दुसर्यानं म्हणायचं न्याय्य मागणी नसे,
कसले हे तुमचे दु तोंडी धोरण असे,
गरज लागली की म्हणायचे देतो,
गरज सरली की म्हणायचे धीरधरा,
मध्येच असे पिल्लु सोडायचं,
अन, सतत धनगरांच्या भावनांशी खेळायच.
जीव तोडुन सांगतोत अदिवासीच हाय,
काय पण केल तरी आता गप बसणार नाय,
कैक पुराव मांडलं,पण अजुन तुम्हाला उमगलं नाय,
त्यो दोष आमचा नाय,त्यो तुमच्या मतीचा हाय,
ते तुमचं तुम्हीच ठरवायचं,
अन,सतत धनगरांच्या भावनांशी खेळायचं.
ठेवलं जाणुन वंचित कैक वर्षै,
हात मिळवणी तुमचीच,नाही मिळू दिला हर्ष,
राग ,त्यांच्यावर पण हाय,
पण आता त्यांच्या जागी तुमी हाय,
मग बोला आता तुमचं काय?
असचं धनगरांच्या भावनांशी खेळायच.
मग,तुमच्यात अन त्यांच्यात फरक काय?
नव्हती तव्हा जागृती समाज होता निद्रिस्त,
म्हणुन तुमचं अन त्यांच फावलं,
आता कैक पुराव आम्हाला गाव्हलं,
वेळोवेळी त्यांना न तुम्हाला दावल,
पण अजुन धनगरांना आरक्षण नाही गाव्हलं
जय मल्हार
जय अहिल्याई
🙏🙏(पारखे हरिष)🙏🙏
0 comments:
Post a Comment