Wednesday, September 3, 2014

धनगर समाजाचे मूळ- भाग 1

अलिकडे धनगर समाजातीलच स्वयंघोषित काही संशोधक, विदवान, विचारवंत व साहित्यिक म्हणवून घेणारे महाभाग धनगर समाजाचे मूळ कोणी आर्यात ,तर
कोणी क्षञियात , तर कोणी राजपुतात,तर कोणी ब्राम्हणात शोधून समाजात तसा भ्रम पसरविण्याचे कार्ये करतांना पाहून प्रचंड क्लेष होतो.


धनगर या देशातील अतिप्राचीन जमात असून भारतातील ते मूळनिवासी म्हणजेच आदिवासी आहेत. हडप्पा - मोहंजोदडो या नावाने ओळखल्या जाणा-या भारतीय प्राचीन सिंधू संस्कृतीचे जनक धनगर आहेत. रचियते व निर्माते धनगर आहेत. हा इतिहास काही कमी आहे काय ? एवढा प्रचंड मोठा इतिहास धनगरांचा असतांना स्वतःचे मूळ आर्य , क्षञिय , ब्राम्हण, राजपुत अशा चिल्लर आणि थिल्लर बाबींमध्ये शोधण्याची गरजच काय ?

धनगरांनी निर्माण केलेल्या सिंधू संस्कृतीचा कालखंड हा सुमारे इ. स. पूर्व २७०० ते १५०० असा संबोधला जातो. ही संस्कृती जगातील सर्वात प्राचीन व प्रगत संस्कृती समजली जाते. या संस्कृतीचे रूपातर अनेक नगरात (शहरात) झालेले असल्यामुळे तिला नागर संस्कृती असेही म्हटल्या जात असे. ही संस्कृती स्ञीप्रधान व मातृसत्ताक पद्धतीवर आधारलेली होती.

ही संस्कृती निसर्ग पुजक होती. या संस्कृतीतील लोक सूर्य, जल, अग्नी, वृक्ष, यांची पूजा करत. तसेच पशूपती, नाग, वृषभ (बैल) यांचीही ते पूजा करत. हेच त्यांचे देव व दैवतं होती. सिंधू संस्कतीच्या उत्खननात एकही मंदिर आढळले नाही.

( क्रमशः) 

- होमेश भुजाडे
नागपूर
9422803273

0 comments: