मुळ प्रवाहापासुन दुर राहलो आम्ही
रानोवनी भटकंति आमची जिवन गाणी
मेढपाळ म्हनुन सर्वान्ना ओळख आमची
येळकोट येळकोट गर्जना आमची
खंडोबाच्या चरणी श्रद्धा आमची
जे मिळेल त्यावर समाधानि होतो आम्ही
जे मिळाले इतरान्ना त्याचिच केलि होति मागणी
पण आम्हाला कुणी गम्भिरपणे घेतलेच नाही
आम्हिहि हवि तशी लढत दिलिच नाही
एका छत्राखालि एकत्र कधि आलोच नाही
पण आता सावधान व्हावे 'र ' ला 'ड ' माननार्यान्नी
दुधारि तलवारिने आमच्यावर वार करनार्यान्नी
आतापर्यंत सहन केलेले पुढे सहन होणार नाही
न्यायच हवा आता , न्यायच हवा आता
वाट पाहत राहण्याचि आमचि इच्छा नाही
जे भोगले आम्ही ते पुढिल पिढिच्या वाट्याला येणार नाही
पिवळे वादळ राजनेत्यांची झोप उडवतेय
आमचे एकत्रिकरण सगळ्यांवर भारि पडतेय
आम्ही आहोत धनगर
आमच्या घरि आहेत धनाचे आगर
असा शब्दच्छल ज्याने केला
त्याने जरा स्वताकडे पहावे
कुणाच्या प्रगति आड आम्हाला यायचे नाही
पण आमचा विकासहि आम्हाला थाम्बवायचा नाही
3 comments:
अर्चनाताई खुपच छान कविता....धनगर समाजाचा संघर्ष आपण ओघवत्या भाषेत मांडला आहे.....keep it up.....
Thankyou for your encouragement
खुप छान कविता केली आहे nice
Post a Comment