Wednesday, August 6, 2014
धनगराना आरक्षण नाकारणे हा राज्यघटनेशी द्रोह
6 ऑगस्टच्या लोकसत्तामध्ये सुशिम कांबळे यांचे धनगर आरक्षणाविषयी पत्र वाचले. अनुसूचित जमातीत समावेश असणार्या धनगरसद्रुश्य जमातींची यादी देवुन यात धनगर किंवा धनगड या शब्दांचा उल्लेख नाही असे ते म्हणतात. याबाबत अनु. जमाती मंत्रालयाच्या 2008-09 च्या वार्षिक अहवालातील अनु. जमातीची इंग्रजी यादी पाहू. छत्तीसगढ-(33) oran, dhanka, dhangad, गुजरात-(24) rabari, हिमाचलप्रदेश-(2) gaddi,
जम्मू-काश्मीर-(10) bakkarwal, झारखंड-(25) oran, dhangar (oraon), कर्नाटक-(28) kuruba, केरळ- (18) kurumbar, kurumban, मध्यप्रदेश-(35) oraon, dhanka, dhangad, महाराष्ट्र-(36) oraon, dhangad, ओडिसा-(53) oraon, dhangar, uran.
आता याच अहवालाच्या हिंदी भाषांतरामध्ये dhangad हा शब्द कसा लिहिला आहे ते पाहू. झारखंड-उरांव, धनगर, ओरांव; मध्यप्रदेश-ओरान, धांका, धंगाद; महाराष्ट्र-ओरान, धनगर; ओडिसा-ओरांव, धनगर, उरान. यावरुन dhangad या इंग्रजी शब्दाचे मराठी किंवा हिंदी रुप धनगर असल्याचे स्पष्ट होते.
याव्यतिरिक्त धनगर हे विविध राज्यात वेगवेगळ्या नावानी ओळखले जातात. उदा. गुजरात-रबारी, हि. प्रदेश-गड्डी, महाराष्ट्र, म. प्रदेश, ओडिसा, झारखंड, उ.प्रदेश- धनगर, कर्नाटक, आं.प्रदेश, तमिळनाडू, केरळ-कुरुब, कुरुम्बर. या सर्व जमातींचा समावेश त्या-त्या राज्यात अनु.जमातीत आहे. या सर्व जमातींचा व्यवसाय, दैवते, चालीरिती, परंपरा या समान आहेत. धनगरी ओव्या, गजी न्रुत्य, मेंढपाळ व्यवसाय हे समान धागे आढळतात. अगदी या विविध नावानी गुगल सर्च केले तरी या सर्व जाती धनगर (shepherd) असल्याचे दिसेल.
विविध घटनात्मक यंत्रणानीही वेळोवेळी धनगर आणि धनगड एकच असल्याचे अभिप्राय दिले आहेत. १९३१ मध्ये ब्रिटीश सरकारने केलेल्या जातनिहाय जन गणनेमध्ये 'ओरान' या जमातीची समकक्ष जमात म्हणून धनगर जमातीचा उल्लेख केला आहे. १९६८ साली केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या Bibliography of SC, ST & marginal tribes (पृष्ठ क्र. २९४) वर 'धनगर' (धनगड नव्हे) अनुसूचित जमात आहे असे नमूद केले आहे. १९८२ साली प्रसिद्ध केलेल्या याच ग्रंथाच्या आवृत्तीत 'धनगर' अशीच नोंद आहे. केंद्र सरकारच्या १९६१ च्या जनगणना अहवालात धनगर जमात अनुसूचित जमातीत समाविष्ठ असल्याचे म्हटले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने २००९ साली दिलेल्या निकालात म्हटले आहे, "धनगर हि उत्तरप्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल मध्ये अनुसूचित जातीत मोडते तर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशमध्ये त्यांचा समावेश अनुसूचित जमातीत आहे." राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने धनगर आणि धनगड एकच असल्याचे मान्य केले आहे. (Minutes of 29th meeting of NCSC, ३/१२/२०१२).
या सर्व बाबी पहाता धनगर आणि धनगड एकच असल्याचे दिसते. तरीही केवळ तांत्रिक दोषाचा बाऊ करुन आजपर्यंत धनगर समाजाला अनु. जमातीच्या सवलतींपासून वंचित ठेवले गेले. घटनेने धनगराना दिलेल्या सवलतींपासून त्याना वंचित ठेवणे म्हणजे घटनेशी द्रोह करणे होय
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
आपण आरक्षणाचा हा लढा असाच संशोधक वृत्तीने चालू ठेवावा. संपुर्ण देशातील धनगर समाज आपल्या पाठीशी आहे. आपण कोण होतो, कसे होतो, आपला धर्म, जमात चालीरीती, रूढी परंपरा बदलता काळ या सर्वांची जाणीव अजुन या भोळया भाबडया धनगर समाजास व्हायची आहे. पण Earch is rounded फिरून या समाजास या सर्व प्रकाशि इतिहासाची नक्कीच जाणीव आणि उकल होईल.
अगदी बरोबर.
Post a Comment