Monday, June 30, 2014

साेलापूर विद्यापिठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव द्या


धनगर समाज आरक्षण लढा

16/12/1986. Assistant Director states that Dhangad and Dhangar may be one and the same.(धनगर आणि धनगड हे वेगळे नसून एकच आहेत )

28/04/1989 CAG report recommends the inclusion of Dhangar community in the list of Scheduled Tribe.(धनगर आणि धनगड हे वेगळे नसून एकच आहेत त्यांना ST मध्ये सामाविस्त करण्यात यावे )

धनगर आरक्षण : धनगड म्हणजेच धनगर

चला निकराची झुंज घेउ राजकारण्याना निवडणुकीची भाषा कळते त्या मध्येच उत्तर देऊ
-----------------------------
      स्वातंत्र्यापासून  भारतीय घटनेत
अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश आहे . सर्व समाज मेंढ़पाळीमुळे भटका  ,भटकंतीमुळे समाज  १०० % सुसंस्कृत असुनही भटक्या शाळा नसलेने अशिक्षित होता .जसे हिंदी भाषेत ओरिसा ,एकर ,बलराम जाखर  , हे शब्द ओड़िसा ,एकड, बलराम जाखड असे उच्चारातील बदलामुळे लिहिले जातात तसेच धनगर हा या अनुसूचित (ST) यादीतील शब्द" धनगड" असा होतो तो तसाच लिहिला गेला आहे
    धनगड म्हणजेच धनगर हे वास्तव महाराष्ट्रातील काँग्रेसी राज्यकर्त्यानी जाणूनबुजून नाकारले कारण यामुळे महाराष्ट्रातील या १२%समाजास राजकीय आरक्षण द्यावे लागणार हा त्यांच्या पोटात भीतीचा गोळा होता .यामुळे ५ खासदारकीचे व ३० आमदारकीचे मतदार संघ आणखी जादा राखीव ईतर आदिवासीप्रमाणे ठेवावे लगात होते .        
     म्हणून या दुष्टानी षडयंत्र रचले १९३१ साली इंग्रजानी जातवार जनगणना केली होती तर १९४१ ला दुसरे महायुध्द सुरु असलेमुळे अशी जनगणना झाली नाही तेव्हा जी जात महाराष्ट्रात कोठेच नव्हती ती कृत्रिम धनगड जात चंद्रपुरचे जंगलात आहे असा जावईशोध या दुष्ट लोकानी षडयंत्रातुन लावला .देशात पुढे जातवार जनगणनाच २०११ साला पर्यंत  झाल्या नाहीत त्यामुळे ही लबाड़ी आजखेर  पचली आहे .
   जेव्हा ही  चालाखी   नवसाक्षर धनगर नेत्याना समजली तेव्हा ते प्रशासनात आले की  लबाडी कळेल म्हणून  आमदरकी ,मंत्रीपदे वा सरकारी कंत्राट वा आश्रमशाळा त्याना देण्यास टाळाटाळ करून त्याना झिंगवणे सुरु केले जे समाज संख्येने कमी आहेत त्याना सहज मिळे ,ते दुप्पट प्रयत्न करुनही धनगर नेत्याना मिळाले नाही हे सत्य आहे .पुढे या आदिवासी आमलबजावणी मागणी चा रोष कमी व्हावा वा ही मागणी सोडावी म्हणून अशी आमिषे काही प्रमाणात  प्रत्यक्षात दिली देखिल
    चराऊ कुरणावर साखर कारखाने ,सूत गिरण्या ,शिक्षण संस्था  MIDC उभारल्या गेल्या  त्यामध्ये प्रकल्पग्रस्त म्हणून देखिल धनगराना नोकर्या दिल्या नाहित .जंगल कायद्याने लाखो एकर जंगल जमीनीवरील चराई बंद केली. आता शेतकरी बांधवांच्या बांधावर मेढ़या चरवणेची नामुष्की  या कॉंग्रेसी राज्यकर्त्यानी धनगर समाजावर  आणली .शेतकरी रासायनिक खाताकड़े वळवला गेला सेंद्रिय शेती संपली त्यामुळे परस्पर पूरक शेतकरीवर्ग  खतासाठी मेढ्पाळावर आवलंबुन नव्हता ,बांधा वरील  आवघड चराईत  मुक्या जनावरामुळे   पिकांची नासाड़ी होई.आता   मेढ़पाळाना शिवीगाळ मारहाण नित्याची झाली होती  .याला हे दुष्ट  नालायक निष्क्रिय राज्यकर्तेच जबाबदार होते .त्यानी आनेक वर्ष कुळ म्हणून आसनारे शेतकरी बांधवाना "राहिल त्याच घर व कसेल त्याची ज़मीन "असा कुळ कायदा केला मात्र धनगर बांधवाना काही वर्षे नव्हे हजारो वर्षे "चारेल त्याचे कुरण" असा कुळ कायदा केला नाही हे आपणास कधी कळणार ?
  रोजची भांडण नको म्हणून हा परंपरागत धंदा ज्या  मध्ये १५महिन्यात ३ वेळा शेळी वेते इतका प्रचंड नफ्याचा हा व्यवसाय  मोड़कळीस आणला गेला या सरकारने जेवत्या ताटात माती घातली कधी आपले डोळे उघडणार ?
        भांडणाला कंटाळून  सारे मेंढ़पाळ आता हमाली सारखा १०० किलोच पोत उचलणेचा  अमानुष धंदा करत आहेत  १०० किलोची पोती भरती वर यूनोच्या WHO ने बंदी घालून देखिल येथे आजही १०० किलो पोती भरती सुरु आहे विचार करा !
२० किलोचे  बाजार पिशवीने आपला हात भरून येतो .रोज १०० किलो पोते घेउन धावणारया  बांधवाला अंगदुखीने झोप तरी येत असेल का ?  हा त्रास विसरावा म्हणून तो आता  व्यसनाधिन झाला आहे .धनगर घरात कौटुम्बिक हिंसाचार घुसला त्यातून भावी पीढ़ी गुन्हेगारीकडे वळते आहे यासारखे सांगलीतील संजयनगर हे उदाहरणा दखल घेता येईल. महाराष्ट्राचे कारागृहात २०-२५ % धनगर बांधव या जीवन संघर्षामुळे आडकले आहेत.
       याला हे नाकर्ते सरकार जबाबदार आहे .हे प्रश्न आमच्या नेत्यानी कधीच मांडले नाहित .हमालांचे नेते ही दुसरेच आसत ते सरकारला सामिल कधी हे दुष्ट चक्र थांबणार ?
 आदिवासी लाजरा बुजरा असतो त्यामुळे हा समाज शहरात देखिल कळपाने रहातो आहे .उदा .मुंबईत बांद्रा, देवनार मानखुर्द ,कळम्बोली ,कामोठे ,कुर्ला भांडुप या ठिकाणी आजही धनगर कळ पाने रहाताना दिसतो .
आदिवासी निसर्ग पूजक असलेने नदी, झाडे ,प्राणी यांची पूजा होत आसते .धनगरांचे देव दगड गोट्यांचे कोरीव नाक तोंड डोळे नसलेले ,गजनृत्य, ढोल कैताळ ,वालुग ,सवाष्णी,देवाच दूध हे सारे सण वेगळे  इकडे जंगलातला निवास आजही दिसतो  सह्याद्रीच्या कपारीत कुणी जानकर ,कोकरे ,वाघमोड़े ,बाजारे, येडगे लाबोर दिसतील आता शहराच्या वळचणीला समाज आसरा घेउ लागलाय त्यामुळे
 समाजात साक्षरता वाढू लागताच शिवाजीबापू शेंडगे ,रामभाऊ आखाड़े, गुंडोंराव बनसोडे ,एडतकर गुरुजी ,गणपतराव देशमुख ,आन्नासहेब डांगे, बी के पडलकर ,अनंतकुमार पाटिल ,डॉ .शेबड़े ,अघडते गुरूजी ,प्रभुजी कोकणे ....असंख्य ज्ञात अज्ञात
यांचे संघटन कैशल्यामुळे समाजात आदिवासी आरक्षणाबाबत असंतोष वाढत होता .१९८९ मध्ये मोठा मोर्चा नागपुर विधिमंडळावर गेला होता .त्याने सर्वत्र मोठी जागृती झाली .पुढे सांगलीमध्ये NT मध्ये समाजाला घालणेचा निर्णय झाला .
NT ची सुविधा बहाल करुन ST चा लाढा काही काळ थांबल्या सारखा झाल .  या सवलतीमुळे केवळ राज्यात लाभ झाला १२ %समाजाला केवळ ३.५ %सवलत दिली गेली केंद्रात समाज आजही OBC मध्येच गणला जातो .शिक्षणात समाज पुढे येतोय पण नोकरीत संख्येच्या मानाने आरक्षण नाही . ST ऐवजी NT दिले कारण राज्यापुरते NT आहे .त्याला राजकीय आरक्षण नाही .काहींचे मते जायचे होते देवाचे आळंदीला पण ही चळवळ न्हेली गेली "चोराचे आळंदीला
" आशी काहीशी कमी जास्त आवस्था झाली .पण यावेळी हेही लक्षात घेतले पाहिजे की आशा चळवळीत जे हाती येईल ते घेउन दूसरा हात पुढील मागणीसाठी करावा लागतो ,या न्यायाने जे झाले ते मला  योग्य वाटते .
  हा प्रश्न सर्वस्वी राजकीय आहे .कांग्रेस ही सवलत ६५ वर्षात देत नाही तरी ते सत्तेत आसलेने आपले बहुतेक नेते कांग्रेसवासी होते जे नव्हते ते पुढे झाले .महायुती मध्ये धनगर समाजास  नेतृत्व बहाल केले गेले .जाहिरनाम्यात आरक्षण देणेचे वचन दिले आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदिनी हा विषय प्रचारात मंडला परिणामी कांग्रेसकड़े झुकलेला सारा समाज  महायुती कडे वळवता आला .त्यामुळे ४८ पैकी ४२  खासदारकीच्या जागा पुरोगामी महाराष्ट्रात मिळवणेस मोठी मदत झाली .धनगर समाजाची मते ही राष्ट्रवादीची मक्तेदारी होती .
     आता  काही काळ राहिलेले आघाडी सरकार जागे होउन दोन्ही कॉंग्रेसने एक एक आमदारकी देऊ करून आदिवासी आरक्षण आमलबजावणी   पत्र देतील असे काही जणाना वाटते .६५ वर्षे आरक्षण मिळाल नाही हा अनुशेष (backlog) फार मोठा आहे त्याच काय ? हाही अनुत्तरित प्रश्न आहे
     आपण रस्त्यावरचा संघर्ष  सर्व शक्तिना एकत्र करुन  ठरलेप्रमाणे लढणार आहोत .ठरलेप्रमाणे वाटचाल केलेस ही अंतिम लढाई आपण नक्की जिंकु !
जीवनासाठी संघर्ष ।
 आता संघर्ष हेच जीवन ।

         विजय ग. गावडे ,
महासचिव ,भारतीय धनगर परिषद

मा. मधुकरजी पिचड आणि मा. वसंत पुरके साहेब यांना खुलं पत्र

प्रती,
मा. मधुकरजी पिचड
मा. वसंत पुरके
व ईतर मान्यवर आदिवासी नेते,
सप्रेम जय मल्हार !

 
पिचड साहेब आपले नेते शरद पवार यानी   आष्टा (सांगली ) येथे व परवा चौंडी (नगर) येथे त्यांच्या उपस्थितीत आपण स्वत: विद्यमान आदिवासी  आरक्षणाला धक्का न लावता भारतीय घटनेप्रमाणे
धनगर आदिवासी हक्काची आमलबजावणीस सहकार्य करणेचे मान्य केले आसता आज अशी उलटी भूमिका का ? आपल्यावर दबाव टाकणारे बोलवते धनी बारामतीत लोकसभा निवडणुकित धापा टाकत कसे बसे जिंकले आहेत या मध्ये हे आरक्षण आम्हीच देऊ शकतो असा समज अनेक धनगर नेत्यांचा केला त्या धनगर नेत्यांचा बारामती तालुक्यातील ९०००० मताधिक्यात सिंहाचा वाटा आहे तरी ते आपला बुध्दिभेद करत आहेत हे आता समस्त धनगर समाज जाणतो !

हजारो वर्षाच्या सामाजिक चढउतारत ज्या समाज
घटकाना अस्पृश्य मानल जाऊन त्याना विकास प्रक्रिये पासून दूर ठेवल गेल त्या अस्पृश्य जाती भारतीयघटनेत  SC मध्ये तर ज्या जमाती लाजरे बुजरेपणामुळे या विकास प्रक्रियपासून दूर राहिल्या त्या जमती ST मध्ये समाविष्ट केल्या आहेत

   आरक्षण हे केवळ गरीबी हटवणेसाठी नसून या जाती व जमातीना सामाजिक न्याय ,मान ,सन्मान मिळावा त्याना राष्ट्रविकासात आपला हाक्क आधिकार जे हजारो वर्षे नाकारले ते देणेत यावेत हा मुख्य  उद्देश आहे .

  धनगर ही आशीच पांढरे कपडे घालून येणार्या पांढरपेश्या लोकाना आजही मासाळवाडी वा लवासा सारखे घबरणारी जंगल ,माळरानातील निर्भय जमात आहे .कोकणात धनगराचे केवळ वासाने वाघ पळुन जातो असा आजही समज आहे .ईतर आदिवासीप्रमाणे धनगर निसर्गपुजक आहेत .त्यांचे देव हे शेंदुर लावलेले दगडगोट्याचेच आहेत ते कोरीव नाक तोंड डोळे आसलेले नाहित .ईतर आदिवासीप्रमाणे धनगर समाजचे सामूहिक नृत्य आहे त्याला गजनृत्य म्हणतात .प्रचंड अंधश्राद्धा,देवभोळेपणा या समाजात आढ़ळतो .ईतर आदिवासी प्रमाणे धनगर समाजाचे भगत वा पुजारी हे त्याच समाजातील आसतात .नागरी समाजातील पुरोहित ,ब्राम्हण वा गुरव येथे आढ़ळत नाहित .धनगरी स्त्री पुरुषांची स्वतंत्र वेषभूषा आढळते.हां समाज आपल्या लाजरया बुजरया स्वभावामुळे आजही शहरात कळपाने राहतो .मोठ मोठ्या सामाजिक संस्था ,पक्ष  संघटना ,या मध्ये हा वर्ग कुठेच दिसत नाही.

  या सर्व बाबींचा विचार करून या जंगलातील भटक्या आदिवासी समाजास घटनाकारानी त्या त्या राज्याच्या ST म्हणजे आदिवासी यादीतच समाविष्ट केले आहे .
 मधुकर पिचड, वसंतराव पुरके वा अन्य ईतर आदिवासी नेत्यानी ही बाब समजुन घ्यावी .धनगर समाज हा आधीच आदिवासी व त्यात भटका त्या मुळे आधीच माकड त्यात मद्य प्याला अशी दयनीय अवस्था  झाली आहे .

    एकर ,ओरिसा ,तिवारी ,बलराम जाखर हे शब्द हिंदीत एकड़ ,ओड़िसा तिवाड़ी वा बलराम जाखड आशेच र एवजी ड हा शब्द घेउन लिहिले जातात.त्यामुळे मुळ आर्थ बदलत नाही.

 तसेच धनगर आदिवासी जमातीचा ST यादीत उल्लेख धनगड असाच झाला आहे हे सर्व जंगल रानोमाळच्या भटक्या समाजास १९८० सालापर्यंत कळलच नाही हे दूरदैव .कारण जरी धनगर सुसंस्कृत आसला तरी भटका असलेमुळे  निरक्षरच होता हे आपण समजुन घ्यावे ही धनगर समाजाची केविलवाणी कळकळीची विनंती आहे .
 आजअखेर या नागरी समाजाला समजावणेत स्वातंत्र्याची ६५ वर्ष गेली किती मोठी विकासाची दार केवळ लेखनिकाचे चुकीमुळे या समाजाला वंचित ठेवले आहे विचार करा कारण आपण समदुखी आहोत .आपण लवकर समजू शकाल .आज ज्यांची आदिवासी म्हणून आमलबजावनी होते त्याला धक्का न लावता ,तुमच आरक्षण सुरक्षित ठेउन NT-A, NT-B प्रमाणे मार्ग काढू या .देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदीनी घटनेत समाविष्ट आसलेले धनगरांचे आदिवासी हक्काची आमलबजावणीबाबत प्रचार केला आहे .महायूतीने सामाजिक न्याय या खाली धनगर आरक्षण आमलबजावणी चे मा देवेंद्र फडणवीस व सेनेचे मा सुभाष देसाई यानी आम्हाला लेखी दिले आहे .राज्यातील १२%धनगर समाजाचा विकासाच मार्ग उघडतो आहे .धनगर व ईतर आदिवासी वेगवेगळया भागात सुदैवाने एकवटले आहेत त्यामुळेआपले राजकीय भविष्य देखिल धोक्यात येणार नाही .राजकीय आरक्षण भागवार एकमेकाला आड़थळा होणार  नाही असे ठरवता येईल. आम्ही हे आरक्षण आता या लबाड़ाना दूसरा जोराचा  धक्का देऊन नक्की मिळवनार आहोतच आम्ही आज कोणाला जिंकवायचे व् कोणाला नाही या स्थितीत नक्की आलो आहोत हेही आपण हा विरोध करताना ध्यानी घ्यावे .  सत्या असत्यता न पहाता  ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी हे बर नव्हे "सत्यमेव जयते " हा प्राचीन संदेश विसरु नका .या आदिवासी हक्क आमलबजावणी मध्ये कायदेशीर लोकशाही मार्गाने होणारे लढाईत जे सोबत येतील त्यांच्यासह न येतील त्याना सोडून व विरोधात येतील त्याना राजकीय दृष्टया संपवून ही लढाई आम्ही जिंकणारच !

 आपले पुतळे जाळले , ही मोठी चूकच आहे .पुतळा शरदराव पवार यांचे विचाराचा जाळायला हवा होता कारण तेच तुम्हाला खोटी भीती घालत आहेत त्याबद्दल क्षमस्व !

संवादाने ५०%प्रश्न सुटतात हे आपण जाणता तरी या कळकळीची विनंती करणारया भारतीय धनगर परिषदेच्या खुल्या पत्राचा आपण सहजीवी आसल्याने सहानभूतीपूर्वक विचार करून या धनगरांचे आदिवासी हक्क आमलबजावणी कार्यात कोणाचही उलट सुलट न ऐकता मदत करून या भोळया भाबड्या समाजाचा दुवा घ्यावा .आपल्या विद्यमान आरक्षणास कोणताही धक्का न लावता हा प्रश्न सोडवणेचा प्रयत्न करू.

आपला मातृभुमीच्या सेवेतील सहकारी
          विजय ग गावडे ,
महासचिव ,भारतीय धनगर परिषद
         ७५८८१६७०३४