Subscribe to:
Post Comments (Atom)
भारताला स्वातंत्र्य मिळून ५६ वर्षांचा काळ लोटला. परंतु विज्ञान युगाच्या २१ व्या शतकात अजूनही धनगर समाज उपेक्षित, अशिक्षित, शोषित, अंधश्रद्धाळू, रुढीवादी, परंपरावादी राहिला.
समाजावर व समाजातील महापुरुषांवर पाहिजे त्याप्रमाणात लेखन कार्य झालेले नाही. धनगर समाजात जन्मलेल्या महापुरुषांनी १८ वे शतक आपल्या तडफत्या समशेरीने, कर्तुत्वाने शौर्याने, विधायक कृतीने गाजवलेले आहे. याचे स्मरण आजदेखील समाजाला नही. राजर्षी मल्हारराव, महाराणी गौतामाबाई, शूरवीर खंडेराव, राजे मालेराव होळकरांपासून ते लोकमाता अहिल्यामाई, तुकोजी, यशवंतराव इत्यादी होळकर घराण्यापर्यतचा काळ हा धनगर समाजास अभिमानाचा, अस्मितेचा, गौरवाचा नक्कीच ठरावा यात तिळमात्र शंका नही.
एकेकाळी शासनकर्ती जमात असणाऱ्या होळकर घराण्यातील शूरवीरांच्या वंशातील रक्त वाहत असलेल्या धनगर समाजाला अशी ग्लानी का आली? तो असा निपचित का पडला? प्रगतीच्या प्रवाहात तो मागे का राहिला ? हा समाज एवढा उपेक्षित का ? असे अनेक प्रश्न माझ्यापुढे पडत गेले. त्यावर वाचन, चिंतन, मनन, निरिक्षन व संशोधन करून काही सत्य शोधण्याचा हा प्रपंच.
समाज बांधवाना तथा बहुजन वाचकांना माझी जाहीर विनंती आहे कि, प्रस्थापित सामाजिक, राजकीय व्यवस्थेने समाजाला काय दिले? हजारो वर्षाच्या अंधश्रद्धा, रुढी, प्रथा, जाती-पोटजाती जपल्याने समाजाचा काही फायदा झाला का? हे तपासून पहावे. धनगर समाजाच्या मागासलेपणाचे खरे कारण काय आहे याचा शोध घ्यावा. वाचन, चिंतन, मनन करून योग्य निष्कर्ष काढावा. धनगर समाजाला सुस्थितीत आणण्यासाठी हा छोटासा प्रयत्न. सर्व समाज बांधव आणि बहुजन समाजातील सुजान, बुद्धीजीवी वर्गाने या समाज परिवर्तनाच्या कार्यात सहकार्य करावे हि नम्र विनंती. आपल्या प्रतिक्रियांचे स्वागतच राहील.
1 comments:
Hi there, I check your new stuff like every week.
Your story-telling style is awesome, keep up the good work!
My website ... Dino Hunter Deadly Shores Hack Tool
Post a Comment