Wednesday, July 2, 2014

राज्यघटनेत धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश आहे

ही लिस्ट आपल्या भारत सरकारच्या ST च्या जातींची यादी यामध्ये ३६ नंबरला धनगड असे लिहले आहे महराष्ट्राच्या ST यादीमध्ये, आणि विशेष म्हणजे धनगड ह्या जातीचा एकही माणूस आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही कारण तो अस्तित्वातच नव्हता.हे धनगड नसून धनगर आहे हे अनेक पुराव्याने सिद्ध केले आहे तरी ...हे सरकार डोळे असून आंधळ्याचे सोंगघेत आहे ....

काही लोकाना असे वाटते की धनगर समाज आरक्षणाबाबत चुकीचि भुमिका मांडत आहे. मुळात केंद्राच्या अनुसूचित जमातिच्या यादीत अनुछेद 36 वर ओरान, धनगड अशी नोंद आहे. आता धनगड ही जमात कुठे
असेल तर सरकारने दाखवून द्यावे. पण धनगड जमातिचे अस्तित्व कुठेही आढळत नाही, कारण धनगर म्हणजेच धनगड आहेत. एकतर सरकारने धनगड जमात अस्तित्वात आहे हे सिद्ध करावे किंवा धनगराना एस. टी. चा दर्जा द्यावा.

0 comments: