Sunday, August 17, 2014

मा. शरद पवार ( राष्ट्रिय अध्यक्ष राष्ट्रवादी पार्टी ) यांना पत्र


शरद पवार
माननीय शरद्चंद्रजी पवार यांना होमेश भुजाडे यांचा सप्रेम जय मल्हार वि. वि.


अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून धनगर समाजाचे महाराष्ट्रात राज्यव्यापी आंदोलन प्रचंड ताकदिनीशी सुरू आहे.
धनगड - धनगर एकच असून त्यांना संविधानाप्रमाणे आरक्षण मिळावे यासाठी अनेकदा आंदोलनं झालित. ही मागणी काही नविन नाही. धनगर जमातीवर गेली ६४ वर्षे झालेला अन्याय व या जमातीचे एवढी वर्षे झालेले सर्वांगिण नूकसान भरून न निघणारे आहे.

आपण १९७८ - १९८०, १९८८ -१९९१, १९९३ -१९९५ या कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले होते. नंतर केंद्रशासनातही आपण मंत्री पदं भुषवलीत. आपण प्रत्येक निवडणूक ही निवडून येताच धनगरांना ST चे आरक्षण लागू करू असे आश्वासन देत धनगरांच्या मतांवर डोळा ठेवत लढवली आणि सत्तेची मधूर फळ चाखलीत.

१९८९ ला नागपूर विधानसभेवर ST आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी धनगर जमातीने मोर्चा काढला तेंव्हा आपण राज्याचे मुख्यमंत्री होते. पाच लाखाहून अधिक धनगरांनी महाराष्ट्रातून हजेरी लावली. एवढ्या मोठ्या संख्येने धनगर येणार नाहित हा आपला अंदाज फसला. आदिवासींच्या प्रस्थापित नेत्यांना गोंजारण्याच्या नादात आपण या मोर्च्याला समोर येण्याचे सौजन्यही दाखवले नाही. उलट मिटींगचा बहाना करत नागपूरवरून पळ काढला आणि तेंव्हाचे कृषी मंत्री विलासराव देशमूख यांना वेळ मारून नेण्याच्या डावपेचाने पाठवले होते.

धनगर जमातीचा रेटा कायम राहिला लगेच दोन वर्षांनी राज्यात निवडणूका होऊ घातल्या होत्या. धनगरांचा रोष असाच कायम राहिला तर त्याचा फटका बसेल हे आपणास द्नात असल्यामूळे आदिवासी नेत्यांना न् दुखावण्याचे अट्टहासाने धनगर जमातीस १७ जानेवारी १९९० रोजी NT चे असंवैधानिक आरक्षण देऊन धनगरांच्या ST च्या आरक्षण आंदोलनास आपण मोडून काढले हा इतिहास आहे.

आपले जातभाई राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले मान . यशवंतराव चव्हाण हे आपल्या समाजबांधवांना एकांतात सांगतांना म्हणाले होते की धनगरांना एक ऐवजी दोन घोंगडे टाकून झोपवा . पण त्यांना सत्ता, पद, प्रतिष्ठा यापासून दूर ठेवा . ही जमात जागी झाली तर आपल्याशी दोन हात करणारी प्रतीस्पर्धी जमात आहे . असा हितोपदेश त्यांनी केला होता . हा वारसा आपण अखंडपणे पूढे चालवला हे आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवरून दिसून येते .तरी पण आपण काल धनगरांच्या ST च्या आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत धनगड - धनगर एकच असल्याचे पत्र मान. प्रधान मंत्री यांना पाठवल्याचे आपल्या श्रीमूखातील बोल कोणत्यातरी कूटनितीची नांदी राहूच शकत नाही असे म्हणता येणार नाही. तरी सुद्धा आम्ही धनगर आपल्या डोक्यात आपलाच मेंदू शाबूत ठेवून आपल्या भूमिकेचे स्वागत व अभिनंदन करतो. ( क्रमशः)

0 comments: