Friday, January 9, 2015

🌴धनगर जमात आणि जाग्रुती 🌴

धनगर जमाती च्या आजच्या परिस्थितीचे अवलौकन केल्यास  असे लक्षात येते की, या जमाती मध्ये जाग्रुतीची मशाल पेटली आहे. माञ यामध्ये  सामाजिक  जागृती सोबतच राजकीय  जाग्रुतीला महत्त्व देणे अत्यावश्यक आहे. सर्वांगिण प्रगतीची गाडी सामाजिक  जाग्रुतीच्या ट्र्याक वरुन धावत असताना  राजकीय  सत्तेच्या पावरची साथ असल्यास तिचा वेग वाढविणे  शक्य होईल हे सत्य आहे .धनगरांचा  पारंपारिक  शञू  मराठा
व ब्राम्हण यांच्या तूलनेत धनगर  आज  कमजोर ठरले याचे कारण त्यांनी  आपल्या  राजकीय  अस्तित्वाकडे लक्ष च दिले नाही . माजी धनगर समाज सुधारकानी (भारतीय  लोकशाही तील) कैवळ समाजात त्यांच्या परीने जाग्रुती केली  असे म्हणता येईल . परंतु  राजकीय  अस्तित्वा कडे जाग्रुत नजरेनं कधी पाहील नाही . त्यांनी आपले  अनुयायी  बनविले परंतु राजकीय  नेत्यांची फळी निर्माण  करण्याची  त्यांना कल्पना च आली नाही .  त्यामुळे  हे नेते काळाबरोबर टिकू शकले नाही. त्यामुळे जीवनभर हे नेते वापरा व फेका नितीचे बळी ठरले. अशा नेत्याबाबत आजही आपण  पहातो आहे.  केवळ समाजाचा नेता म्हणून मिरविणार्या नेत्याची व त्याच्या शब्दाच्या बाहेर  न जाणाऱ्या  अनुयायांची अवस्था पाहता लक्षात  येते  . यामध्ये  त्यांचा व्यक्तीगत विकास  नक्कीच झाला  परंतु सामाजिक  विकास कोसो दूर गेला. म्हणून यापुढे  दिर्घकालीन प्रगतीची  वाट निर्माण करण्यासाठी राजकीय जाग्रुतीला व राजकीय नेत्रूत्व विकासाला  महत्त्व  देणे अत्यावश्यक  आहे.

🌴  डाँ  प्रभाकर लोंढे  गोदिया🌴

0 comments: