Wednesday, April 13, 2011

धनगरी लोककला - चपय नृत्य, गजे ढोल नृत्य

धनगरी गजे ढोल नृत्य हा नोकनृत्याचा एक लोकप्रिय प्रकार असून महाराष्ट्रातील धनगर समाजासारखाच आंध्रप्रदेश, कर्नाटकात ही धनगर समाज गजे ढोल नृत्य करतो. यास थपेटू गुल्लू असे म्हणतात. ज्योतीबा, बिरोबा, मायाक्का, भोजलींग, खंडोबा या महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या देवता, धनगर समाजात कनगर, सनगर, खुटेकर, सुपेकर अशा विविध प्रकारचे समाज बांधव असून या बांधवांनी आपली लोकसंस्कृती कायम ठेवली आहे. शेळी-मेंढी पालन, लोकर तयार करणे, घोंगड्या तयार करणे आदी रोजगाराची साधने या समाजबांधवांची आहेत. श्रमपरिहारासाठी मेंढवाड्यावर उघड्या माळरानावर धनगर बाण्या सादर करणे हे धनगर बांधवांचे रंजनाचे साधन. सर्व ढोलांचा एकच गजर म्हणजे गजे. या गजेसहे केलेले धनगर बांधव या नृत्यात करतात. दिवाळी, पाडवा अशा सणांशिवाय १५ ऑगस्ट, २६ जानेवारी अशा राष्ट्रीय सणांनाही गजे ढोल नृत्य व धनगरी बाणा सादर केले जातात.

बिरोबाचा जन्म, बिरोबाची आई गंगा सुरावंतीचा जन्म, खंडोबाची जन्म, खंडोबा-बाणाई लग्न आदी कथा बाण्याव्दारे धनगर बांधव सादर करतात. बाण्या म्हणजे धनगरी ओव्या होत. आता या ओव्या पाहा.

कथांची नावे :- (बिरोबाच्या आईचा जन्म, गंगासुरावंतीचा जन्म, मायाक्का देवीची कथा, अहिल्याबाईची कथा, खंडेरायाची कथा, रामायण , महाभारत) आणि धनगरी बाण्या अश्या याप्रमाणे धनगर नृत्य सादर केले जाते.

१) सुंबरान मांडल भारत भूमिला ll
तिरंगी झेंड्याला राष्ट्राच्या ध्वजेला वंदन करुन ll
मात्या आणि नित्याला वंदन करुन ll
दोनी मार्ग दाखवले त्या गुरुला वंदन करुन ll
बसलेल्या तमामाला, आई बापाला शाहीरांचा मुजरा ll

२) पहीलं माझं नमन गंगाया मातेला ll
धन्य धन्य इठूराया ll
हल्लीच्या जमान्यात कलियुगाची तर्‍हा ll
लेक एकीना बापाचं जरा ll
मनतो बायको माझी लय शाहनी ll
विषय सुखाची लागली गोडी ll
भल्या भल्याच्या मोडल्या खोडी ll
खडकावर बगळा बसला ll 
 

                                                                                                                          डॉ.प्रकाश खांडगे
                                                                                                                         महान्यूज 


Friday, March 18, 2011

धनगर समाजाचा प्रेरणादाई इतिहास

धनगर समाजाला फार मोठा उज्वल आणि गौरवशाली इतिहास आहे. कोणत्याही समाजाला सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक विकास करायचा असेल तर त्याला आपलाइतिहास विसरून चालत नाही. कारण इतिहास विसरणारे इतिहास घडवू शकत नाहीत. आणि जे इतिहास घडवतात ते इतिहास विसरू शकत नाहीत. म्हणूनच धनगर समाजानेही आपला गौरवशाली इतिहास, की जो धनगर समाजाच्या दृष्टीने अनमोल ठेवा आहे, त्याचे स्मरण केले पाहिजे.

धनगर समाजात अनेक मोठ्या व्यक्ती होवून गेल्या. ज्यांनी एक काळ आपल्या कर्तुत्वाने गाजवला होता. त्यांचे नाव जरी घेतले तरी धनगर समाजाला फार मोठी प्रेरणा मिळते. परंतु धनगर समाजाचे दुर्दैव असे की त्यांना आपले महापुरुष सुद्धा माहित नाहीत. धनगर समाजाने आपले महामानव, त्यांचा उज्वल इतिहास नजरेआड केला तर समाजाचे फार मोठे नुकसान होईल. त्यामुळे धनगर समाजाला आपल्या महामानवांचा प्रेरणादाई इतिहास माहित व्हावा आणि त्यांची ओळख व्हावी यासाठी काही नावे देत आहे.


  • Ajpal Chauhan Founder of Ajmer city, Chauhan Dynasty.
    • Prithvi Raj Chauhan
  • Bappa Rawal. Founder of Gahlot/Sisodia/Mewar Dynasty. Descendant of Lord Rama.
    • Maharana Pratap
  • Holkars (Marhatta Empire)
    • Malhar Rao Holkar
    • Punyaslok Rajmata Ahilyadevi Holkar - ("Catherine the Great, Elizabeth, Margaret of India”)
    • Maharaja Tukojirao Holkar.
    • The Great Maharaja Yashwantrao Holkar ("Napoleon of India")
    • Bhimabai Holkar.
  • Hoysalas
  • Kadamba
  • Karande
    • Raghuji Karande. General of Army of Nagpur kingdom of Raghoji I Bhonsle.
    • Krishnaji Karande. Subedar (Governor or Military and Administrative head) in Nagpur kingdom of Bhonsle.
  • Maurya
    • Chandragupta Maurya ("Alexander of India")
    • Ashoka the Great
  • Novsaji Naik
  • Pallavas
  • Rashtrakutas
    • Amoghavarsha the Great.
      • Rao Sheoji of Rathod Clan
      • Rao Jodha founder of Jodhpur city.
  • Sangolli Rayanna
  • Vijaynagar Empire
  • Baghel/Vaghela of Rewa (Madhya Pradesh)
  • Seuna Yadavas of Devagiri.

Thursday, March 17, 2011

धनगर या शब्दाचा खरा अर्थ

धनगर समाज म्हणजे धनाचे आगर असलेला समाज... धनवान समाज... असे अनेक अर्थ सांगितले जाते.... पण खरा अर्थ पुढील प्रमाणे आहे, ते असे...

पूर्वी धन म्हणजे ज्या व्यक्तीकडे ' पशुधन ' जास्त आहे, तो समाज म्हणजे धनवान असा होता... आणि हे धन म्हणजे बकरी - मेंढे - उंट - घोडे - खेचर- गायी - म्हशी - हत्ती - मोर पाळणारा समाज म्हणजे धनवान समाज, धनगर समाज असा होता. प्रथम बकरी / मेंढ्या पाळत पाळत तो गायी - म्हशी - उंट - घोडे - हत्ती पाळू लागला.... आणि मग काही गवळी झाले .... हत्ती पाळणारे ... मोर पाळणारे.... उंट पाळणारे... असे अनेक समाज ही बनत गेले. कुरूब ( धनगर ) मुंच जाती इल्ला कुळा इल्ला, असे कवन कर्नाटकात म्हणूनच गायले जाते. तात्पर्य एकाच आईचे ही मुले, पण वेग वेगळ्या नावाचे... धनगर ( आई) -> कुरुवंश ( मेष पालक ) + यदुवंश ( गो पालक ) = पशुपालक समाज !

हे पशुधन आपल्याला मिळवन्यासाठी पूर्वी अनेक लढाया ही होत... ' धनगर समाज ' हा 'देशातील सर्वात मोठा समाज ' आहे. पाळीव पशूंची संख्या भारतात सर्वात जास्त आहे... आपला भारत हा कृषिप्रधान देश सर्वांना माहित आहे... त्यावर अनेक चर्चा ही केली आहे / होत आहे.... पण ' जगात सर्वात मोठा पाळीव पशु पाळणारा / पशुपालक असणारा देश ' हा आपला भारत जरी असला तरी पशुपालक समाजाची चर्चा येथे केली जातच नाही ! हे त्यातही विशेष... आणि याला आपला पशुपालक समाजच जवाबदार आहे !!!

' धनगर' या शब्दाचा खरा अर्थ " दिशा देणारा / मार्गदर्शक करणारा " / शोध लावणारा - घेणारा असा आहे... पूर्वी अनेक मार्ग / रस्ते / यांचा शोध धनगरांनी लावलेला आहे.... ( पूर्वी सर्वसामान्यांची लोकप्रिय असलेली पाली या भाषेचे जनक ( पाल / धनगर) ... पुणे - मुंबई घाट मार्ग शोधणारा शिन्ग्रोबा असो.... वा न्यू यॉर्क शहर वसवणारे... म्यागनेट शोध लावणारा... वा अनेक धर्माचा / पंथांचा खरा मानवतेचा संदेश देणारा हा धनगरच होता. मुळ वेद जाणणारे आणि गाणारे धनगरच होते ( पण आताचे वेद हे भेद आहे. ते धनगरांचे नाही. ) मोझेस, जिझस, मोहमद आणि कृष्ण धनगर होते. काळा प्रमाणे संदर्भ आणि अर्थ बदलत गेले.


_____ Proud to be a DHANGAR / SHEPHERD _____

आपला धनगर समाज, हा संपूर्ण भारतभर ( तसेच सर्व जगभरातही ) आढळणारा समाज आहे.... तसेच तो विविध भाषिक असून, विविध धर्म - पंथांचा व विविध प्रांतात असणारा / राहणारा / आढळणारा हा विशाल समाज आहे...

>>>>>>> Proud to be a DHANGAR / SHEPHERD <<<<<<<

Hey hum Hindu ( Samrat Hakka - Bukka , Sant Kanakdas, Maharani Ahilyabai Holkar)

Hey hum Aadivasi / Oraon

Hey hum Muslim (Paigmbur)

Hey hum Jain (Samrat Chandragupta Maurya)

Hey hum Baudha (Samrat Ashoka)

Hey hum Lingayat (Revanna Siddh)

Hey hum Sikh / Gaderia

Hey hum Christen (Jesus : The Good Shepherd)

Hey hum Yahudi (Mozes)

Arey.. Humhi toh hai, Bharat ke Mulnivasi / OBC...!

Kashmir se leker Kanyakumari tak, Aur Gujarat se leker Bangal tak.. Humhi toh hai sabhi jagh.....!

Isiliye bolo...

Garv se kaho hum DHANGAR - KURUBA - KURUMA - KURUMBA - PAL- BAGHEL- GADERIA - ORAON - RABARI - BAKARWAL - GADDI- SHEPHERD...hai !!!!!!!


IMP Links....Info. About DHANGAR / SHEPHERD >>>>>

Wednesday, February 9, 2011

मनुवादी परंपरा विरुद्ध मानवतावादी परंपरा भाग २

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष मा. महादेव जानकर यांनी ‘विश्वाचा यशवंत नायक’ मासिकाच्या जानेवारी २००८ च्या अंकात लिहिलेला परखड लेख ..... मनुवादी परंपरा विरुद्ध मानवतावादी परंपरा  भाग २ 

१९४८ साली डॉ. आंबेडकर यांनी लखनौ येथे Backward Classes च्या सभेत ओबीसी ना आवाहन केले होते, “Why not you Backward Class & we scheduled class should come together and capture the political power of India. ”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Annihilation of Cast  मध्ये ‘ब्राम्हणी हिंदुइझम’ मांडण्याचे सामर्थ्य केवळ भारतातील ब्राम्हणी-अहिंदू-आदिवासी मधेच आहे, असे डॉ. आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितले होते. गेल्या ६० वर्षात तथाकथित डाव्या आणि संघीय NGO नी आदिवासींना नेस्तनाबूत करणेच बाकी ठेवले आहे. आणि फुले-शाहू-पेरियार-नारायण गुरु सारख्या महामानवांना जन्म देणारा ओबीसी हा परिवर्तनवादी चळवळीपासून लांब गेला. याची कारणे शोधून त्यावर उपाय शोधल्याशिवाय ओबीसी, आदिवासी तसेच एस.सी. चे खरे हित होणार नाही हे किमान चळवळीचे म्होरके म्हणवणाऱ्यानी तरी समजून घेण्याची गरज आहे.

मा. महादेव जानकर
भारतात फुले-शाहू-आंबेडकर अशी एक परंपरा आणि एक आघाडी आहे. तशीच मनुवादी टिळक-गांधी-गोळवलकर यांचीही एक परंपरा आणि आघाडी आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाचा पुरस्कार करणारी मानवतावादी परंपरा आणि मानवी मुल्यांचा विरोध करणारी मनुवादी परंपरा यामध्ये कैक वर्षापासून लढा चालू आहे. यामध्ये मनुवादी टिळक-गांधी-गोळवलकर परंपरा मजबूत झाल्याचा पुरावा ठायी-ठायी नजरेला येतो. डॉ. आंबेडकरांचे नाव व नावासहीत थोडा वारसाही जिवंत ठेवण्यात दलित यशस्वी झाले आहेत. परंतु फुलेंचे नाव आणि वारसा दोन्हीही जिवंत करण्याची गरज आहे. आदिवासींना बरोबर घेणारी चळवळ राबवण्याची गरज आहे. भारतातील दलित-ओबीसी-आदिवासीसहित धार्मिक अल्पसंख्यांक एकत्र घेवून जाणारी चळवळ बांधण्याची गरज आहे. सामाजिक चळवळीला मर्यादा येतात. काही काळ त्या टिकतात. राजकीय चळवळीतून मात्र सामाजिक चळवळीला गती येवू शकते. ती जास्त काळ टिकू शकते. ही राजकीय चळवळ प्रस्थापित राजकीय चळवळीपासून अलिप्त-स्वतंत्र असली पाहिजे. काशीराम आणि बसपा ने हा प्रयोग यशस्वी करून दाखवल्याचे दिसते. बहुजन राष्ट्रीय समाज मोठा आहे. भारताच्या ९० % त्यांची संख्या आहे. मनुवादी व्यवस्थेकडे ही मते मिळवण्यासाठी वेगवेगळया ‘मुखवट्याचे’ अनेक पक्ष आहेत. (काँग्रेस, भाजपा, शिवसेना). मानवतावादी मुखवटा धारण करून ‘मनुवादी’ कार्य करणाऱ्या संघटनाही यांच्याकडे आहेत. बसपा ही दलित-बेस पार्टी आहे. मनुवादी राजकारणाला शह देण्यासाठी ‘ओबीसी-आदिवासी’ राष्ट्रीय समाज पार्टीची स्थापना मी केली आहे. राष्ट्रीय समाज पार्टीचा झेंडा धरणाऱ्या ब्राम्हणानाही माझ्या पक्षात स्थान आहे. रासपा ओबीसी-आदिवासी समाज घटकाइतकीच दलित-अल्पसंख्यांकाची पार्टी आहे.

रासपा ‘राष्ट्रीय समाज’वादी असली तरी सर्व भाषीय, सर्व प्रांतीय, सर्व प्रादेशिक, सर्व धर्मियांना ‘समान’ लेखणारी, सन्मान बाळगणारी, त्यांच्या समस्यांना आपली समस्या मानणारी पार्टी आहे. रासपा जात-धर्म-भाषा-प्रांत निरपेक्ष पार्टी आहे. संघटनात्मक लोकशाही मानणारी पार्टी असल्याने पक्ष वाढीसाठी समाज हितासाठी आवश्यक बदल स्वीकारणारी, तसं बदल घडवून आपल्या कार्यकर्त्यासाठी पूर्ण वाव आणि स्वातंत्र्य देणारी पार्टी आहे.

रासपा मानवतावादी पार्टी आहे. फुले-शाहू-आंबेडकरांची परंपरा मानणारी पार्टी आहे. २०० पेक्षा जास्त राष्ट्रीय महापुरुषांचा आदर्श घेवून चालणारी पार्टी आहे. मनुवादी टिळक-गांधी-गोळवलकर परंपरांशी लढा देण्यासाठी सज्ज असलेली पार्टी आहे. भारताच्या राज्य घटनेमुळे निवडणूक लढवून भारताची सर्वोच्च सत्ता घेण्याची संधी मिळाली आहे. मत अधिकार नावाचे सर्वात मोठे शस्त्र ९० % राष्ट्रीय समाजाच्या हातात आहे. परंतु भारताच्या राजकीय पटलावर अनेक मनुवादी पक्षच पर्याय म्हणून उपलब्ध आहेत. काही मानवतावादी पक्ष दिशाहीन झाल्यामुळे, विकले गेले, वा दुबळे झाले आहेत, होत आहेत. काही पक्ष आजही प्रामाणिकपणे लढत आहेत.

राष्ट्रीय समाज पार्टी देखील स्पष्ट ध्येय, लक्ष समोर ठेवून आपल्या समाजाच्या, राष्ट्रीय समाजाच्या आधारावर मुंबई-दिल्लीची सत्ता ताब्यात घेण्याचा इरादा घेवून लढत आहे. निर्णायक पहिले पाऊल यशस्वी टाकले आहे. ‘येल्डा’ pattern द्वारे दुसरे यशस्वी पाऊल टाकले आहे. दिल्लीच्या संसद भवनात ‘राष्ट्रीय समाजाचा’ आवाज बुलंद करणार आहे.

मनु आणि मानवाचा तसा डिक्शनरी अर्थ एकच आहे. परंतु सामाजिक, सांकृतिक संदर्भ लक्षात घेता मनुवाद आणि मानवतावादी हे शब्द परस्पर कट्टर विरोधक बनले आहेत. तात्पर्य नावापेक्षा अर्थ महत्वाचे आहेत. राष्ट्रीय समाज पक्ष नावापेक्षा अर्थ घेवून पुढे जाणारा राजकीय पक्ष आहे.

Monday, February 7, 2011

मनुवादी परंपरा विरुद्ध मानवतावादी परंपरा भाग १

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष मा. महादेव जानकर यांनी ‘विश्वाचा यशवंत नायक’ मासिकाच्या जानेवारी २००८ च्या अंकात लिहिलेला परखड लेख ..... मनुवादी परंपरा विरुद्ध मानवतावादी परंपरा भाग १ 

मा. महादेव जानकर
“Buffalo Nationalism” चे लेखक कांचा इलय्या २१ सप्टेंबर २००७ रोजी मुंबईत आले होते. “Reservation & Globalization, Myths & Truths” या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले. धनगर समाजाच्या कांचा इलय्या यांनी ब्राह्मणवादी “Cow Nationalism” ची मांडणी केली. आणि भारतभर खळबळ उडवून दिली. तत्पूर्वी “Why I am not Hindu ?” हा ग्रंथ लिहून त्यांनी खळबळ माजवली होती. आई, वडील, बहिण निरक्षर असलेल्या कुरमा या धनगर समाजात जन्माला आलेले कांचा इलय्या भारतातील पहिल्या तीन सर्वश्रेष्ठ इंग्रजी लेखक, विचारवंत मधील एक मानले जातात.

जागतिकीकरणा बरोबर येणाऱ्या Cultural आणि Spiritual बदलामुळे दलित बहुजनांचा फायदा होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. गोतम बुद्ध, येशू ख्रिस्त, मोहम्मद पैगंबर, कार्ल मार्क्स आणि डॉ. आंबेडकर हे जगातील पाच प्रेषित (Prophet) असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कांचा इलाय्यांनी डॉ. आंबेडकर यांना गोतम बुद्ध या जगातील पहिल्या महापुरुषानंतरचा भारतातील दुसरा आणि जगातील पाचवा आणि अखेरचा महापुरुष मानला आहे. डॉ. आंबेडकरांचे कर्तुत्व आणि नेतृत्व महान होते हेच यातून प्रत्ययाला येते.

डॉ. आंबेडकर ज्ञानाचे सागर होतेच. त्याचबरोबर सामाजिक आणि राजकीय लढ्याचे ते सर्वश्रेष्ठ सेनापतीही होते. डॉ. आंबेडकरांचा जसा अपमान झाला तसा पूर्वी अनेकवेळा अनेकांचा झाला होता. आजही होत आहे, परंतु आंबेडकर एकच पैदा झाले. त्या अपमानातून ‘आत्मभान’  आलेल्या डॉ. आंबेडकरांनी दैदिप्यमान कार्यकर्तुत्वाद्वारे (जादूच्या कांडीने नव्हे) कोट्यावधी अस्पृश्यांचा उद्धार केला. वंचित समाजाचा लढा कसा लढवावा याचा सर्वोत्तम आदर्श समोर ठेवला. शूद्र, ओबीसी, आदिवासी यांच्यासाठी वा कोणाही वंचित समाजासाठी हा लढा सर्वोत्तम आदर्श ठरतो. परंतु दलीतांसह ओबीसी, आदिवासींना हा आदर्श पेलता आला नाही, असे दुर्दैवाने म्हणावे लागते. पहिल्या किंवा दुसऱ्या जागतिक महायुद्धापेक्षा मोठे युद्ध डॉ. आंबेडकर हे भारतातील ब्राह्मणवादी, भांडवलवादी आणि सरंजामवादी व्यवस्थेविरुद्ध लढले. किंबहुना त्यांना मागे सरले. भारताच्या इतिहासात गोतम बुद्ध आणि सम्राट अशोकानंतर एवढे मोठे सामाजिक युद्ध कुणी लढले नाही. पशुतुल्य अस्पृश्यांना माणसाचे अधिकार मिळवून देणे हा एक चमत्कारच होता. त्यामुळे डॉ. आंबेडकर दलितांचे देव बनले तर त्यात नवल नाही. विज्ञानवादी दृष्टीकोन आणि बौद्ध धम्ममतामुळे हिंदू मानसिकतेच्या देवत्वाचे स्वरूप आलेले नसले तरी डॉ. आंबेडकरांना महामानव मानले जावू लागले.

व्यक्तीपुजेतून ब्राम्हणवादाला बळकटी मिळते असे सांगणाऱ्या डॉ. आंबेडकरांना माणूस म्हणून कोणाच्याही कार्याचे मूल्यमापन केले जावे असे अभिप्रेत होते. माणूस मोठा नसतो. येथून-तेथून माणूस सारखाच असतो. कामाने माणूस छोटा-मोठा ओळखला जातो असे आंबेडकरांचे म्हणणे होते. कार्याने कोणीही मोठा होवू शकतो हेच बुद्धांचे आणि आंबेडकरांचे मुख्य तत्वज्ञान होते. या अनुषंगातून कोणत्याही माणसाचे, मोठ्या मानल्या गेलेल्या व्यक्तींच्या जीवन आणि चरित्राचे मूल्यमापन व्हावे. त्यामधून आपला जीवनमार्ग ठरवावा आणि चालवावा हेच डॉ. आंबेडकर या कार्यकर्तुत्वाने महान बनलेल्या महामानवाला अभिप्रेत होते. म्हणूनच डॉ. आंबेडकर म्हणतात ‘ माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा (त्यात वेळ घालवण्यापेक्षा) मला अभिप्रेत असलेले कार्य करा.’ छ. शिवाजी महाराज असो, डॉ. आंबेडकर असो किंवा राजमाता अहिल्याबाई होळकर असो त्यांच्या अनुयायी वारसदारांनी काय केले, काय मिळवले यावर दृष्टीक्षेप टाकल्यास काय आढळते ? उपरोक्त महामानवानी जे मिळवले ते टीकवताही आले नाही असेच दिसते. उपरोक्त महामानवानी पेरले होते, वाढवले होते परंतु आम्हा वारसदारांना अनुयायांना ते नीट सांभाळून ठेवता आले नाही हे वास्तव आहे. यावर गांभीर्याने विचार करून कार्य करण्याची गरज आहे. पण असे का घडले ? फुले आणि फुलेवाद दोन्हीही विसरले गेले. परंतु डॉ. आंबेडकर विस्मृतीत गेले नाहीत किंबहुना त्यांच्या नावाचा भारतभर, जगभरात जयजयकार होत आहे. (अरुण शौरीसारखे काही कावळे ओरडले.) आरक्षण नावाचे साधन वा शस्त्र जपण्यासाठीच दलित चळवळीची ९९ % दमछाक होत आहे, उरलेले १ % धार्मिक आणि सांकृतिक कार्यात गुंतलेले आहेत.