Friday, August 29, 2014
होमेश भुजाडे यांचे मुख्यमंञ्यांना खुले पत्र - 2
मान . पृथ्विराज चव्हाणजी , अनूसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणी आंदोलनाच्या अनूषंगाने धनगरांसोबत आपण कूटनीतीपूर्ण जी खेळी खेळली त्या बद्दल आपला व आपल्या सरकार मधील आघाडी दलांचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच.
खेळी क्र.१) तिस-या सूचिची शिफारस
उत्तर : ज्याची मागणीच धनगर समाजाने केलेली नाही . त्या तिस-या सूचिचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्याची भाषा आपल्यासारख्या मुख्यमंञ्यांनी करणे ही अत्यंत खेद जनक बाब आहे. आपली ही कृती ज्या गावाला जायचेच त्या गावचे तिकीट न देता दुस-याच गावचे तिकीट जबरदस्तीने थोपविण्याचे षडयंत्र होय. अर्थात ही धनगर जमातिची शुद्ध फसवणूक होती. आपली ही खेळी धनगरांनी वेळीच ओळखली आणि त्यामुळे आपण तोंडघशी पडलात.
खेळी क्र.२) आदिवासी मंञ्यानी ठराव घ्यावा मी एका रात्रीतून सही करतो .
उ. आपण मंत्रीमंडळाचे संवैधानिक प्रमूख आहात. सबंध मंत्रीमंडळ हे मुख्यमंञ्याच्या इशा-यावर आणि नेतृत्वाखाली काम करत असते. मुख्यमंत्री हा मंत्रीमंडळाचा नेता असतो. हे आपणास ठाऊक असून सुद्धा आपण समाजकल्याण मंञ्यानी ठराव घ्यावा मी एका रात्रीतून सही करतो. हे आपले विधान सुद्धा शूद्ध फसवणूक होते . आपण जर तसा ठराव संमत करून घेण्यास समर्थ नसाल तर आपणास मुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकारच नाही.
खेळी क्र .3) सर्व पक्षांचा निर्णय होता की धनगरांसाठी तिस-या सूचिची शिफारस करावी.
उ. राष्ट्रवादिने ऐनवेळी धनगर आंदोलनाला पाठिंबा देणे, तिस-या सूचिला विरोध करणे, हा सर्व आपला नियोजित खेळ होता. तू ' मारल्यासारखं कर मी रडल्या सारखा करतो ', 'तू माझी खाजव मी तुझी खाजवतो ' हा रडारडिचा व खाजवा खाजविचा खेळ धनगर जमातिने ओळखला आहे.
खेळी क्र. 4) धनगरांना अनूसूचित जमातीचे आरक्षण न देण्याचा आपल्या सरकारने घेतलेला निर्णय .
उ . चव्हाण साहेब, आपले पूरोगामी आघाडी सरकार आम्हाला आरक्षण देण्यास जरी सक्षम नसले तरी धनगरांच्या आरक्षणाला विरोध करणा-यांच्या घडाळांची काटे उलटे फिरवण्यासाठी आणि विरोधकांचे हात कलम करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत.
स्वजातीला आरक्षण देतांना आपण जी प्रचंड तत्परा दाखवली आणि धनगरांच्या आरक्षणाला जो दूजाभाव दाखवला यावरून आपली व आपल्या सरकारची जातियवादी मानसिकता किती भीषण आहे याची प्रचिती आम्हाला आलेली आहे.
चव्हाण साहेब ,आज तुम्ही सत्तेत आहात उद्या आम्हीही राहू. आज आम्ही मागणी करतो आहोत उद्या तूम्ही मागणी करणारे राहणार आहात . आपणास सत्तेमध्ये असल्याचे घमंड योग्य नव्हे. सत्ता ही कोण्या एका व्यक्तीची, समाजाची , धर्माची वा वंश -वर्णाची दासी बनून राहिलेली नाही. सत्ता ही नेहमीच परिवर्तनशिल व गतिशील प्रवाह राहिलेला आहे. काही काळापुरती या प्रवाहाची गती थांबलेली जरी दिसत असली तरी त्या प्रवाहाने मुसंडिही तेवढ्याच ताकदिनीशी मारलेली आहे.
चव्हाणजी, सत्तेचा माज चडलेल्यांची नशा या भारतात फक्त आणि फक्त धनगरांनीच उतरवलेली आहे. आपण जरा इतिहासाचा अभ्यास करा आपल्या लक्षात येईल. अन्यायकारी नंद घराण्याचे साम्राज्य आम्हीच धुळीस मिळविले. युद्धाकडून बुद्धाकडे नेणारे आम्हीच आहोत. मोघलसत्तेचा जूलूम आम्हीच मोडून काढला. अपराजित ब्रिटीशांना एक - दोनदा नव्हे तर तब्बल सलग अठरावेळा पराजित करून त्यांचे घमेंड तोडणारे आम्हीच आहोत. पेशवाईची त्यांच्याच घरात घूसून पळताभूई थोडी करणारे आम्हीच आहोत.
एवढे वर्ष आम्ही तुमच्यावर विश्वास दाखवून तुम्हाला सत्तेची सूत्र दिली आणि तुम्हीच आमच्याशी विश्वासघात केला. तुम्ही आम्हाला सत्तेतूनबाद केले तरी आम्ही शांत राहलोत. आमच्या चराऊ कूरणांना लाटून व भांडवल दारांना वाटून आमची अन्नान दशा केली तरी आम्ही निमूट पणे सहन केले. धनगर अनूसूचित जमातीच्या आरक्षणाचे हक्कदार असतांनाही तुम्ही आम्हास लाचार बनवले. धनगर महाराष्ट्रातून कोणत्याही पक्षाकडून खासदार मनून निवडून जावूच नये या करीता तुम्ही धनगरांसाठी अघोषीत संसदेची सीमाबंदी करून जातियवर्चस्वासाठी नेहमीच एकवटलेत. धनगर -आदिवासिंमध्ये आरक्षणावरून वाद पेटवून " फोडा आणि राज्य करा " या कपट नीतीचा अवलंब आपण केला . सत्ता मिळवण्याकरिता धनगरांना आपण पाहिजे तसे 67 वर्षे गुलामासारख्ये वापरून घेतले . आता या गुलामांना गुलामीची जाणीव झाल्यामुळे तो बंड करून उठेलेला आहे .
चव्हाणजी, महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणूका डोळ्या समोर ठेवून थातूर -मातूर प्रस्ताव केंद्राकडे पाठवून धनगरांची मतं लाटण्यासाठी सरते शेवटी आपण पुन्हा एकदा खेळी खेळण्याची चिन्हे दिसत आहे. पण आपण भ्रमात राहू नये. यानंतर ' आरक्षण देता की जाता ' या भूमिकेवर ठाम आहोत.
काळाची पाऊले ओळखा आणि धनगर आरक्षणावर पुन्हा एकदा फेर विचार करा ऐवढेच या प्रसंगी सांगून लांबलेले पत्र थांबवतो. पून्हा जेव्हा आपण नवी खेळी खेळाल तेव्हा नक्कीच पुन्हा भेटू. तुर्त एवढेच.
आपला
होमेश भुजाडे
( लेखक)
नागपूर
मो. 9422803273
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment