Thursday, September 4, 2014

धनगर आंदोलनाची दिशा

घटनात्मक हक्काची जाणीव झाल्यापासून साधारणपणे 1969 पासून धनगरांच्या आरक्षण हक्काचा लढा सुरू आहे. त्याला तिव्रता आली 1988-89 पासुन त्या वेळी धुरंधर शासनकर्ता ने घटनाबाह्य रित्या धनगर समाज एन टी आरक्षण दिले आजच्या सारखे च आंदोलन पेटले होते धनगरांतील काही कार्यकर्ते यांना पुर्ण घटनात्मक अभ्यास नव्हता तेव्हा धुरंधर नात्यांनी ती चळवळ पध्दतशीरपणे थोपवली.

त्या वेळेस शासनकर्ते यांना धनगर समाजाला फसवण्यात यश मिळाले कारण शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत मागासलेला धनगर समाज होता आणि धनगर समाज पोट जातीत, शाखा भेदात वाटल्या गेला होता .त्यावेळी प्रचार प्रसार माध्यमेही मोठ्या प्रमाणात नव्हती, पण आज मात्र परिस्थिती वेगळी आहे. गेल्या काही महिन्यांपासून जोमाने चालू असलेला आरक्षण हक्क लढाला कधी नाही ते आपला समाज एकवटला आहे आपण अगदी सनदशीर मार्गाने रस्त्यावर ऊतरलो आणि या राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ातच नव्हे तर प्रत्येक तालुक्यात प्रचंड मोठे मोर्चा काढुन शासनाला हलवण्याचे यशस्वी झालो.यात विरोधी पक्षांनीही जोरदार पाठिंबा दिला(अर्थातच राजकीय फायद्या साठी ,त्यात काही गैर नाही) ,मिडीया मध्ये ही चांगला प्रतिसाद मिळाला. धनगर समाजाच्या बुध्दीवादी वर्गानी धनगर समाज अनुसूचित जमातीच्या सुचित असल्याचे असंख्य पुरावे पुढे आनले .त्यामुळे धनगरांच्या मुला मुलांच्या काळजात एक आग धगवगते आहे. . सत्ताधार्याना वाटते कालांतराने ही आग थंड
होईल ह्या आगित कोण किती होळपणार याची गणिते त्यांनी मांडून ठेवली आहेत, विरोधक ही ह्या लढ्याचा होईल तेवढा फायदा घेण्यासाठी तेवढ्याच प्रमाणात पेटतं ठेवत आहेत .या लढयाने जानकरसाहेबांच्या रासप ची शक्ती मात्र मोठया प्रमाणात वाढली आहे. वंचित,बहुजन, ओबिसींचा पक्ष म्हणून भूमिका कसरत करावी लागणार आहे .रासप सोडला तर विधान सभेच्या निवडणूका नंतर आजच्या प्रमाणेच इतर कोणी पक्ष धनगर आरक्षणाबाबत ठाम भुमिका घेतील असे वाटत नाही
त्यामुळे अत्यंत सक्षमपणे, जागृत राहून धनगर समाजातील
बुध्दीवादी लोकांनी, कृती समीतीनी , धनगर समाजाचे राजकीय बळ वाढवत ठेवत ...हा आरक्षण हक्क लढा पुढे नेणे आवश्यक आहे
आपण येणार्‍या विधानसभेत
ज्यांना कुणाला सोबत करू त्याच्याकडून पुर्ण आश्वासित करून घेणे आवश्यक आहे. ...

इलेक्ट्रॉनीक मिडीया व राजकीय पक्ष यांच्या कडून त्यांचा फायदा संपला की लढे 
पद्धतशीर पणे थंड केले जातात हा इतिहास आहे .उदा. अण्णा हजारे यांचा भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन लढा मिडीयाने उचलला, त्यानंतर केजरीवाला मिडीयाने मोठे केले, रामदेवबाबा, हे राजकिय फायद्यातून इलेक्ट्रॉनीक मिडीयाने मोठी केलेली आदोलने ,आज हे सर्व ह्याच मिडीयाने कोपर्‍यात नेऊन बसवली .
धनगर आरक्षण हक्क लढा हा आपल्या सामाजिक हक्काचा लढा आहे .40 वर्षे चा संघर्ष आहे .हयाच्या हातच्या बुहूल्या प्रमाणे चालू द्यायचा नाही?
बुध्दीवादयांनो जागे रहा ... प्रचंड ताकतीचे एक साधन आपल्या हाती आहे ,ते म्हणजे सोसल मिडीया ( फेसबुक, ट्विटर, व्हाट्अप,हाईक इ. ) हे कोणी रोकू शकणार नाही. यावर धनगर समाज मोठ्या प्रमाणात वाढत आहे ,या पातळीवर संघटन वाढवा 

सामाजिक लढाई ही राजकीय ताकत वाठवल्या शिवाय जिंकता येत नाही हेच खरे आहे
वंचित घटकांना न्याय देणे हे आपल्या रक्तात आहे , गोर गरीब समाजाला न्याय देत सामाजिक समतेने प्रशासन चालवण्याचा वारसा आपल्याला आहिल्या माते कडून .. शुर्त्वाचा वारसा मल्हारराव ,यशवंत राजे होळकरा कडून मिळाला आहे 
संखेने ही आपण महाराष्ट्रात16% तर संपुर्ण देशात 11% आहोत त्या मुळे 'जितनी जिनकी संख्या भारी ऊसकी उतनी भागीदारी " या न्यायाने प्रशासनातही हिस्सेदारी हा आपला हक्क आहे. .त्या मुळे सतर्क रहा , एक जुटीने रहा, शाखा भेदाचे विष कालवण्याचे शड्यंञला हाणुन पाडा ..सारा धनगर एक , आदिवासी, दलित, भटके ओबिसी बांधवाना विश्वासात घेऊन हा लढा सतत तेवत ठेवा ... विजय आपलाच आहे 
जयमल्हार. जय संविधान, जय भारत. ..
तुमचाच एक नम्र सेवक.

श्रीनिवास मस्के, नांदेड
9271008899

0 comments: