Saturday, August 16, 2014

शरद पवार साहेब आता तरी खरे बोलताय का ?

शरद पवार
शरद पवारसाहेब धनगर ST आरक्षणावर आपण इतक्या उशिरा तोंड उघडलत आता खर सांगा >>>>>

आपण धनगर समाजाचे आदिवासीत्व कबूल केलत मग ST आरक्षणाची आपण इतकी वर्षे प्रमाणपत्र का दिल नाहित ?

हिंदितला धनगड शब्द कोणी मराठीमध्ये जाणीवपूर्वक धनगर असा भाषांतरीत केला नाही .तुमचा इमानी धनगर मतदार बांधव तुम्ही 1956 पासून विकासाच्या आदिवासी हक्कापासून वंचित उपेक्षित का ठेव़ू दिलात ?
आपण त्यांचे खरे लोकप्रतिनिधी नव्हता हे खर समजायच का?
महाराष्ट्रात मागील 4 दशके सार राजकारण आपणच ठरवत होता असा सारा महाराष्ट्र म्हणतो मग आपणच हा अन्यायाचे कर्ते धर्ते आहात का?

आज सोलापूरलाच पंतप्रधान मोदी येत आहेत व ते निवडणुक प्रचाराप्रामाणे धनगर आरक्षण जाहिर करतील व आपला कात्रज घाट होइल व सुशिलकुमार शिंदेप्रमाणे धोबीपछाड़ नको म्हणून आजची पुणे येथील पत्रकार परिषद घेतलीत हे खर का ?

हिंदीतील ओडिसा जाखड,तिवाडी, गुडगाव अशा अनेक शब्दांच मराठीत ओरिसा, जाखर तिवारी ,गुरगाव भाषांतर होत आलय मग हिंदी इंग्रजी भाषेतील संविधान मराठीत भाषांतरीत करताना धनगर समाजाला ST मूळे राजकीय मतदार संघ रिझर्व्ह होतील व मग आपल कस ? आस ज्या राजकीय घराण्याना धोका वाटत होत त्यात आपणही एक होताहे खर आहेका?

१६ महिन्यापूर्वी मराठा आरक्षण विषय अजितदादामुळे पुढ आणलात. GR निघताच१६ व्या दिवशी बारामतीत प्रमाणपत्र दिलीत हे सार भारतीय राज्य घटनेत नसताना केलत .तेही १६ % घेतलत आम्ही कुणी विरोध केला नाही . तुम्ही म्हणालात आम्ही राजकीय आरक्षण घेतल नाही तुम्हाला वाटत आम्हाला कळत नाही असं तुम्ही कसे समजता ?

आहो आधीच तुम्ही बर्याच जणानी OBC तील राजकीय आरक्षण असलेलं" कुनबी "दाखला काढून माझं ते माझंच पण तुझ ते पण माझच या न्यायानी जि. प. ,प. स., नगरपालिका ,ग्रामपंचायतीमधील अनेक OBC जागा तुम्ही केव्हाच पळवल्यात हे उभा महाराष्ट्र जाणतो .पैशातुन सत्ता व सत्तेतुन पुन्हा पैसा हेच तर तुमची निवडून यायची क्षमता आहे .बरे असो.

धनगर ST आरक्षण 1956 सालीच म्हणजे 58 वर्षापूर्वी GR निघाला भारतीय संविधानात देखिल आहे मग राज्यात अजुनही तुमचं सरकार आहे तेव्हा उद्यापासूनच सर्व प्रांताधिकारी व तहशीलदार यांना धनगर व धनगड एक आहेत हे आता मानताना मग धनगड दाखले तात्काळ वाटप करा...

पाहू तुमचे खरेपण....

विजय गावडे ,महासचिव
भारतीय धनगर परिषद

0 comments: