Thursday, September 11, 2014

घोळ धनगर, धनगड, धांगड चा....

धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत असूनही शासन या मुद्द्यावर अक्षम्य उदासीनता दाखवत आहे. धनगर समाजाने अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अमलबजावणी शासनाने त्वरीत करावी म्हणून दोन महिने जोरदार आंदोलन छेडले. परंतु झोपेचे सोंग घेतलेले सरकार आणि संबंधित यंत्रणा धनगर समाजाला घटनात्मक सवलतींपासून वंचित ठेवण्याचे पातक करीत आहेत. धनगर आरक्षणाबाबत अनुसूचित जमाती मंत्रालयाला माहितीच्या अधिकाराखाली काही प्रश्न विचारले. धनगर समाजाचा समावेश महाराष्ट्रात अनुसूचित जमातीत आहे का असे विचारले असता,
धनगरांचा समावेश अनुसूचित जमातीत नाही असे मंत्रालयाने उत्तर दिले. दुसरा प्रश्न असा विचारला होता कि भारतातील कोणकोणत्या राज्यात धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत आहे. या प्रश्नाला मंत्रालयाने उत्तर दिले कि 'बिहार, झारखंड आणि ओडिशा या तीन राज्यात धनगर ही अनुसूचित जमात आहे.

अनुसूचित जमाती मंत्रालयाशी झालेला हा पत्रव्यवहार नीट अभ्यासला तर त्यात विसंगती दिसून येते. त्यासाठी विविध राज्यातील अनु. जमातीची यादी नजरेखालून घालावी लागेल. ती यादी अनु. जमाती मंत्रालयाच्या website वर आहे. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये अनु. जमातीचा वार्षिक अहवाल आपणाला संबंधित website वरुन download करता येईल. परंतु सदर अहवालाच्या हिंदी प्रतिमध्ये अनेक ठिकाणी dhangad या इंग्रजी शब्दाचे भाषांतर वेगवेगळे दिले आहे. उदा. धनगड, धनगर, धांगड, धंगाद इ. आता इतक्या प्रकारे एकाच शब्दाचा उच्चार दिल्याने नेमक्या उच्चाराबाबत खूपच संभ्रम निर्माण झाला. कारण अनेक राज्याच्या यादीत स्पष्टपणे धनगर असाच उल्लेख आहे. (वार्षिक अहवाल, 2008-09, 09-10. हिंदी प्रत). परंतु संबंधित आयोगाने नमूद केले आहे कि जर अशा प्रकारचा संभ्रम निर्माण होत असेल तर इंग्रजी प्रत अधिक्रुत समजावी. त्यामुळे तुर्तास हिंदी अहवालातील 'धनगर' हा उल्लेख बाजूला ठेवू आणि संदर्भासाठी इंग्रजी अहवालाचा वापर करु. 

2012-13 चा recent अहवाल पाहिला असता त्यामध्ये धनगर समाजाच्या संदर्भात विविध राज्यात काय तरतूदी आहेत ते पाहू. माहिती अधिकारांतर्गत मागवलेल्या माहितीत अनु. जमाती मंत्रालयाने बिहार, झारखंड आणि ओडिशा या तीन राज्यात धनगर (dhangar) अनुसूचित जमात आहे असे नमूद केले आहे. तेव्हा या तीन राज्यात असलेल्या नोंदी पाहू.

बिहार (26)- Oraon, Dhangar (Oraon)
झारखंड (25)- Oraon, Dhangar (Oraon)
ओडिशा (53)- Oraon, Dhangar, Uran.

वरील तीनही राज्यात ओरान ची समकक्ष जमात म्हणून Dhangar (धनगर) जमातीचा उल्लेख केला आहे. उर्वरित राज्यांपैकी काही राज्यात Dhangar या शब्दाला Dhangad असे लिहिले आहे. आणि संबंधित यंत्रणांचे असे म्हणने आहे की Dhangad जमातDhangar (धनगर) जमातीपेक्षा वेगळी आहे. त्यासाठी खालील राज्यांच्या अनु. जमातीची नोंद पाहू.

छत्तीसगढ (33)- Oraon, Dhanka, Dhangad.
मध्यप्रदेश (35)- Oraon, Dhanka, Dhangad.
महाराष्ट्र (36)- Oraon, Dhangad.

आता बिहार, झारखंड, ओडिशा आणि छत्तीसगढ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र या राज्यांची अनु. जमातींची  तुलनात्मक नोंद पाहिली तर काही गोष्टी स्पष्ट होतील. 

1. धनगर आरक्षण विरोधक किंवा प्रशासन Dhangar आणि Dhangad या भिन्न जमाती आहेत असे वारंवार सांगत असले तरी या दोनही जमातींची नोंद Oraon या पूर्व भारतात आढळणार्या जमातीबरोबर आहे. 

2. जर Dhangar आणि Dhangad भिन्न असते आणि Dhangad ही Oraon ची उपजमात असती तर फक्त Dhangad जमातीचाच उल्लेख Oraon सोबत करायला हवा होता. Dhangar जमातीचा Oraon शी दुरान्वयानेही संबंध नसता तर Dhangar या जमातीची नोंद Oraon सोबत न करता ती स्वतंत्र केली असती. परंतु  एकच जमात विविध नावाने ओळखली जात असेल तर त्यांचा उल्लेख एकाच नंबरवर करण्यात येतो. त्याचप्रमाणे समकक्ष जमातींची नोंदही एकाच अनु. क्र. वर केलेली आढळते. त्यामुळे Dhangar आणि Dhangad या दोन भिन्न जमाती नसून एकच असल्याच्या म्हणन्याला बळकटी मिळते.

3. आरक्षण विरोधकांचा एक प्रमुख मुद्दा म्हणजे Dhangad ही जमात महाराष्ट्रात आढळत नसून छोटा नागपूर भागात आढळते. आता आरक्षणविरोधकांचे हे मत आणि अनु. जमातीची यादी पाहिली तर दोन मुद्दे समोर येतात.
अ) Dhangad ही जमात छोटा नागपूर (म्हणजे बिहार आणि झारखंडचा परिसर) मध्ये आढळत असेल तर बिहार, झारखंड आणि छत्तीसगढ या राज्यात Dhangar ऐवजी Dhanagd जमातीचा समावेश अनु. जमातीत व्हायला पाहिजे होता. पण असे न होता या तीनही राज्यात Dhangar (धनगर) जमातीचा समावेश अनु. जमातीत आहे. म्हणजे एखादी आदिवासी जमात प्रामुख्याने ज्या राज्यात राहते असे सांगितले जाते त्या राज्यातच संबंधित जमातीची नोंद सापडत नाही. 
ब) मात्र महाराष्ट्रासारख्या ज्या राज्यात Dhangad ही जमात आढळत नाही, जिथे Dhangar (धनगर) जमातीचे वास्तव्य आहे तिथे मात्र अनु. जमातीच्या यादीत Dhangad अशी नोंद आढळते. हा विरोधाभास समजून घेतला तर Dhangar आणि Dhangad एकच आहेत हे लक्षात येते.

हे फक्त Dhangar आणि Dhangad असे शब्दप्रयोग असणार्या, shepherd community ला धनगर या नावाने जिथे ओळखले जाते त्याच राज्याच्या नोंदी आपण पाहिल्या. याव्यतिरिक्त विविध राज्यातील पशूपालक, Shepherd community बाबत अनु. जमातीच्या ज्या नोंदी आहेत त्या पाहू.

1. गुजरात (24)- Rabari (in the nesses of the     forests of Alech, Barada & Gir)
2. हिमाचल प्रदेश (2)- Gaddi
3. जम्मू आणि काश्मीर (10)- बकरवल
4. कर्नाटक (28)- कुरुब (in the Coorg dist)
                (29)- Kurumans
5. केरळ (17)- Kurumans, Mullu Kuruman,      Mulla Kuruman, Mala Kuruman
    (18)- Kurumbas, Kurumbar,                   Kurumban
       (37)- Ten Kurumban, Jenu Kurumban 
6. तमिळनाडू (17)- Kurumbas (in the Nilgiri dist)
                  (18)- Kurumans

वरील यादीत नमूद केलेल्या जमातींची नोंद अनु. जमातीत असून त्या सर्व जाती धनगर समाजाशी व्यवसाय, चालिरिती, परंपरा, दैवते, कुळाचार अशा एक किंवा अनेक बाबीत साधर्म्य दाखवतात.

         दक्षिण भारतात आढळणार्या कुरुब, कुरुबर, कुरुमान या जमाती तर महाराष्ट्रातल्या धनगरांशी खूप साम्य दाखवतात. दोघांचेही देव बिरोबा आणि खंडोबा. दक्षिणेत त्यांचा उल्लेख बीरलिंगेश्वर आणि मैलारलिंगेश्वर असा केला जातो धनगरी ओव्या, गजी न्रुत्य, ढोल वादन हे समान सांस्क्रुतिक घटक आढळतात. भारतातील धनगरांची वेषभुषा पाहिली तर ती कमी अधिक प्रमाणात समान आढळते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या सर्व पशूपालक, धनगर जाती विविध नावाने ओळखल्या जात असल्या तरी त्यांच्या मागासलेपणाला कारणीभूत ठरलेला प्रमुख घटक म्हणजे पशूपालन. कारण काळाच्या ओघात कुरणांची समस्या, आधुनिक तंत्राचा अभाव, पशूपालनाच्या पारंपारिक पद्धती, पशूपालनामुळे आलेले सततचे भटके, अस्थिर जीवन, त्यामूळे शिक्षण घेण्यात येणार्या अडचणी, पशूपालनामूळे डोंगर दर्यात, जंगलात वास्तव्य, त्यामुळे निर्माण झालेली स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण संस्क्रुती, त्यांचे भौगोलिक अस्तित्व, हलाखीची आर्थिक परिस्थिती अशा सर्व बाबतीत संपूर्ण भारतातील पशूपालक समाजाची अवस्था समान आहे. त्यामूळेच अपवाद वगळता संपूर्ण भारतात पशूपालक धनगर जमाती जरी विविध नावाने ओळखल्या जात असल्या तरी त्यांचा समावेश अनु. जमातीत केला गेला आहे. परंतू आजही काही राज्यात नतद्रुष्ट राज्यकर्त्यामूळे या पशूपालक समाजाला आजही आपल्या हक्कंसाठी झगडावे लागत आहे. स्वांत्र्य मिळून पासष्ट वर्षे उलटून गेली तरी या उपेक्षित, भोळ्या भाबड्या समाजाला आपल्या घटनात्मक हक्कांपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र मनूवादी आणि सरंजामदारी प्रव्रुत्तींकडून होत आहे. परंतू याची किंमत त्याना भावी काळात चुकवावीच लागेल.

प्रकाश लालासाहेब पोळ,
कराड, सातारा.
मोबा. 7588204128.
www.dhangarsamaj.blogspot.in
www.sahyadribana.com          

0 comments: