Friday, December 26, 2014

धनगर आरक्षन पोवाडा

फड फड फड फड पिवला फडके गगनात
सर्वांग भरल त्याच न्हाला उभा रक्तात
फड फड नाही त्याची तड फड घ्या र ध्यानात
येड्या कोकरावानी का रे भटकताय रानात
जर का जागा नाही झालात झेंड्याला साथ
दिली नाही ख़ास शिवलेनच राजे जी र मर्दा हो जी रे रेरे
जी जी ।।ध्रु।।

फड फड त्याची वैभवशाली अरुणाची लाली जगावर
आली कोण लपवील।
खंडोबा बिरुबा पावल मोठ आन्दोलन घडविल।
महात्मे डॉक्टर त्यात उतरल।
महादेव जानकर भलं।
आरक्षन कृतीच बळ।
जमवून हनुमंत सुळ।
पंढरपुर ते बारामती कड।
सुरु झाली जत्रा पायदळ।
शशीकान्त तरंगे पुढ।
सोला शिलेदार त्या मिळ।
आमरण उपोषण केल।
आरक्षन युध्द सुरु झाल।
चळवळ रूपी आमृत जगी सिम्पिल धनगर मेलेलं जिवंत
त्यानी केल ऐका तुम्ही राजे हो जी र र जी जी ।।१।।
झोपलेल धनगर जाग झाल।
अंगावरच घोंगड झटकल।
सव्वा पहार या संपल।
गावोगावी एकीचा तळ।
शहरात वणव पेटल।
मंत्र्यांच्या अंगावर गेल।
कोणी पोलिश स्टेशन तोडल।
कोणी धरून एसटीला जाळ।
चौमुलखी धनगर खवळल।
रस्त्यात जाळती झाड।
सरकार कापी चळचळ।
परी आरक्षन नाही सोड।
धनगर मर्द मावळ अहिलेची बाळ सरकार लोळवील
ऐका तुम्ही राजे हो जी र र जी जी ।।२।।
रासप भाजप युति।धनगराची मती।।
लोक बोलती। बोलती धनगराची गति।।
मुंबईची सत्ता मिळविती। दुष्टा लोलविति।।
ऐका तुम्ही राजे हो जी र र जी जी।।३।।
आघाडीचा राक्षस गडला।आनंद मोठा झाला।।
आम्हा धनगरास दोन बोट स्वर्ग राहिला।।
जो तो नेता होण्याची स्वप्ने पाहू लागला।।
गल्ली बोलामधे नवी सेना संघ जन्माला।।
नाक्या नाक्या वरी नवा नेता पुढारी आला।।
नेत्यानी वाट दिली राजे फंद फितुरिला।।
दुहिच्या दरी मधे धनगर सारा बुडवीला।।
ऐका तुम्ही राजे हो जी र र जी जी ।।४।।
ऐका र ऐका धनगर तुम्हा विनाविर।
कवन रचनार बापू हटकर।।
सोडा ज़रा स्वार्थ क्षुद्र अहंकार।
एकीमुळ आरक्षनाला धार।।
सवलती मीळवा सारे जोरदार।
सुखी करा आपले सारे संसार।।
ऐका तुम्ही राजे हो जी र र जी जी।।५।।

कवी-बापू हटकर

0 comments: