Saturday, July 26, 2014

धनगर आरक्षण संघर्ष आणि छुपे विरोधक

धनगर समाजाला भारतीय घटनेने दिलेले आदिवासी हक्क हे राज्यकर्ते मागील 1956 सालापासून धनगर
समाजाला नाकारत आले आहेत . प्रारंभी धनगर समाजाचे नावच हिंदी उच्चाराप्रमाणे धनगड असे आले
आहे ते यानी नाकारले .त्याच वेळी खालच्या वर्गाला आरक्षण असते तुम्ही कशाला मागता राव ? असा बुध्दिभेद केल्यामूळे 1960 ते 1970 चे काळात आशी मागणी करणारे डॉ. शेबडे यांना समाजाचा रोष सहन
करावा लागला .मात्र 1968 साली वकील झालेले अँड.गुंड़ेराव बनसोडे यानी कायदेशीररित्या ST
समावेश धनगर बांधवाना डॉ. शेबडे यांच्यासह प्रभुजी कोकणे, अघडतेगुरूजी समजाऊ लागले .तेव्हा लोक समजू लागले पण राज्यकर्ते बुध्दिभेद करतच होते .
त्यामुळे ST मध्ये समावेश करा ही मागणी (समावेश
असुनही )समाजात मर्जीतले पुढारी द्य्य्म पदे देऊन उभे करून त्यांचेकडून ही चुकीची मागणी रेटली जात
होती . Read more 


1977 साली वसंतदादा पाटिल यानी केंद्राकड़े शिफारस केली. यामूळे यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र शरद पवार यानी ते सरकार पाडले असणेची शक्यता आहे
अशी चर्चा सर्वत्र दबक्या आवाजात ऐकली जात होती असे अनेक जानकार आज बोलतात त्यामुळेच अनेक आमदार फुटले .पुलोद सरकार आले . ही शिफारस
मागे घेतली गेली .गुंडेराव बनसोडे मराठवाडा ,येडतकर गुरूजी,अघड़तेगुरुजी आम. अनंतकुमार पाटिल विदर्भ
रामभाऊ आखाडे कोकण ,शिवाजीरावबापू शेंडगे, काकासाहेब थोरात बी के पडळकर, आन्नासाहेब डांगे गणतराव देशमुख डॉ शेबंडे हे जागरण करत होते
1989 साली प्रचंड मोठा मोर्चा नागपुर विधानसभेवर
धडकला ST आरक्षणाची मागणी करणारा हा प्रचंड
मोर्चा पाहूनच राज्यकर्ते गर्भगळीत झाले. ST आरक्षण हां विषय धनगराना राजकीय आरक्षण देणारा आसलेमुळे सर्व राजकीय नेते चिंताग्रस्त होते .
सांगलीमध्ये धनगर मेळावा घेउन NT या प्रवार्गात धनगर
समाजाचा समावेश मा. शिवाजीबापू शेंडगे यांचे प्रयत्नाने शरद पवार यानी केला ही घोषणा राजीव
गांधीनी केली त्यावेळी स्वयंसेवक म्हणून मी काम केले आहे.

ST ऐवजी NT मिळाल " जायच होत देवाच्या आळंदीला पण पोहचवल चोराच्या आळंदीला "
आशी बुध्दिजीवीवर्गाची भावना सर्वत्र झाली .राजकीय आरक्षण न देता प्रश्न सोडवला हा फार मोठा शरद
पवारांचा विजय होता .आनेक धनगर घराणी पवाराना देव मानु लागली .

माझ्यामते मा. शिवाजीबापू शेडंगे व सहकारी बरोबर होते कारण राजकारणात आज जे मिळत ते प्रथम
ताब्यात घेउन पुढ़च्या मागणीसाठी दूसरा हात
पुढ करायचा आसतो . पहिली स्टेप 100% बरोबर म्हणुनच समाजात आज डॉक्टर ,इंजिनीअर,
मोठया संख्येने झालेले दिसतात पण दूसरा हात पुढे करणेस 20 वर्षे गेली .म्हणून ST आरक्षणास भारतीय
घटनेत 1956 साली समाविष्ट आसूनही मोठा विलंब
झाला .तरीही पुढीलकाळात बी के कोकारे यांचे
नेतृत्वाखाली हा ST चा न्याय लढ़ा सुरूच होता तो थांबवणे या राजकर्त्याना आवश्यक वाटले . याच काळात अँड. गुंडेराव बनसोडे याना धनगर ST आरक्षणाचा प्रचार महाराष्ट्रात करणेस आड़थळे आणले
गेले .त्यानी आँल इंडिया धनगर महासंघ उत्तर प्रदेशमध्ये नेला. तिथ मोठ जागरण केल आता । त्या उत्तर
प्रदेशातील धनगर बांधव सवलती घेऊ लागल
आहेत . या राज्यकर्त्यानी बनसोडे वकीलाचे
28 एकर पैकी 25 एकर शेतात मोठा तलाव खोदला .
त्याना आर्थिकदृष्टया आड़कवणेचा प्रयत्न केला .

महादेव जानकर यानी समाज पूर्वीचा राज्यकर्ता व
आताची ही दयनीय आवस्था पाहून आपल आयुष्य वाहिल.ते ही जागृतीसह राजकीय लढ़ा जोमाने लढत आहेत . शरद पवार हेच या ST आरक्षण अंमलबजावणी न करणारे राज्यकर्ते आहेत आशी समाजाची भावना आता झाली आहे .कारण 2009 चे लोकसभा निवडणुकित ST आरक्षण धनगर समाजाला देणेच
लेखी वचन त्यानी दिल होत. 6 वर्षे झाली 16 महिन्यात मराठा आरक्षण जाहिर GR काढून बारामतीत
प्रमाणपत्र वाटप ,तर 1956 पासुन समावेश असून GR निघाले असताना धनगर समाजाची अंमलबजावणी नाही .मुस्लिम समाजाने आरक्षण न मागताच त्याना दिले गेले. व धनगर समाजाचे आरक्षण ही आरक्षण जाहिर
होणेपूर्वी मिळेल असा भाव सर्व पवारप्रेमी समाज बांधवाचे मनात होता .म्हणूनच या सर्वानी जानकर
उभे असताना व ती टक्करकाट्याची असताना सुप्रियाताई सुळे याना बारामतीत 92000 ची आघाडी दिली होती .त्याप्रेमात कमी आली का ? आरक्षण न मागणारे लोकाना मिळतय मग न्याय मागणी असताना आम्हाला का नाही हा यातील काहींचा अनुत्तरित प्रश्न आहे . याच खर उत्तर ST आरक्षणामुळे धनगर
समाजास राजकीय आरक्षण मिळणार आहे .
त्यामुळे आखडता हा हात घेतला जातोय . काल कोअर कमिटीने दि 25 जुलै पर्यंत या आघाडी सरकारने ST
आरक्षणाची अंमलबजावणी सुरु केलेस सर्वपक्षीय कमिटी सदस्य आपआपल्या पक्षाचे काम करतील मात्र
जर ही अंमलबजावणी केली नाही तर सर्वानी एकत्रित जानकरसाहेबासह महायूतीकड़े प्रयत्न करावयाचे व
त्याना मदत करावयाची असा निर्णय या संघर्ष
यात्रेत बारामतीत झाला.

पुन्हा एकदा हां लढा पुढे नेले बद्दल सर्वाना धन्यवाद !: कळु दे समाजाच्या  सर्व  घटकांना कोण  घान करत आहे ते

3 comments:

guru said...

Jai Malhar!
Jai Janaai!

satish said...

धनगर समाज एकत्रित करने योग्य व इतर समाजाना ज्या सवलती आहेत त्या ह्या समाजतल्या गरीब व गरजू लोकाना त्या मिळने गरजेचे ही आहे परंतु आज ह्या एकविसाव्या सतकात समाजाला व देशाला खरी गरज कोनती हे ही लक्षात आनले पाहीजे . आज सिंधुदूर्ग ता. मधे भंडारी समाज्याने सव्ताहच्या समाजा बद्दल फारच मोठा व आजच्या देशात चाचाले चाललेल्या परस्थिति कडे पाहून कौतुकास्पद निर्णय घेतला तो म्हणजे भंडारी समाजाला आरक्षणाची गरज नाही व समाजात असलेल्या गृरीब गरजु लोकाना स्वतः समाज उन्नती कडे नेह्न्याचा प्रयत्न करनार .व तु ९९६७३९७९७५

Kirti Nitinraje Anuse (किर्ती नितीनराजे अनुसे) said...

The reality is described