Thursday, September 4, 2014

चल उठ आणि लढायला सुरुवात कर...!

आज महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणावरुन बऱयाच मोठ्या प्रमाणात राजकीय गोंधळ चालु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मराठा आरक्षणाबाबत गंभीर नाही, असा समज झालेले आ. विनायक मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस साथ सोडुन महायुतीशी हात मिळवणी केली व पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणी वर आला. त्यामुऴे राष्ट्रवादी काँग्रेसला आपला घोषणापत्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा घ्यावा लागला. पण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजापेक्षा अत्यन्त बिकट स्थिती असणारे अनेक समाज अस्तित्वात
आहे, त्यातीलच एक धनगर हा समाज आहे. धनगर या समाजाची आर्थिक स्थिती अत्यन्त बिकट असुन, या समाजातील जवळपास ५० ते ६० टक्के लोकांकडे राहायला घर पण नाही. धनगर समाजाचा अनुसुचित जमाती मध्ये धनगड या नावाने समावेश होतो. ज्याप्रमाने ओडीसा आणि उरीसा एकाच राज्याची नावे आहेत, त्याचप्रमाने धनगर आणि धनगड ही दोन्ही शब्द वेगवेगळ्या भाषेतील एकाच अर्थाचे शब्द असल्याचे सप्रमाण सिद्ध झाले आहे. तरीही महाराष्ट्र राज्य शासन आपल्या स्वार्थापोटी या समाजाचे आरक्षण लागु करण्यास दिरंगाई करत आहे. धनगर समाजाची आणखी एक मोठी समस्या आहे ती म्हणजे त्यांचा मुख्य व्यवसाय शेळी-मेंढीरालना करता स्वतंत्र कुरण उपलब्ध नसणे, त्यामुळे धनगर समाजातील लोकांना वनरक्षकांच्या नाहक शारिरीक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. आपल्याला आपल्या हक्काचे सामाजिक आरक्षण आणि आपल्या पारंपारीक व्यवसाया करिता स्वतंत्र कुरण मिळावे, या मागण्या करता धनगर समाज मागील कित्येक वर्षापासुन प्रयत्नशिल आहे. निवडणुकीच्या कालावधी मध्ये धनगर समाजाचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देउन राष्ट्रवादी काँग्रेस ने नेहमीच महाराष्ट्रातील धनगर समाजाचे २ ते २.२५ कोटी मत आपल्या पदरात पाडुन घेतली आहे, पण या समाजाचे कोणतेही प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला नसुन आपल्या घोषणापत्रात पण धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत काहीही नमुद केलेले नाही. यावरुन धनगर समाजाच्या समस्याबाब राष्ट्रवादी काँग्रेस उदासिन असल्याचे दिसुन येते, परंतु या राष्ट्रवादी काँग्रेसला धडा शिकवेल असे कोणतेच प्रभावी नेत्रुत्व धनगर समाजात नाही ही एक धनगर समाजासाठी शोकांतिका आहे अस म्हणावे लागेल. आता आपल्या समाजासाठी, देशासाठी लढण्याची जबाबदारी तुमची-आमची आहे आणि शेवटी मी एवढेच म्हणेन "चल उठ आणि लढायवा सुरुवात कर"...

लेखक: संजय रा. कोकरे रा. अंबाडा, ता. मोर्शी, जि. अमरावती मो.नं. ९५६१७३०१८९

0 comments: