Friday, August 8, 2014

कविता - निर्भय आझाद

धनगरवाडा-महारवाडा 
सख्खे शेजारी 
समदुःखी बंधुत्वाचा निष्कर्ष 
बोधिसत्व बापाचा… 
कलमच हत्यार 
कलमांच्या तरतूदींची पाचर 
सत्ता, संपत्ती, सन्मानासहित 

खात्रीलायक अस्तित्वाची हमी 
बापा, ग्रेटच तू… 
…… 
कालाय तस्मैः नमः 
…… 
निपजले संतापोटी सैतान 
वयात आलेला बोकड 
ओळखत नाही आई, बहीण- 
भूत-वर्तमान रक्तचरित्राची 
भळभळती पाने टाळत 
नाचली काल भीमनगरातील पोरं 
नवमागास पाटलाच्या वरातीत 
कावेबाजपणे… 
…… 
जागरण-गोंधळ- 
धुळा बंडगराचं- 
बरबाटाचं आवताण 
शेजारधर्मीय भिका कांबळेनं 
धुडकावलं मौनाच्या कटानं… 
अस्पृश्यतेचा आधुनिक अध्याय….? 
…… 
मनस्वी धुळा 
मानहानीचा सात्विक संताप 
उद्रेकाचा धुरळा- 
सोसत नाही आता 
निळ्या भंडा-याचा भार…! 

-निर्भय आझाद

0 comments: