Saturday, August 9, 2014
धनगरानो षडयंत्र वेळीच ओळखा...
आजपर्यंत बारामती, इंदापूर, फलटण, सोलापूर जिल्हा, सांगली, नगर या पट्ट्यातील लोकानी पिढ्यानपिढ्या धनगर समाजाला ग्रुहित धरुन राजकारण केले. आज समाजाला जाणीव झाली कि हे राज्यकर्ते आपला वापर करुन घेताहेत. त्यातच आरक्षण प्रश्नावर सरकारने चालवली दिरंगाई ही धनगर समाजाच्या असंतोषात भर घालणारी ठरली. हा सरकारविरोधातला असंतोष आणि महादेव जानकर यांची महायुतीशी हातमिळवणी यामुळे हा समाज महायुतीकडे झुकला.
त्यामुळे आपली परंपरागत वोट बॅंक हातातून जातेय हे पाहून आघाडीच्या नेत्यांचा सय्यम सुटलाय. कारण धनगर समाज एकगट्ठा महायुतीकडे गेला तर सत्ताधार्यांचा पश्चिम महाराष्ट्रातला बालेकिल्ला उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना-भाजपच्या विचारसरणीबद्दल वाद होवु शकतो. कुणी त्यांच्याकडे जावे कि नाही याचे व्यक्तिगत उत्तर वेगवेगळे असू शकते. परंतु जानकर किंवा धनगर समाजाला स्वतंत्र राजकीय भुमिका घेण्याचे स्वातंत्र्य आहे हे विसरता कामा नये.
आघाडीचे राजकारण धनगर आरक्षणामुळे अजुन गोत्यात आले त्यामुळे त्यांचे भाडोत्री विचारवंत, लेखक, पत्रकार, संपादक चिडून धनगर समाजाच्या आंदोलनाला बदनाम करत आहेत. समाजाने हे ओळखून आपले आंदोलन भरकटू देवू नये. एक लहानशी चूक महागात पडू शकते. आणि आजवर केलेला संघर्ष महागात पडू शकतो. शत्रूच्या हातात आयते कोलीत देवू नका. आपला संयम हीच आपली ताकद आहे. हिंसा करुन आरक्षण मिळनार नाही. आज समाजाची राजकीय ताकद असती, पंधरा-वीस आमदार, पाच खासदार असते तर रस्त्यावर यायची वेळ आली नसती. 2009 ला माढ्यात आणि 2014 ला बारामतीत झालेली चूक पुन्हा होऊ देवु नका. हे धनदांडगे लोक आजपर्यंत तुमच्या जिवावर राजकारण करुन तुमचीच क्रूर चेष्टा करत आहेत. शत्रूना ओळखा, आणि महत्वाचे म्हणजे त्यांचे डावपेच ओळखा. अजित पवारांची पत्रकार परिषद म्हणजे मोठे षडयंत्र आहे. चुकिची reaction द्याल तर फसाल. शिकार्याने लावलेला सापळा ओळखून त्यापासून दूर जायचे कि त्यात अडकायचे हे ठरवा. बुद्धीने चालाल तर यश मिळेल. अन्यथा तुमचा घास घेण्यासाठी लांडगे टपूनच बसलेत.
प्रकाश लालासाहेब पोळ, कराड.
Labels:
आंदोलन,
आरक्षण,
चळवळ,
धनगर समाज,
प्रकाश पोळ
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comments:
धनगर समाजासाठी चालले आपले कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. धनगर समाज परिवर्तनाची हि मशाल अशीच तेवत धरावी ही अपेक्षा. विलंबाने का होईना यश नक्किच मिळेल ही आशा....जय मल्हार
Post a Comment