Saturday, August 30, 2014

रानकवी - यशवंत तांदळे

महाराष्ट्रातील विस्मृतीत गेलेले एक प्रतिभावंत साहित्यिक, रानकवी - यशवंत तांदळे यांच्याविषयी माहिती देणारा श्री. रघुराज मेटकरी लिखित लेख : 

पृथ्वीमातेला पडलेले एक निरागस स्वप्न म्हणजे रानकवी यशवंत तांदळे. १९७६ साली ५१वे अखिल भारतीय साहित्य संमेलन कराड येथे भरलेले होते. या संमेलनात सहभागी व्हायला अनेक साहित्यिक जमलेले. या झकपक साहित्यिकांच्या गर्दीत मळकट धोतर, मळकट पांढरा शर्ट व लाल भडक मुंडासे आणि खांदयावर घोंगडे अशा अवस्थेत एक अडाणी धनगर व्यासपीठाजवळ आला. आणि "मला एक कुंडका म्हणू दया" अशा विनंत्या करू लागला. पण त्याच्याकडे लक्ष देते कोण ? संयोजक, निवेदक आपापल्या नादात गर्क. ​पण समोर

Friday, August 29, 2014

होमेश भुजाडे यांचे मुख्यमंञ्यांना खुले पत्र - 2


मान . पृथ्विराज चव्हाणजी , अनूसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणी आंदोलनाच्या अनूषंगाने धनगरांसोबत आपण कूटनीतीपूर्ण जी खेळी खेळली त्या बद्दल आपला व आपल्या सरकार मधील आघाडी दलांचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच. 

खेळी क्र.१) तिस-या सूचिची शिफारस 
उत्तर : ज्याची मागणीच धनगर समाजाने केलेली नाही . त्या तिस-या सूचिचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्याची भाषा आपल्यासारख्या मुख्यमंञ्यांनी करणे ही अत्यंत खेद जनक बाब आहे. आपली ही कृती ज्या गावाला जायचेच त्या गावचे तिकीट

होमेश भुजाडे यांचे मुख्यमंञ्यांना खुले पत्र-1

पृथ्वीराज चव्हाण

प्रति,

मान. मुख्यमंत्री,
पृथ्वीराज चव्हाण साहेब,
मुंबई (महाराष्ट्र राज्य).

प्रिय महोदय ,

आपणास होमेश भुजाडे यांचा जय अहिल्याई ! जय मल्हार !! वि. वि.

गेल्या दीड - दोन महिन्यापासून धनगर जमातीचे अनूसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहे. त्या अनुषंगाने योग्य ते सर्व पूरावे आपल्या सुपूर्द करण्यात आलेत . तरी सुद्धा आपण

धनगर जमातीकडून शासनाची भ्रष्टाचारातून झिजीया कराची वसूली


आदिवासी मेंढपाळ धनगर जमातीकडून शासनाची भ्रष्टाचारातून झिजीया कराची वसूली

पावसाळयात खरीप पिकांची पेरणी सूरू होते.  त्यामूळे सर्व शेत जमिनी पिकांनी व्यापलेल्या असतात.  जून ते नोव्हेंबर या सहा महिन्याच्या कालावधीत धनगरांपूढे शेळ्या - मेंढ्या चराईचा भीषण प्रश्न भेडसावत असतो.

Wednesday, August 27, 2014

धनगर सरदार देवकाते

सुभेदार बळवंतराव देवकाते :

सरदार जिवाजी राजे देवकाते हा विजापूर दरबारातील एक मातब्बर सरदार. विजापूरच्या पातशाहाकडून वंशपरंपरेने जहागीर, मनसब, इनामे व वतने घेऊन सेवाचाकरी करत होता. पहिल्या शाहूने देवकाते यांना दिलेल्या वतनपञातील नोंदीनुसार विजापूरकरांकडून कर्यात बारामती प्रांत सुपे येथील २२ गावांची सरपाटीलकी तर ०६ गावांची पाटीलकी त्यास वंशपरंपरेने मिळाली होती. तसेच मौजे कन्हेरी हा गाव

Wednesday, August 20, 2014

धनगर आरक्षण - महाराष्ट्र टाईम्समधील लेखावर प्रतिक्रिया

19 ऑगष्ट च्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये समीर मणियार यांचा 'राखीव जागांचा येळकोट' हा लेख वाचला. सदर लेखात धनगर आरक्षणाबाबत चूकीची मांडणी केली आहे. त्यामुळे धनगरांच्या आरक्षण मागणीबद्दल गैरसमज पसरु शकतात. त्यामुळे ही दुसरी बाजू प्रसिद्ध करावी ही विनंती.

केंद्र सरकारच्या अनुसूचित जमातीच्या मूळ यादीत महाराष्ट्रात 47 जमातींची नोंद आहे. (यातील दोन जमाती नंतर वगळण्यात आल्या आहेत) यात अनु. 36 वर oran, dhangad अशी नोंद आहे. यातील dhangad चा उच्चार धनगड, धांगड, धंगाद असा विविध प्रकारे होत असल्यामुळे सर्वांचाच गोंधळ झाला

Monday, August 18, 2014

धनगर आंदोलनातील हिंसा आणि त्याची प्रतिक्रिया


धनगर समाजाचे 14 ऑगष्ट रोजीचे महाराष्ट्रव्यापी आंदोलन खूप यशस्वी झाले. संपूर्ण राज्यात हे आंदोलन शांततेत पार पडत असताना बारामती, सातारा आणि फलटण या ठिकाणी काही हिंसक घटना घडल्या. बारामती आणि फलटण येथे काही एस. टी. गाड्यांची तोडफोड झाली तर सातारा येथे राष्ट्रवादीचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर एका कार्यकर्त्याने अबिर-बुक्का टाकला. राज्यभर इतर ठिकाणी मात्र आंदोलन शांततेत पार पडले. वास्तविक पहाता कोणतेही आंदोलन लोकशाही मार्गाने आणि घटनेच्या चौकटीत राहूनच करायला पाहिजे. परंतू विविध

Sunday, August 17, 2014

मा. शरद पवार ( राष्ट्रिय अध्यक्ष राष्ट्रवादी पार्टी ) यांना पत्र


शरद पवार
माननीय शरद्चंद्रजी पवार यांना होमेश भुजाडे यांचा सप्रेम जय मल्हार वि. वि.


अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून धनगर समाजाचे महाराष्ट्रात राज्यव्यापी आंदोलन प्रचंड ताकदिनीशी सुरू आहे.
धनगड - धनगर एकच असून त्यांना संविधानाप्रमाणे आरक्षण मिळावे यासाठी अनेकदा आंदोलनं झालित. ही मागणी काही नविन नाही. धनगर जमातीवर गेली ६४ वर्षे झालेला अन्याय व या जमातीचे एवढी वर्षे झालेले सर्वांगिण नूकसान भरून न निघणारे आहे.

Saturday, August 16, 2014

शरद पवार साहेब आता तरी खरे बोलताय का ?

शरद पवार
शरद पवारसाहेब धनगर ST आरक्षणावर आपण इतक्या उशिरा तोंड उघडलत आता खर सांगा >>>>>

आपण धनगर समाजाचे आदिवासीत्व कबूल केलत मग ST आरक्षणाची आपण इतकी वर्षे प्रमाणपत्र का दिल नाहित ?

हिंदितला धनगड शब्द कोणी मराठीमध्ये जाणीवपूर्वक धनगर असा भाषांतरीत केला नाही .तुमचा इमानी धनगर मतदार बांधव तुम्ही 1956 पासून विकासाच्या आदिवासी हक्कापासून वंचित उपेक्षित का ठेव़ू दिलात ?
आपण त्यांचे खरे लोकप्रतिनिधी नव्हता हे खर समजायच का?

आम्ही धनगर

लाजत बुजत जगत आलोय आम्ही
मुळ प्रवाहापासुन दुर राहलो आम्ही
रानोवनी भटकंति आमची जिवन गाणी
मेढपाळ म्हनुन सर्वान्ना ओळख आमची
येळकोट येळकोट गर्जना आमची
खंडोबाच्या चरणी श्रद्धा आमची

Friday, August 15, 2014

यांच्या स्वातंत्र्याचं काय ?

15 ऑगष्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. ब्रिटीशानी जखडलेल्या गुलामीच्या बेड्या आपण तोडल्या. दरवर्षी 15 ऑगष्ट रोजी आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतो. हा आनंदाचा, अभिमानाचा दिवस आहे हे मान्यच....परंतु हे स्वातंत्र्य खरोखर समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचलय का याचा विचार समस्त भारतीयानी करावा असे मला वाटते. आजही अनेक लोकाना रहायला निवारा नाही, अनेकाना गाव नाहे, या देशाचे नागरिक असल्याची त्यांची कोणतीही ओळख नाही. या गावकुसाबाहेरच्या,

Thursday, August 14, 2014

स्वातंत्र्य

किती आक्रोश तो झाला
किती रक्तांच्या नद्या वाहल्या
सडा पडला म्रुतदेहांचा
तेव्हा स्वातंत्र्यदिन उदयास आला

तरुणान्नि तरुणपन दिले
इच्छा आकांशांवर पाणी सोडले
मात्रुभुमिलाच प्रेयसी मानले
अन तिच्या रक्षनार्थ विरमरण पत्करले
तेव्हा स्वातंत्र्य उदयास आले

पिवळे वादळ झेपावले…


१३ ऑगष्ट : महाराणी अहिल्यादेवी होळकर स्मृतीदिन !

१३ ऑगष्ट १७९५ : जागतिक इतिहासात उत्कृष्ट प्रशासिका म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी ! पुण्यतिथी दिनानिमित्त अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन !

Sunday, August 10, 2014

महाराष्ट्रातील धनगरांच्या राजकीय अस्मितेचा खून कोणी केला ?

अजित पवार 
गेली दिड महिने लोकशाही मार्गानेच धनगरांचे ST आरक्षण अम्मलबजावणी करण्यासंबंधीचे आंदोलन सुरू आहे. काही तुरळक प्रकार सोडले तर हे आंदोलन अत्यंत संयमाने ,शांततेने व अहिंसक मार्गानेच सूरू आहे. या आंदोलनाचा कोणीही पूढारी नाही.गाव, जिल्हा, तालूका व शहरी स्तरावर सुरू असलेले हे आंदोलन त्या त्या भागातील तरूण व वृद्धांनी स्वयंस्पृर्तीने सुरू केलेले आहे. आंदोलना संबधी कोणत्यातरी पुढा-यांनी त्यांना सांगितले म्हणून केले असे मूळीच नाही. म्हणूनच हे जन आंदोलन ठरलेले आहे. नेत्यांच्या पुढाकाराशिवाय आंदोलन होऊच शकत नाही हा आतापर्यंतचा समज धनगरांच्या या आंदोलनाने खोटा ठरविलेला आहे.

Saturday, August 9, 2014

धनगरानो षडयंत्र वेळीच ओळखा...

आजपर्यंत बारामती, इंदापूर, फलटण, सोलापूर जिल्हा, सांगली, नगर या पट्ट्यातील लोकानी पिढ्यानपिढ्या धनगर समाजाला ग्रुहित धरुन राजकारण केले. आज समाजाला जाणीव झाली कि हे राज्यकर्ते आपला वापर करुन घेताहेत. त्यातच आरक्षण प्रश्नावर सरकारने चालवली दिरंगाई ही धनगर समाजाच्या असंतोषात भर घालणारी ठरली. हा सरकारविरोधातला असंतोष आणि महादेव जानकर यांची महायुतीशी हातमिळवणी यामुळे हा समाज महायुतीकडे झुकला.

धनगरांचा ओढा महायुतीकडेच का ?

गेली पासष्ट वर्षे धनगर समाज आरक्षणाची मागणी करतोय. त्यांचा प्रश्न समजून न घेता राज्यकर्त्यानी धनगरांची क्रूर चेष्टा केली. केंद्रात आणि राज्यात अपवाद वगळता कोंग्रेस आणि मित्रपक्षांची सत्ता आहे. त्यांच्या नेत्याना भेटून धनगर समाज आपली आरक्षणाची मागणी पटवून देतोय. परंतू झोपेचं सोंग घेतलेल्या राज्य सरकारला धनगरांचा प्रश्न सोडवण्याची इच्छा नाही. राजीव गांधींपासून ते शरद पवारांपर्यंत सर्व लोकाना धनगरांची मागणी योग्य आहे हे माहित आहे. परंतू फक्त आश्वासन देण्यापलीकडे या नेत्यांकडून काहीच झाले नाही. 

हर्षवर्धन पाटलांवर शाई आणि अजितदादांची घाई

अजित पवार
धनगर आरक्षणाचे आंदोलन ऐन भरात असताना हर्षवर्धन पाटलांवर शाई फेकण्याचा दुर्दैवी प्रकार घडला. आरक्षण क्रुती समीती आणि सर्व समाजाने या घटनेबद्दल खेद व्यक्त केला. कोणतीही मागणी लोकशाही प्रक्रियेच्या चौकटीत राहूनच करावी. त्यासाठी अर्ज-विनंत्या, मोर्चे, सभा हे मार्ग आहेतच. सरकारी, सामाजिक मालमत्तेचे नुकसान करणे, एखाद्या व्यक्तीला इजा पोहचवणे अशा प्रकारचे आंदोलन चुकीचे आहे. त्यामुळे सदर घटनेचा निषेध केलाच पाहिजे.

Friday, August 8, 2014

कविता - निर्भय आझाद

धनगरवाडा-महारवाडा 
सख्खे शेजारी 
समदुःखी बंधुत्वाचा निष्कर्ष 
बोधिसत्व बापाचा… 
कलमच हत्यार 
कलमांच्या तरतूदींची पाचर 
सत्ता, संपत्ती, सन्मानासहित 

Wednesday, August 6, 2014

धनगराना आरक्षण नाकारणे हा राज्यघटनेशी द्रोह

6 ऑगस्टच्या लोकसत्तामध्ये सुशिम कांबळे यांचे धनगर आरक्षणाविषयी पत्र वाचले. अनुसूचित जमातीत समावेश असणार्या धनगरसद्रुश्य जमातींची यादी देवुन यात धनगर किंवा धनगड या शब्दांचा उल्लेख नाही असे ते म्हणतात. याबाबत अनु. जमाती मंत्रालयाच्या 2008-09 च्या वार्षिक अहवालातील अनु. जमातीची इंग्रजी यादी पाहू. छत्तीसगढ-(33) oran, dhanka, dhangad, गुजरात-(24) rabari, हिमाचलप्रदेश-(2) gaddi,

Tuesday, August 5, 2014

शिंगरुबा : कथा एका धनगरी वादळाची

शिंगरुबा  मंदिर

मुंबई-पुणे मार्गावर खंडाळ्याच्या घाटात शिंग्रुबा नावाचा धनगर राहत होता. ब्रिटिशांनी मुंबई-पुणे लोहमार्ग व रस्ता (रोड) सह्याद्रीच्या घाटातून तयार करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा “रस्ता’ कसा व कोठे तयार करायचा व रूळ (रेल्वेचे रूळ) कोठल्या भागात टाकायचे, हे ब्रिटिश इंजिनिअरांना समजावून सांगणारा हा धनगर शिंग्रुबा! धनगरांची स्वत:ची अस्मिता जपत शिंग्रुबाने आधुनिक तंत्रज्ञानाचे आव्हान स्वीकारून मानवजातीच्या कल्याणासाठी कसे अफाट कार्य केले, त्याची चित्तरकथा

Monday, August 4, 2014

मुख्यमंत्री धनगर समाजाची दिशाभूल करताहेत

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा टोलवाटोलवी केली...
कृपया पुर्ण वाचा... महत्वाचे... 
राज्य सरकारचा यात रोल काय???
धनगर समाजाचा ST प्रवर्गात समावेश करण्यात राज्य सरकारची भूमिका काय आहे??
ST प्रवर्गात समावेश करण्यासाठी काय काय लागते?? 
केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवायचे काम राज्य सरकारचे आहे, मगच पुढील कार्यवाही सुरू होते...

मी ईंग्रजी व मराठी दोन्ही भाषेत लिहीत आहे... 
कृपया पुर्ण वाचा...

या सरकारच डोक तरी ठिकाणावर आहे का ?


विजय गावडे, अभ्यासक आणि विचारवंत.
------------------------------------
परवा रविवारच्या पूण्यनगरीच्या मुलाखतीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ST मध्ये धनगर समाजाचा समावेश अस म्हणत आहेत ?

आहो आमचा समावेश 1950 च्या प्रेसिड़ेंशीअल ऑर्डरने झालेलाच आहे .काका कालेलकर आयोगाने सात क्रमांकचे परीच्छेदात केला आहे .आस आसताना आता तुम्ही पुन्हा कसला समावेश करताय ?

धनगर बांधवांसाठी अतिशय महत्वाची सुचना


निर्लज्ज सरकार तिसरी सुची आपले धनगरांचे माथ्यावर मारण्याच्या पुर्ण तयारीमधे कामे चालु आहेत, बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले धनगर आरक्षण एस.टी.चे आहे आणी एस.टी.चेच आरक्षण आमला घ्यायचे आहे!
35 जिल्हयाचे प्रतिनीधी हजारोंच्या संख्येने मुंबई मध्ये 5 आँगस्ट रोजी सकाळी10-30 वाजता आझाद मैदान मुंबई येथे पोहचत आहेत.

Sunday, August 3, 2014

पुरके, मोघे, पिचड, वळवी हे घ्या पुरावे - भाग 3


१०) छतिसगढ राज्य अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष श्री तारासिंह राठीया यांनी २००७ रोजी छतिसगढचे मुख्यमंत्री डॉ. रमनसिंहजी यांना लिहीलेल्या शिफारस पत्रात म्हटले आहे की भारतीय संविधान अनुच्छेद ३४२ नुसार अनुसूचित जमातिच्या यादित अनुक्रमांक ३३ वर धनगड, धनकर, धानका लिहिलेले आहे. तसेच अन्यमागासवर्गियांच्या यादित अनुक्रमांक २५ वर गडरिया, धनगर जातिचा उल्लेख आहे. या सर्व जाती एकच असून छतिसगढ राज्य अनुसूचित जमाती आयोगाच्या अधिनियम १९९५ कलम ९, पोटकलम १ (ख) अंतर्गत

Saturday, August 2, 2014

धनगर आरक्षण लेखावर साप्ताहिक चित्रलेखाला पत्र

मा. संपादक,
साप्ताहिक चित्रलेखा.

महोदय,

11 ऑगस्ट 2014 च्या चित्रलेखा मध्ये संपादक द्न्यानेश महाराव यांचा 'धनगर-आदिवासी आरक्षणाची बारामती' हा लेख वाचला. सदर लेख एकांगी आणि वस्तुस्थितीचा विपर्यास करणारा वाटला म्हणून हा लेखनप्रपंच....या लेखात महाराव यानी काही मुद्दे उपस्थित केले आहेत.

1. महादेव जानकर याना आपणच धनगर समाजाचे एकमेव व ताकदवान नेते आहोत असे वाटते. त्याना बारामती लोकसभेला मिळालेली मतं ही मोदींच्या लाटेमुळे मिळाली आहेत.
--महादेव जानकर हे धनगर समाजाचे महत्वाचे नेते आहेत. आज संपूर्ण महाराष्ट्रात जानकर यांच्याव्यतिरिक्त धनगर समाजाचा एकही सर्वमान्य नेता नाही. जानकर यांची ताकद भलेही कमी असेल, परंतु संपूर्ण राज्यात त्याना मानणारा वर्ग आहे. धनगर आणि मागास बहुजन समाजाला बरोबर घेवुन जाणारा हा नेता आहे.

Friday, August 1, 2014

धनगरांच्या व्यथाना कवितेतुन वाट....निर्भय आझाद

आदिम परोपकाराची निशाणी- 
मेंढरं…! 
करतच राहिली 
आपल्या पवित्र खतामुताने 
पाटलाचं वावर पावन…! 
… 
मस्तवाल सरंजामशाहीची 
अनौरस औलाद- 
पाटील…! 
उलटतच राहिला भरल्या पोटाने…! 
गाभडतच राहिली समता 
वांझपणाचा भोग मिरवत…! 
…