वेगवेगळ्या नसून एकच असल्याचे अहवालात नोंदवलेले आहे.
या संदर्भात महाराष्ट्राच्या विधानसभेत चिमणराव कदम यांनी वरिल विषयाच्या अनुषंगाने ८ एप्रील १९८२ रोजी सभागृहात प्रश्न सुद्धा उपस्थीत केलेला होता. 

धनगर आरक्षणाची मागणी घटनात्मक

सध्या धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यासाठी या समाजाने मोठे आंदोलन छेडले आहे. धनगरांचा st प्रवर्गात समावेश करण्यास आदिवासी नेत्यांचा विरोध आहे. धनगर हे आदिवासी नाहीत आणि st प्रवर्गातील धनगड जमातीशी धनगरांचा काही संबंध नसल्याचा दावा त्यानी केला आहे. मुळात रसेल, बेंथोवेन, गुंथन सोंथायमर, इरावती कर्वे या मानववंशशास्त्रद्न्य/समाजशास्त्रद्न्य यानी सप्रमाण दाखवुन दिले आहे कि धनगर हे आदिवासीच आहेत. धनगराना आदिवासींप्रमाणे स्वत:ची अशी वैशिष्ट्यपूर्ण संस्क्रुती आहे. डोक्याला पागोटे, अंगात बंडी, लंगोट असा धनगरांचा पारंपरिक वेष आहे. धनगरांचे गजी न्रुत्य, ढोल, कैताळ, धनगरी ओवी अशी स्वतंत्र

Monday, July 28, 2014

आदिवासी नेत्यांच्या प्रश्नाना उत्तरे

होमेश भुजाडे सर 
विचारवंत आणि लेखक 

सर्वप्रथम ST च्या आरक्षणाच्या अम्मलबजावणीसाठी महाराष्ट्रभर जन आंदोलन उभे करणा-या माझ्या समस्त सर्वसामान्य बंधू - भगिनीचे अभिनंदन !
तद्वतच मानवतावादी दृष्टीकोन ठेऊन धनगरांसह तत्सम जमातींना ST च्या आरक्षणाच्या सवलती लागू व्हाव्यात म्हणून पुण्यात गेली दोन दिवस उपोषणाला बसून नुकतेच उपोषण मागे घेणारे प्रसिद्ध साहित्यिक सन्माननिय संजयजी सोनवणी सर यांचे शतशः ऋणानुभार ....
आदिवासीचे नेते म्हणून मिरवणा-यांच्या प्रश्नास उत्तर
---------------------------------------------

Saturday, July 26, 2014

धनगरांच्या आदिवासी असण्याचे पुरावे

#SanjaySonawani-

कोणता समाज आदिवासी आहे आणि कोणता नाहीहे ठरवण्यासाठी केंद्राने खालील ५ निकष ठरवलेले आहेत.

(a)Indications of primitive traits;
(b)Distinctive culture;
(c)Geographical isolation;
(d)Shyness of contact with the community at large; and
(e)Backwardness

यानुसार धनगर समाज आदिवासी आहे कि नाही हे ठरवता येईल.

Thursday, July 17, 2014

धनगर आरक्षण संघर्ष यात्रा - २१ जूलै चलो बारामती

१७ जुलै २०१४
"फिटे अंधाराचे जाळे झाले होत आहे  मोकळे आकाश"
आज यात्रेचा तिसरा दिवस >>
आज सर्णव राज्यातील लोकांचा प्रतिसाद यात्रेला मिळू लागलाय  या पदयात्रेतील आनेक  संस्था ,संघटना ,पक्षाचे नेते  कार्यकर्ते सर्व गटातटाचे भेद विसरून " धनगर सारा एक " ही  मानसिकता त्यांच्या  सहवासातुन आज साकारली .सर्व राज्यभर झालेल्या फोन संपर्कामूळे नागपुर चंद्रपुरपासून समाज बांधव एक दिवस आगोदरच यात्रेकड़े येत आहेत 

Monday, July 14, 2014

आरक्षण संघर्ष पदयात्रा


बरी आर्थिकस्थिति आसणारे धनगर बांधव जागे झाले आहेत आता प्रश्न नक्की सुटेल .कारण त्याना सधन नव्हे पण बरी आर्थिक परिस्थिति असलेमुळे तसा हतावरील पोटाचा प्रश्न नाही .ईथ पर्यंतच आंदोलन हातावरील पोट आसणारया जंगल दरयाखोर्या ,माळरानावरील वर्गाने प्रवाहाचे विरोधी पाहून चालवले आहे .