Tuesday, July 8, 2014

धनगरांचे अनुसुचित जमातींचे आरक्षण तांत्रिक चुकीने नाकारले गेले

संजय सोनवणी नांदेड येथील कार्यक्रमात बोलताना
१. धनगरांचे अनुसुचित जमातींचे आरक्षण तांत्रिक चुकीने नाकारले गेले आहे. ते कायदेशीर लढ्याने प्राप्त करून घेता येईल.

२. धनगर समाजाचा विखुरलेपणामुळे राजकीय दबावगट नाही. त्यामुळे कोणतेही सामाजिक प्रश्न सोडवून घेता येत नाहीत. महाराष्ट्रातील सर्वच धनगर समाजात परस्पर संपर्क आणि वैचारिक देवाणघेवाणीची गरज आहे.



३. आरक्षण मिळाले तरी त्याचा लाभ सर्वात आधी आजही जे भटकी मेंढपाळी करत आहेत त्यांना त्याचा सर्वात आधी लाभ झाला पाहिजे.

४. आरक्षणावर दिर्घकाळ अवलंबून राहता येणार नाही, त्यामुळे सहकाराचे वेगळे प्रारुप पुढे आणत धनगर समाजाने अर्थसत्तेच्या दिशेने वाटचाल करायला हवी, तसेच तरुणांना कला, विशेष-ज्ञानात्मक शाखा आणि व्यवसायांत पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

५. देशभरातील धनगर स्थानिक भाषाभेदांमुळे वेगवेगळ्या नांवांनी ओळखला जात असला तरी "धनगर सारा एक" हेच ध्येय घेत सर्वांनी एक व्हायला पाहिजे. महाराष्ट्रातील पोटशाखा एकदाच्या विसर्जित करून टाकल्या पाहिजेत.

नांदेड येथे धनगर समाज आरक्षण हक्क परिषदेत बोलतांना मी. प्रसिद्ध कवि आणि धडाडीचे युवा विचारक डा. यशपाल भिंगे संयोजक होते. डा. शिवाजी दळणर यांचेही अत्यंत अंतर्मूख करणारे भाषण झाले. अध्यक्षस्थानी विधीज्ञ शिवाजी हाके होते तर
तानाजी चिखले (अतिरिक्त पोलीस अधीक्षक, नांदेड), श्रीनिवास मस्के, मारुती चिंतणे,  प्रकाश खाडे ई. मान्यवरांची उपस्थिती होती.

Sanjay Sonawani

0 comments: