Monday, July 28, 2014

आदिवासी नेत्यांच्या प्रश्नाना उत्तरे

होमेश भुजाडे सर 
विचारवंत आणि लेखक 

सर्वप्रथम ST च्या आरक्षणाच्या अम्मलबजावणीसाठी महाराष्ट्रभर जन आंदोलन उभे करणा-या माझ्या समस्त सर्वसामान्य बंधू - भगिनीचे अभिनंदन !
तद्वतच मानवतावादी दृष्टीकोन ठेऊन धनगरांसह तत्सम जमातींना ST च्या आरक्षणाच्या सवलती लागू व्हाव्यात म्हणून पुण्यात गेली दोन दिवस उपोषणाला बसून नुकतेच उपोषण मागे घेणारे प्रसिद्ध साहित्यिक सन्माननिय संजयजी सोनवणी सर यांचे शतशः ऋणानुभार ....
आदिवासीचे नेते म्हणून मिरवणा-यांच्या प्रश्नास उत्तर
---------------------------------------------
---
प्र .1) धनगर - धनगड एक नसुन भिन्न आहेत .
उ.- महाराष्ट्रात ST मध्ये समाविष्ट असणारी धनगड जमात कोठे वास्तव्यास आहे ते तुम्हीच दाखवून द्या. अन्यथा धनगर व धनगड हे एकच आहे हे मान्य करा.
प्र 2) धनगर ही जामात नसून जात आहे.
उ. धनगरांना तात्पुरते का होईना पण राज्य शासनाने दिलेले आरक्षण भटकी जमात म्हणूनच दिलेले आहे. NT चे आरक्षण देतांना धनगर हे जमात ठरते आणि ST च्या आरक्षणासाठी धनगर ही जात कशीकाय ठरते ? देशविदेशातील अनेक समाजशास्त्रद्न्य व मानवंश शास्त्रद्न्यांनी धनगर ही जात नसून ती जमात आहे हे त्यांनी त्यांच्या ग्रंथात नोंदवून ठेवलेले आहे. तुम्ही धनगरांना जमात न मानणारे कोण ?
प्र 3) धनगर हे SC चे आरक्षण का मागत नाहीत ? कारण SC हे जागृत आहेत ST हे जागृत नाहीत.
उ. - महाराष्ट्रराज्यात धनगर हे अनुसूचित जमातीमध्ये येत असतांना SC चे आरक्षणच कशाला मागणार ? बिहार, प. बंगाल व UP या राज्यात धनगरांचा समावेश अस्पृश लेखल्या गेल्यामुळे SC मध्ये आहेच. UP मध्ये धनगरांच्या SC च्या सवलती मध्यंतरी बंद केल्यामुळे तेथेही तिव्र जन आंदोलन सुरूच आहे. हे आपणास माहित नसावे.
प्र.4) जसे काही जाती दुस-या प्रांतात ST मध्ये येतात म्हणून त्यांना महाराष्ट्रात ST चे आरक्षण द्यावे काय? 
उ. - धनगर हे काही राज्यात ST मध्ये येते म्हणून आम्ही ST चे आरक्षण मागत नाही. तर अनेक ग्रंथांमध्ये महाराष्ट्रातील धनगर (धनगड) -ओरान हे पशुपालक समकक्ष जमाती आहेत असे नोंदवलेले आहे. आणि त्या अनुसूचित जमाती आहेत असेही नोदवलेले आहे. मग आम्ही आमचा हक्क मागतो त्यात गैर तरी काय ? 
प्र. 5 डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जमातीच्या यादित धनगड हे नाव लिहिले आहे धनगर नव्हे ? धनगरांचा समावेश ओबीसीत केलेला आहे.
उ. - संविधानाच्या अंम्मलबजावणीनंतर आरक्षणाच्या कक्षेतून सुटलेल्या पण आरक्षणाच्या हक्कदार असणा-या कितीतरी जातींना संविधान अम्मलबजावणीनंतर SC, ST, OBC या प्रवर्गात समाविष्ट केलेले आहे. तेव्हा यादित समाविष्ट नसल्यामुळे देय्य असणारा आरक्षणाचा हक्क एखाद्या जातीला नाकारता येत नाही . ST च्या यादीत आधिच धनगरांचा समावेश आहे . धनगड व धनगर हे एकच असल्याचे कागदोपत्री नोंद आहे. केवळ उच्चारातील शाब्दिक चूक दुरूस्त करून गेल्या 64 वर्षापासून डावललेला आमचा न्याय हक्क आम्हाला मिळावा एवढीच माफक मागणी.
प्र.6 धनगरांची ST ची आरक्षणाची मांगणी असंवैधानिक आहे.
उ.- आमची मागणी संवैधानिक की असंवैधानिक हे ठरविणारे तुम्ही कोण ?
प्र.7) धनगर हे बोगस आदिवासी आहेत . त्यांनी आदिवासिंचे आरक्षण लाटले .
उत्तर - धनगर मूलतः च आदिवासी आहेत . धनगरांचा समावेश ST मध्ये असतांना सुद्धा त्याचा लाभ धनगरांना मिळालेला नाही .त्यामूळे गेली 64 वर्षे धनगरांचे आरक्षण तूम्ही लाटले.
महाराष्ट्र राज्याला केंद्राकडून मिळणारा आदिवासी विकास निधी हा धनगरांचीही लोकसंख्या विचारात घेऊन दिला जातो. तो निधी घेतांना धनगर बोगस आदिवासी ठरत नाहित पण ST च्या आरक्षणची अम्मलबजावणी करण्याची मागणी करताच ते बोगस आदिवासी कसे काय ठरतात ?

0 comments: