|
पृथ्वीराज चव्हाण |
प्रति,
मान. मुख्यमंत्री,
पृथ्वीराज चव्हाण साहेब,
मुंबई (महाराष्ट्र राज्य).
प्रिय महोदय ,
आपणास होमेश भुजाडे यांचा जय अहिल्याई ! जय मल्हार !! वि. वि.
गेल्या दीड - दोन महिन्यापासून धनगर जमातीचे अनूसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहे. त्या अनुषंगाने योग्य ते सर्व पूरावे आपल्या सुपूर्द करण्यात आलेत . तरी सुद्धा आपण
जाणिवपूर्वक टाळाटाळ करून वेळ मारून नेण्याचा नेटाने प्रयत्न करत आहात . हे आपल्या व आपल्या काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने अत्यंत लाजिरवानी व निषेधार्य बाब आहे.महाराष्ट्रातील धनगर हा नेहमीच कॉग्रेस पक्षाच्या बाजूने राहिलेला आहे. अर्थात धनगर जमात ही कॉंग्रेस पक्षाची पारंपारिक मतदार आहेत. तरी सुद्धा या पक्षाने महाराष्ट्रातील धनगरांचे सदोदित शोषणच केलेले आहे. त्यातीलच एक भाग म्हणजे स्वातंञ्याच्या 67 वर्षात महाराष्ट्रातून आजपर्यंत धनगरांचा एकही खासदार आपल्या पक्षाने व आपणही जाणिवपूर्वक होऊ दिला नाही.
|
होमेश भुजाडे |
पृथ्वीराजजी मला नेहमी एक प्रश्न पडतो त्याचे उत्तर शक्य झाल्यास पाठवावे ; मला आतुर्ता राहील. तो प्रश्न असा की, महाराष्ट्रराज्य निर्मितीपासून ( 1950 ) तर आज पर्यंत महाराष्ट्रात केवळ मराठा समजाचेच खासदार व आमदार संख्येने जास्त का ? कदाचित आपण म्हणाल मराठा समाजाची लोकसंख्या राज्यात जास्त आहे म्हणून. मी आपणास नम्रपणे विनंती करतो की, राज्यात आपण जातीनिहाय जनगणना कराच ; मी दाव्याने सांगतो राज्यात मराठा समाजापेक्षा धनगर जमातीचीच लोकसंख्या जास्त दिसेल. पृथ्वीराजजी वादासाठी असेही माणूया की आपल्या समाजाचीच राज्यात लोकसंख्या प्रथम क्रमाकाची आहे ; तर दुस-या क्रमांकाची लोकसंख्या असणा-या धनगरांना लोकसभा व राज्यसभेचे आजपर्यंत तोंडही का पाहता आलेले नाही ? राज्यात विधानसभा व विधानपरिषदेवरही बोटावर मोजण्याईतपत प्रतीनिधीत्व आणि तुमच्या समाजातच केवळ आमदार व खासदार , मूख्यमंत्री व केबिनेट मंत्री शेकडोने कसे काय जन्माला येतात ? या प्रश्नाचे उत्तर मला अजूनही सापडलेले नाही .महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, उत्तम संसद पटू, उदारमतवादी नेता अशी ज्यांची छाप आहे ; ते आपल्या लोकांशी एकांतात बोलतांना म्हणाले होते की धनगरांना एक ऐवजी दोन घोंगडे टाकून झोपवा .पण धनगरांना सत्ता , पद , प्रतिष्ठा यापासून दूर ठेवा. ही जमात जागी झाली तर आपल्याशी दोन हात करणारी प्रतिस्पर्धी जमात आहे हा हितोपदेश आपण कठोर व्रतस्थपणे जोपासत आहात हे आपल्या भूमिकेवरून सिद्ध होत आहे .
फूले - शाहू - आंबेडकरांचे नाव घेऊन सत्ता उपभोगणारे तूम्ही केवळ समतेची व न्यायाची कोरडी बतावणी करता .त्यामूळेच आपण धनगर जमातीला योग्य न्याय देवू शकले नाही .
धनगरांच्या वादळाने तूमच्या कूचकामी नेतृत्वात कॉंग्रेस पक्षाला राज्यातून लोकसभा निवडणूकीत कोठच्या कोठे उडवून लावले हे आपण जाणताच. त्यानंतर धनगरांच्या असंतोषाचा उद्रेक आताच आपण आरक्षणाच्या आंदोलनातूनही राज्यभर अनूभवला आहेच . चव्हाणजी येत्या विधानसभा निवडणूकित धनगर जमातीच्या त्सूनामीचा कहर कॉग्रेस - राष्ट्रवादी आघाडिला जलसमाधी दिल्याशिवाय राहणार नाही .
साहेब येणा-या त्सूनामीची चाहूल ओळखा . धनगरांच्या घटनादत्त ST च्या आरक्षणाची त्वरीत अमंलबजावणी राज्यात करा . अशी विनंती वजा सूचना आपणास करत आहो. ( क्रमशः)
0 comments:
Post a Comment