२)फक्त ऐकीव गोष्टी बद्दल प्रचंड विश्वास(कर्ण गोचर ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ ज्ञान अशी समजुत.)
३)विवेक वादी विचार न करता परंपरेप्रमाणे चालत आहे, कोणा बरोबर जेवावे व काय जेवावे,
झोपताना डोके कोणा कडे करावे व पाय कोणत्या दिशेला असावेत ,कोणत्या दिशेला असु नयेत,
प्रवास केव्हा करावा ,कोणत्या समयी करावा
कोणत्या दिशेस करावा,
कोणत्या दिशेस जावू नये
हजामत कोणत्या वारी करावी व कोणत्या वारी करु नये.
अशा सर्व ऐकीव बाबी डोक्यात फिट्ट बसल्या आहेत.
४)प्रत्येक महीन्यांचे रुतुंचे ,तिथीचे,निरनिराळे आचार विचार व व्रते न चुकता पाळली जातात.नवस सायास,उद्यापणे,जत्रा,यात्रा ,केशवपन,
या सर्वांची महती आगाद आहे
अशी भितीयुक्त व ईतर काय म्हणतील ? अशी श्रद्धा.
५)घरात कोणी आजारी पडले,आकस्मात जनावर शेळी मेंढी घोडा मेले,धंद्यात ,नोकरीत,अपयश आले
हे सर्व कोणीतरी पिशाच्य,किंवा आलौकिक शक्ती चा या पाठीमागे हात आहे ,तिच सर्व करते अशी भितीयुक्त समजुत.
६)घर,विहीर,दरवाजा,चुल,भिंती,आढे,ओसाड जागा,नदी तलाव वृक्ष माळ,पर्वत ,आकाश या दाही दिशासअदृश्य शक्तीचा भरणा आहे,प्रताप आहे ही भोळी समजुत.
बुद्धीवादामुळे जुन्या परंपरेतील गुण दोषांचा विवेक करणारी दृष्टी लाभते,आणि वैज्ञानिक दृष्टीने आचारविचार पध्दती सुधारण्याची प्रेरणा मिळत असते हे कायम लक्षात ठेवावे.
जय मल्हार
जय अहिल्याई
(पारखे हरिश)
0 comments:
Post a Comment