महादेव जानकर



राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. महादेव जानकर यांचा जन्म १९ एप्रिल १९६८ रोजी झाला. बी. ई. पदवीधारक मा. महादेव जानकर यांनी 'मी लग्न करणार नही, मी स्वताची संपत्ती बनवणार नही आणि समाज प्रबोधानाकरिता मतशक्तीच्या जोरावर राष्ट्रीय समाजाच्या हाती राजसत्ता मिळवून देण्यासाठी आजन्म कार्यरत राहीन, अशी शपथ १९८८ साली घेतली. त्यांनी यशवंत सेनेच्या माध्यमातून १५ वर्षे धनगर-बहुजन समाजात सामाजिक आणि राजकीय जागृतीसाठी अनेक कार्यक्रम राबवले. भारतात विविध जाती-धर्माचे अनेक मुलनिवासी समुदाय आहेत. या समुदायाला महादेव जानकर यांनी एकात्मता दर्शवणारे, बलवाचक असे 'राष्ट्रीय समाज' हे नाव दिले. ३१ मे २००३ साली राष्ट्रीय समाज पक्षाचि स्थापना महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव चौंडी येथे केली. राष्ट्रीय समाज पक्ष 'जाती-धर्म-भाषा जोडो, राष्ट्रीय समाज बनाओ, राष्ट्रीय समाज बनकर भारत पार राज करो.' बहुजन समाजाला अशक्य असे काहीच नाही. कारण संत तुकोबाराय म्हणतात,
असाध्य ते साध्य! करिता सायास !!
कारण अभ्यास ! तुका म्हणे !!
रा.स.प.-आपल्याच आत्मसन्मानाची, परिवर्तनाची लढाई. राष्ट्रीय समाजाचा अभिमान बाळगा.

RSP ☛ The Voice of the Silent Majority !!!

" गेल्या ६० वर्षात ' इंडिया गब्बर ' बनला आणि ' भारत दरिद्री ' बनला. याला भारतीय राज्यकर्त्याबरोबरच शासन - प्रशासन जबाबदार आहे. बुद्धिजीवी वर्गदेखिल तितकाचं जबाबदार आहे. ठराविक आणि तेही घरानेशाहींच्या - माफियांच्या हाती राज्य देवून, मनुवादी आणि मनिवादी यांचे साटेलोटे भारतावर शासन करीत आहे. आता ...९०% बहुजन , ज्याला आम्ही ' राष्ट्रीय समाज ' असे बलवाचक नाव दिले आहे, त्यांचे राज्य या देशावर प्रस्थापित झाल्याशिवाय भारतातील भयानक विषमता दूर होणार नाही, ही ' विषमता दूर करण्यासाठीचं ' राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना आम्ही केली.


मेंढरामागे फिरणाऱ्या आईच्या पोटी रानोमाळावर कुठेतरी मी जन्मलो. जन्मत:च मी भटका आहे. राष्ट्रीय समाज ' सत्तेविना समस्याग्रस्त ' असल्याने, सत्तेच्या शोधात आई - वडिलांपासून, नातेवैकांपासून बाजूला गेलो. १९८८ साली ' राष्ट्रीय समाजाला सत्ता - संपत्ती - सन्मान ' मिळवून देने हे लक्ष्य ठरविले. त्यासाठी लग्न करणार नाही, स्वत:ची संपत्ती करणार नाही, नातेवैकांशी संबध ठेवणार नाही आणि आजन्म कार्यरत राहीन, अशी शपथ घेउन , ' समर्थ भारत निर्माण ' करण्याची जबाबदारी घेवून कामाला लागलो...✍

- - इंजि. महादेवजी जानकर ( राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पार्टी )

Sab Saman toh Desh Mahan ! Pyar se Kaho hum Sab Ek Hai !! Join RSP !!!

0 comments: