Friday, December 26, 2014

धनगरांची राजकीय उपेक्षा का ?

स्वातंञ्याची 67 वर्षे उलटून गेलीत. परंतू महाराष्टर् राज्यात लोकसंख्येने दिड - दोन कोटी असणा-या  समाजास आजपर्यंत लोकसभा व
राज्यसभा या संसदेच्या एकाही सभागृहाचे तोंड देखील पाहता आलेले नाही.
याशिवाय लज्जास्पद बाब धनगर समाजासाठी व राजकारण करणा-यांसाठी आणखी दुसरी काय असू शकते ?

 दिल्ली येथील संसद भवन, राष्ट्रपती भवन,आणि सचिवालय या देशाच्या प्रमुख महत्त्वपूर्ण इमारती होळकर साम्राज्याच्या भूमीवर निर्माण झालेल्या आहेत. दिल्लीचा प्रमुख पाया असणारे
रायसिना नावाचे गाव होळकर साम्राज्यात येत होते. इ.स.1911ला हे गाव होळकरांनी ब्रिटीशांच्या स्वाधीन केले.परंतु एकेकाळी धनगरांचे साम्राज्य
राहिलेल्या या भूमीवर बनलेल्या या इमारतीत महाराष्ट्रातून एकही खासदार स्वातंञ्याच्या 67 वर्षात निवडून गेलेला नाही. प्रधानमंञी व राष्ट्रपती पद भूषविणे फारच दूर राहीले.
1989 ला धनगरांचा ST च्या मागणी साठी पाच लाखाचा मोर्चा निघाला होता तेंव्हा धनगर समाजाचे 16 आमदार होते.
सर्व समजत होते कधी नव्हे एवढा समाज जागा झालाय . लगेच लोकसभेच्या निवडणूका लागल्यात आता धनगरांचा नक्की खासदार होणार असे वाटत होतं .  उभे असणारे सारेच आपटलेत.  हीच जागृती समजावी काय?
1990 लगेच विधान सभेच्या निवडणूका लागल्यात 16 वरिल आमदारांची  संख्या 5-7 वर आली.  हेच जागृतीचे लक्षण समजावे काय ?
 आताच 2014 ला झालेल्या लोकसभा निवडणूकितही कोणत्याही प्रस्थापीत पक्षाने धनगरांना उमेदवारी दिली नाही. हेच काय आपल्या जागृतीची दखल?
आताच झालेल्या  विधान सभेच्या निवडणूकीतही  धनगरांचे आमदार वाढले नाहीत  . हाच काय जागृतीचा फायदा.
 गर्दीत केवळ डोकी असतात डोकं नसते.  आपण गर्दिलाच जागृती समजत आलो.  हीच फसगत.
 भावनिक आव्हानांनी राजकारणाची लढाई जिंकता येत नाही.  त्याला योग्य नियोजनाची  व कृती कार्यक्रमाची जोड असावी  लगते . मतदार संघाची पूर्वनियोजीत मोठ बांधावी लागते .कोठेतरी येथेच आपण कमी पडत असतो हेच आम्ही समजायला तयार नाही. 
आता यदाकदाचित मध्यावधी निवडणूका झाल्यात वा 2019 ला निवडणूका होणार त्याचे आताच नियोजन असले पाहीजे.  प्रत्येक वेळी निवडणूक आली की सर्वांची धावाधाव सुरू होते. आपटलेकी घोर निराशा. 
केवळ धनगरांच्या भरोशावर आपण आमदार होवू वा वेळप्रसंगी खासदार होवू  पण सत्ताधीश बनू शकत ऩाही.  त्यासाठी इतर शोषित समाज घटकांना सोबत  घ्यावे  लागेल .त्यांच्यात बंधूभाव व स्नेह व जिवाळा स्थापण करावा लागेल. आज अशी कोणतीही  समाजिक यंत्रणा आपल्याजवळ नाही. जी राजकीय व्यक्तींना शक्ती प्रदान करू शकेल. आज विधानसभा व लोकसभा लढवण्यासाठी करोडो रूपये लागतात. काय येणा-या काळात हे धनगर समाजाला पेलेले?  प्रत्येक निवडणूकित  नियोजना अभावी पैशाचा चुराडाच होत राहणार.  सत्ताधिश बनणे तर दूरच.
 समाजकारण व राजकारण हे धनगर समाजात हातात हात घालून चालने आवश्यक आहे. हे होत नसल्यामुळेही आपली दुरावस्था होत आहे असे आपणास वाटत नाही काय ? 
जो पर्यंत धनगर समाज आपली मतं दारूसाठी,  पैशासाठी व स्वार्थासाठी  विकत राहील तो पर्यंत या राज्याचे सत्ताधीश हे प्रस्थापीत राहतील.
 धनगर समाजाला जागृत करून कायमस्वरूपी  संघटीत  करून ठेवणारं संघटन व बहूजन समाज घटकाला समाज जागृत करून संघटित करणारे संघटन  दोन्ही बाबी एकाच वेळी करणे आवश्यक आहे.
आज डमी मतदार तयार करून  प्रस्थापीत राजकारणी निवडणूका  जिंकतात. आपण सजगच राहत नाही. आपलीच नावं मतदार यादित नसतात.
 EVM मशिन मध्ये घोटाळे करून निवडणूका जिंकल्या जात आहे.
 निम्न जातींना उच्च जाती मनी व मसल पावरचा वापर करून आपल्या बाजूने  हवे तसे वळवतात .हेही लक्षात घ्यावे लागेल  . या माध्यमातून लोकशाहीचे धिंडवडे काढणा-यांशी लढतांना  धनगर समाजात पूर्णतः प्रशिक्षीत तरूण वर्गही तयार होणे आवश्यक आहे.
केवळ आंधळेपणाने व उताविळपणाने निवडणूका  लढणे वा लढविणे हेही आत्मघातकीपणाच  ठरेतो .सदैव  सजगता आवश्यक आहे .इतर पक्षातही धनगर समाजाचे प्रतीनिधी  असलेच पाहिजेत हे सुद्धा  आवश्यक आहे . त्याच बरोबर हेही लक्षात घेतले पाहीजे की इतर पक्षात राहून धनगर आमदार बनतील ,मंत्री बनतील  , खासदार बनतील पण सत्ताधीश  नाही .त्यासाठी आपलाही राजकीय पक्ष हवा . आजतरी RSP शिवाय दुसरा पर्याय उपलब्ध  नाही .पक्ष भेद बाजूला सारून सर्वच पक्षातील राजकारण्यांनी समाज हितासाठी नेहमीच हातात हात घालून चालले पाहीजे . समाजानेही त्यांच्यावर विश्वास दर्शविला पाहिजे . राजकारण्यांनीही विश्वास संपादन केला पाहिजे . आज राजकारण्यांना समाजात जेवढी प्रतिष्ठा मिळते तेवढी समाजकारण करणा-यांना मिळत नाही . समाजाचे ह्या दोन्ही अंगांना समान प्रतिष्ठा प्राप्त होणे गरजेचे आहे .
उपरोक्त बाबी राजकारण व समाजकारण करणारे हे जेवढ्या लवकर लक्षात घेतील तेवढेच त्यांच्या हिताचे आहे.

होमेश भुजाडे
नागपूर

0 comments: