Sunday, August 10, 2014

महाराष्ट्रातील धनगरांच्या राजकीय अस्मितेचा खून कोणी केला ?

अजित पवार 
गेली दिड महिने लोकशाही मार्गानेच धनगरांचे ST आरक्षण अम्मलबजावणी करण्यासंबंधीचे आंदोलन सुरू आहे. काही तुरळक प्रकार सोडले तर हे आंदोलन अत्यंत संयमाने ,शांततेने व अहिंसक मार्गानेच सूरू आहे. या आंदोलनाचा कोणीही पूढारी नाही.गाव, जिल्हा, तालूका व शहरी स्तरावर सुरू असलेले हे आंदोलन त्या त्या भागातील तरूण व वृद्धांनी स्वयंस्पृर्तीने सुरू केलेले आहे. आंदोलना संबधी कोणत्यातरी पुढा-यांनी त्यांना सांगितले म्हणून केले असे मूळीच नाही. म्हणूनच हे जन आंदोलन ठरलेले आहे. नेत्यांच्या पुढाकाराशिवाय आंदोलन होऊच शकत नाही हा आतापर्यंतचा समज धनगरांच्या या आंदोलनाने खोटा ठरविलेला आहे.



एवढे दिवस सूरू असलेल्या आंदोलनाची असंवेदनशिल असणा-या सरकारने गंभिर तर सोडाच पण साधी दखलही घेऊ नये. सरकारने जाणिवपूर्वक केलेल्या गूण्याची शिक्षा म्हणजे एका मंञ्यावर झालेली शाहीफेक होय.

ज्या पुढा-यांनी वा सत्ताधा-यांनी धनगरांच्या आंदोलनाची दखल तर घेतलेली नाहीच उलट आदिवासी व धनगर यांच्यात संघर्ष पेटवला त्याची प्रतिक्रीया म्हणजे शाही फेक प्रकरण होय. अलिकडे अहिंसक मार्गाने केलेल्या आंदोलनाला सरकार आंदोलन समजत नाही. पण हेच आंदोलन हिंसक झाले की सरकारला जाग येते. मिडीया खळबळून जागा होऊन कूरणागत चरत असतो. सत्ताधारी नेते लोकशाहीची, गांधीजींच्या अहिंसक आंदोलनाची, चौरीचौरा येथिल आंदोलन हिंसक होताच कसे मागे घेतले याची द्वाही मिरवायला लागतात. तुमच्यातर केवळ एका डोळ्याला ईजा झाली. पण तुम्ही मराठावादी सत्ताधा-यांनी गेल्या ६४ वर्षात तीन पिढ्याधनगरांच्या बरबाद केल्या त्याचे काय ? धनगरांचा एकही खासदार तूम्ही होऊ दिला नाही त्याचे काय ? सारे मुख्यमंत्री व केबिनेट मंत्री तुमच्या स्वजातीतच कसे काय जन्माला येतात ? महाराष्ट्रातील धनगरांच्या राजकीय अस्मितेचा खून कोणी केला ? ST च्या आरक्षणाचे हक्कदार असणा-या धनगरांना वंचित ठेवण्याचे हिन षडयंत्र कोणी केले ? धनगरांची चराऊ कूरण लाटणारे व भांडवलदारांच्या घशात घालणारे कोणआहेत ? हे सर्व गुणे सत्ताधारी नेत्यांनी जाणिवपूर्वक केलेले चालतात तेव्हा शाही फेकण-या वीरबाहद्दर तरूणाने केलेला जाणीव पर्वक गुनाही आम्हा धनगरांना का चालू नये ? हिंसेचे आम्ही समर्थन करत नाही. पण सरकार व मराठावादी नेतेच जर धनगरांची पदोपदी अडवणूक व अवहेलनारूपी हिंसा करत असतील तर धनगरांनीच अहिंसक राहण्याचा ठेका घेतला काय ? पवार, पाटील, देशमूख ,चव्हाण हे सदोदित धनगरांच्या विकासातील रोडे बनलेले आहेत. यांना तुडवूणच धनगरांना पुढे जावे लागेल.

होमेश भुजाडे, लेखक आणि विचारवंत.

0 comments: