Monday, August 18, 2014

धनगर आंदोलनातील हिंसा आणि त्याची प्रतिक्रिया


धनगर समाजाचे 14 ऑगष्ट रोजीचे महाराष्ट्रव्यापी आंदोलन खूप यशस्वी झाले. संपूर्ण राज्यात हे आंदोलन शांततेत पार पडत असताना बारामती, सातारा आणि फलटण या ठिकाणी काही हिंसक घटना घडल्या. बारामती आणि फलटण येथे काही एस. टी. गाड्यांची तोडफोड झाली तर सातारा येथे राष्ट्रवादीचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर एका कार्यकर्त्याने अबिर-बुक्का टाकला. राज्यभर इतर ठिकाणी मात्र आंदोलन शांततेत पार पडले. वास्तविक पहाता कोणतेही आंदोलन लोकशाही मार्गाने आणि घटनेच्या चौकटीत राहूनच करायला पाहिजे. परंतू विविध

Sunday, August 17, 2014

मा. शरद पवार ( राष्ट्रिय अध्यक्ष राष्ट्रवादी पार्टी ) यांना पत्र


शरद पवार
माननीय शरद्चंद्रजी पवार यांना होमेश भुजाडे यांचा सप्रेम जय मल्हार वि. वि.


अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून धनगर समाजाचे महाराष्ट्रात राज्यव्यापी आंदोलन प्रचंड ताकदिनीशी सुरू आहे.
धनगड - धनगर एकच असून त्यांना संविधानाप्रमाणे आरक्षण मिळावे यासाठी अनेकदा आंदोलनं झालित. ही मागणी काही नविन नाही. धनगर जमातीवर गेली ६४ वर्षे झालेला अन्याय व या जमातीचे एवढी वर्षे झालेले सर्वांगिण नूकसान भरून न निघणारे आहे.

Saturday, August 16, 2014

शरद पवार साहेब आता तरी खरे बोलताय का ?

शरद पवार
शरद पवारसाहेब धनगर ST आरक्षणावर आपण इतक्या उशिरा तोंड उघडलत आता खर सांगा >>>>>

आपण धनगर समाजाचे आदिवासीत्व कबूल केलत मग ST आरक्षणाची आपण इतकी वर्षे प्रमाणपत्र का दिल नाहित ?

हिंदितला धनगड शब्द कोणी मराठीमध्ये जाणीवपूर्वक धनगर असा भाषांतरीत केला नाही .तुमचा इमानी धनगर मतदार बांधव तुम्ही 1956 पासून विकासाच्या आदिवासी हक्कापासून वंचित उपेक्षित का ठेव़ू दिलात ?
आपण त्यांचे खरे लोकप्रतिनिधी नव्हता हे खर समजायच का?

आम्ही धनगर

लाजत बुजत जगत आलोय आम्ही
मुळ प्रवाहापासुन दुर राहलो आम्ही
रानोवनी भटकंति आमची जिवन गाणी
मेढपाळ म्हनुन सर्वान्ना ओळख आमची
येळकोट येळकोट गर्जना आमची
खंडोबाच्या चरणी श्रद्धा आमची

Friday, August 15, 2014

यांच्या स्वातंत्र्याचं काय ?

15 ऑगष्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. ब्रिटीशानी जखडलेल्या गुलामीच्या बेड्या आपण तोडल्या. दरवर्षी 15 ऑगष्ट रोजी आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतो. हा आनंदाचा, अभिमानाचा दिवस आहे हे मान्यच....परंतु हे स्वातंत्र्य खरोखर समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचलय का याचा विचार समस्त भारतीयानी करावा असे मला वाटते. आजही अनेक लोकाना रहायला निवारा नाही, अनेकाना गाव नाहे, या देशाचे नागरिक असल्याची त्यांची कोणतीही ओळख नाही. या गावकुसाबाहेरच्या,

Thursday, August 14, 2014

स्वातंत्र्य

किती आक्रोश तो झाला
किती रक्तांच्या नद्या वाहल्या
सडा पडला म्रुतदेहांचा
तेव्हा स्वातंत्र्यदिन उदयास आला

तरुणान्नि तरुणपन दिले
इच्छा आकांशांवर पाणी सोडले
मात्रुभुमिलाच प्रेयसी मानले
अन तिच्या रक्षनार्थ विरमरण पत्करले
तेव्हा स्वातंत्र्य उदयास आले

पिवळे वादळ झेपावले…