Tuesday, July 8, 2014

क्रांतिजोति सावित्रीबाई फुले विद्यापीठ हार्दिक स्वागत !

क्रांतिजोती सावित्रीबाई फुले विद्यापीठ झाल सहर्ष स्वागत !
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ कधी ?
----------------------------
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठ अस पुणे विद्यापीठाच नामकरण करणे सरकारला भाग पडले हे यश तुम्हा आम्हा फुलेप्रेमी जनतेच आहे .    याबद्दल सर्व फुलेप्रेमी बंधवाना खुप खुप धन्यवाद !
शिक्षणाची दार सर्व बहुजन समाजास प्रसंगी शेणगोळे अंगावर झेलुनही उघडली . त्या सावित्रीमायचा हा खरा गौरव आहे    ही मागणी रेटली नसती तर पुढची आनेक वर्ष हे घडल नसत आस मला वाटत .

   आता  याचवेळी अअहिल्यादेवी होळकर विद्यापीठ  नामकरण का नाही ?
महिला सबलीकरणाचा हा काळ येतोय आजही तुमची   माझी माय  आपल्या घरात तरी सुरक्षित आहे का ? तिला जन्मापुर्वीच मारल जातय .
          महिलासबलीकरणाचा आदर्श समाजासमोर ठेवणेत सरकार किती जाणीव पूर्वक डोळेझाक करतय पहा .                      २५० वर्षापूर्वीही माता भगिनी ज्या घरात सुरक्षितच नव्हे तर शासनकर्त्या , राजकर्ता झाल्या त्या होळकर कुटुंबाकड़े सरकार आणखी  किती दिवस डोळेझाक करणार आहे  ? नाक दाबले शिवाय तोंड उघडत नसत हेच खर हे प्रेमाने करतील यावरील उरला सुरला विशवास आता  संपला .
         मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होळकरवाड्यात लहानाचे मोठे झाले .त्यांचे आजोबा मामा जगदाळे हे होळकर दरबारी होते .मुख्यमंत्री चव्हाणयांच्या मातोश्री  प्रमिलाकाकी चव्हाण नेहमी म्हणत "माझा देह धनगरांचे अन्नावर पोसला आहे .त्या पृथ्वीराज बाबांकडून धनगर समाजाला न्याय मिळेल असे वाटत होते पण आता व्यर्थ वाटू लागलय !
      सोलापुर विद्यापीठाच नामकरण सहजच पुण्यश्लोक मातोश्री अहिल्यादेवी होळकर होईल अस वाटल होत .
मराठेशाहिचा जरीपटका डौलाने पडत्या काळात उंच धरून इंग्रजी सेनेला ऐक नव्हे तब्बल १८ वेळा पराभुत करणारा ,सपाट प्रदेशातील गनिमीकावा युध्द तंत्रातील सर्वोच्य सेनानी महाराजा यशवंतराव होळकर यांचे पुणे जिल्हातील वाफगाव (खेड) येथील  सुस्थितीत असलेला     होळकरवाडा  राष्ट्रिय स्मारक घोषित होईल आशी भाबडी आशा धनगर बांधव बाळगुण आहेत .
          आजही १५ - २१ जुलै २०१४ ची आदिवासी हक्क आमलबजावणी संघर्ष पदयात्रा काढू नये आघाडी सरकार विषयी असंतोष निर्माण करू नका ते नक्की आरक्षण लागू करतील आशी पक्की खुणगाठ आनेकांच्या मनात आजही आहे .किती हां  पराकोटीचा विशवास
    आडिचशे वर्षापूर्वी समर्थपणे आदर्श राज्यकरभारा चा धडा घालून देणारी अहिल्यामाता या कोंग्रेस सरकारचे "लेक वाचवा " आभियानाचे जाहिरातीत माझ्या जिजाऊमासाहेबा  सोबत का दाखवली जात नाही याच उत्तर हे भोळेभाबडे नेते देतील का ?
     परोपकार म्हणजेच पुण्य व परपीड़ा देण म्हणजे पाप हा साधा सोपा धनगरी संस्कार ज्यानी प्रत्यक्ष कृतित उतरवला आस हे होळकर घराण . पाणपोई ,आन्नछात्र ,रस्ते ,विहिरी ,घाट जेवढे पेशवेदेखिल बंधु शकले नाहित येवढ भव्य दिव्य काम मातोश्री अहिल्यादेवीनी उभारल .औरंगजेबान उध्वस्त उकिरडा केलेला संपूर्ण सांस्कृतिक भारत पुन्हा ज्या माउलीन पुन्हा उभारला तिच्या या परोपकारी कार्याचा आदर्श भावीपीढ़ीपुढे येऊ नये आसे या राज्यकर्त्याना का वाटते ?
अहिल्यादेवीनी मठ मंदिरही पुन्हा उभारली हे खर आहे .ती पुजारी लोकांना दक्षणा मिळावी म्हणून नव्हे तर या भूमीत महामानव  राम ,कृष्ण पांडव  ,शिवराय ,महात्मा गांधी ,आन्ना हजारे यांचेच निस्वार्थी परोपकारी विचार जिंकतात ही भाव जागृती सर्व जनतेत निर्माण व्हावी ही ती मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांची आंतरिकईच्छा  म्हणुनच त्यांच्या पावनस्पर्शान पुनीत झालेल्या ठिकाणी जी स्मृतिमंदिरे होती ती पुन्हा उभारून घेतली व जनतेतला सत्या वरील विशवास वाढवला .कारण "सत्य " हाच खरा परमेश्वर आसतो हां धनगरी संस्कार .५० पैशाची हाळद भंडारा म्हणून लावली जाताच हा समाज दिल्या बोलाला जागतो हे निवडणुकित माहिर असलेल्या आजच्या राज्यकर्त्याना माहीत आहे .असे शब्दात काही धनगर नेते आजही आडकवले गेलेत की काय आसे वाटते
सत्य ,न्याय ,निति ,प्रमाणिकपणा या मानवी जीवनमुल्यांच्या भावी पीढ़ीवरील संस्कारासाठी या आघाडी सरकारने सोलापुर विद्यापीठाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ नामकरण , महाराजा यशवंतराव होळकर यांच जन्म ठिकाण असलेला वाफगावचा होळकरवाडा राष्टीय स्मारक व सर्वात महत्वाच होळकरी समाजाच्या विकासाची दार उघडणारा आदिवासी आरक्षण आमलबजावणीचा व्हायलाच हवा .
  येणारे सरकार हे करेलच नुकतीच नितिनजी गडकरी व देवेंद्र फाडणविस यांची आम्ही भेट घेतली आहे .केंद्रीय आदिवासी मंत्र्यानी लवकरच या विषयावर  भेटीची वेळ दिली आहे 
  विजय ग. गावडे, महासचिव
    भारतीय धनगर परिषद  
        ०७५८८१६७०३४
-------------------------
आरक्षण संघर्ष पदयात्रा व जिल्हाश: होणारे मोर्चे यामध्ये सामिल व्हावे ही विनंती !

0 comments: