Tuesday, July 29, 2014

पुरके -मोघे -पिचड -वळवी हे घ्या पुरावे

Prof. Homesh Bhujade

Homesh Bhujade, Writer & Social activists.

१) पहिल्या मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष काकासाहेब कालेलकर यांच्या अहवालानुसार धनगड व धनगर एकच असल्याचे नोंदवलेले आहे. धनगर हे अतिमागास असून त्यांना आदिवासीच संबोधलेले आहे.
केंद्र सरकारने OBC करिता जरी हा आयोग स्विकारलेला नसला तरी SC व ST च्या अनुषंगाने सुचवलेल्या शिफारशी व दुरूस्त्या मात्र स्विकारलेल्या आहेत. मग धनगरांना ST चे आरक्षण का नाकारले जाते ?

२) केद्र सरकारने डी. पी मंडल आयोग देशातील मागास जाती जमातीची पाहणी करण्यासाठी नेमलेला होता. त्या आयोगाने महाराष्ट्रातील सर्व भागात दौरे करून धनगर जमातीची पाहणी केली. तेव्हा त्यांनी 'धनगर ' व 'धनगड' या दोंन्ही जमाती वेगवेगळ्या नसून एकच असल्याचे अहवालात नोंदवलेले आहे.
या संदर्भात महाराष्ट्राच्या विधानसभेत चिमणराव कदम यांनी वरिल विषयाच्या अनुषंगाने ८ एप्रील १९८२ रोजी सभागृहात प्रश्न सुद्धा उपस्थीत केलेला होता. 


३) " CENSUS OF INDIA OCCASIONAL PAPER I OF 1982 BIBLIOGRAPHY ON SCHEDULED CASTES AND SCHEDULED TRIBES " या शासनाच्या पुस्तकात पृष्ठ क्र. ८७ वर DHANGAD, DHANGAR असे शिर्षक देवून दोन्ही शब्द एकच दर्शवून दोन्हीची माहीती समकक्ष दर्शविलेली आहे. या दोन्ही शब्दाच्या जाती बिहार, उत्तरप्रदेश,आणि पश्चिम बंगालमध्ये अनुसूचित जातिमध्ये तर मध्यप्रदेश व महाराष्ट्रात अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट असल्याचे स्पष्ट लिहिलेले आहे.
तरी गेली ६४ वर्षे आमच्या अद्न्यानीपणाचा व जागृत नसण्याचा फायदा तुम्ही घेतला. आता धनगर आपला हक्क मागतो तेव्हा धनगर व धनगड वेगळे असण्याचा नौटंक्की पण दर्शवून दिशाभूल करता .
तुमचे खरे की पुस्तकात लिहीलेले खरे कोणते योग्य तुम्हीच ठरवा. हवे तर धनगर ओरान धनगड एकच असल्याचे आणखी सबळ पुरावे देतो.  

४) इ.स.१९३१ मध्ये ब्रिटीश सरकारने केलेल्या जातीनिहाय जनगणनेमध्ये 'ओरान ' या जमातीची समक्ष जमात म्हणून 'धनगर ' ही जमात दर्शविलेली आहे. भारतीय संस्कृती कोश, The wild Tribes of India ( पृष्ठ क्र. ७८-७९) , Tribal Culture of india (पृष्ठ क्र. ११२) , some Indian Tribes ( पृष्ठ क्र. १३१ - १३२) , society in Trible india ( पृ ष्ठ क्र. २२) अशा कितीतरी ग्रंथांमध्ये ओरान या जमातीची समकक्ष जमात म्हणून ' धनगर ' असल्याचे नोंदवलेले आहे.

मग महाराष्ट्रात धनगरांना अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून महाराष्ट्रातील मराठावादी व मनुवादी प्रवृत्तीच्या राज्यकर्त्यांनी जाणीवपुर्वक वंचित ठेवण्याचे षडयंत्र गेल्या ६४ वर्षापासून सुरू आहे. धनगरांनी आपल्या हक्काची मागणी केली तर त्यात गैर काय ?
 

0 comments: