Friday, January 9, 2015

धनगर आरक्षण- नागपूर अधिवेशन

यलकोट यलकोट जय मल्हार चा गगनभेदी नारा देत महाराराष्ट्राच्या कानाकोपर्यातील धनगर बांधव व महिला भगिनी गल्यात पिवला रूमाल टाकून नागपुरच्या धनगर अधिवेशनात सामील झाला बघता बघता मैदान खचाखच भरले जिकडे तिकडे फक्त पिवले वादल
मंचावर डॉ विकास महात्मे व त्यांची टीम विराजमान होती सुत्रसंचलन सौ डॉ सुनिता महात्मे यांच्याकडे होते तर धनगर आमदार रामराव वडकुते रामहरी रुपवनर गणपतराव देशमुख गृहमंत्री ना रामजी शिंदे तसेच ना संजय राठोड व आमदार चैनसूख संचेती उपस्थित होते 

सर्वाच्या नजरा मुख्यमंत्री ना देवेद्र फडवणीस यांच्या आगमनाकडे होत्या त्याआधी लोकबंधु महादेव जानकर यांचे मंचावर आगमन होताच टाल्याच्या कडकडात त्यांचे स्वागत झाले तर युवा वर्गात नवचैतण्य निर्माण झाले
मंचावर विराजमान बांधवाकडून धनगर आरक्षणाबरोबर  विविध ठराव मांडण्यात येत होते
त्यापैकी मांडण्यात आलेले काही ठराव
१ धनगर आरक्षणाची एक महिण्यात किंवा एक दिवसात मुख्यमंत्री यांनी अमलबजावणीची घोषणा करावी
२ अहमद नगर जिल्ह्याचे नाव अहील्यानगर करण्यात यावे
३ पुण्यश्लोक अहिल्यादेवी महामंडलासाठी शासनाने ५००कोटी रुपयाची तरतूद करावी
४ विकास महात्मे यांना राज्यसभेवर खासदार म्हणून घेण्यात यावे
५ सोलापुर विद्यापिठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे नाव देण्यात यावे
यासह आणखी ठराव मांडण्यात आले पंरतु समयसुचकता लक्षात घेवून ४क्रमांकाचा ठराव वगलता सर्व ठराव उपस्थित बांधवाकडुन मंजूर करुण घेतले
महादेव जाणकर यांच्या तडाखेबाज भाषणामुले थंडीचे वातावरण गरम झाले होते
शेवटी बारामती आरक्षण आंदोलन व लोकसभा व विधानसभा निवडणुकीत
मुख्यमंत्री मा ना देवेंद्र भाऊ फडवणीस यांनी धनगर समाजाला दिलेल्या आश्वासनाची व्हीडीओ क्लीप तसेच ह्वाईस क्लीप लावलेल्या स्क्रीनवर प्ले करुन आठवण करुण दिली यावर मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांनी सांगितले कि मी दिलेल्या आश्वासनावर महायुती ठाम असून काही नेत्यांनी दोन्ही निवडणुकीत पाणीपत झाल्यांतरही धनगर व आदिवासी समाजात आरक्षणावरूण गैरसमज निर्माण करण्याचा कुटील कट रचण्यात येत आहे
धनगर आरक्षण बाबत पंधरा दिवसात बैठक घेवून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल तर २ अहमद नगर जिल्ह्याचे नाव अहील्यानगर करण्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल
३ पुण्यश्लोक अहिल्यादेवी महामंडलासाठी शासन अर्थ मंत्र्यांशी चर्चाकरुन  वाढीव निधी देण्याचा प्रयत्न करू
५ सोलापुर विद्यापिठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे नाव देण्यासाठी सरकार कटिबध्द आहे
असे सकारात्मक आश्वासन देण्यात आले 
ऐकुणच अधिवेशनातुन पुन्हा धनगर समाजाला आरक्षण अमलबजावणीचे आश्वासन दिल्याने समाजात तातपुरते समाधान दिसून आले तर युवा वर्ग नाराजी प्रकट करत होता
कार्यक्रमात डॉ लोंढे यांच्या पुस्तकाचे तर अँड कोकणे यांच्या साप्ताहीकाचे मुख्यमंत्री यांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले कार्यक्रमाला विजय गावडे अशोक चोरमुले रामेश्वर पाटील शशीकांत तंरगे अशोक तारडे रामभाऊ लांडे डॉ प्रभाकर लोंढे संगीता डोके डॉ संतोष महात्मे काका मोठेदेसाई प्रा दोडतोले मोहन जानकर श्रीधर गोरे संजय कोकरे सतीष देवकते सुखदेव मंडलीक राजेंद्र लबासे मूकेश गाडेकर अप्पासाहेब आव्हाड नवनाथ आव्हाड शिवनाथ लांडे गणेश लोहकरे अर्जुन लोहकरे अशोक लांडेअंबादास बोंद्रे जय खरात बालासाहेब तारडे संजय बेवले कैलास शिंगाडे भाऊलाल दिवटे सचिन खरात शिवा दिवटे 
रामदास गुरव गजानन गमे आदी सह समाज बांधव मोठ्या निर्णायक संख्येने उपस्थित होता
👭👫👫👫👫👫👫
 कार्यक्रमाची सांऊडसिस्टीम व्यवस्था उत्तम होती मात्र मैदान छोटे त्यात मंडपही कमी टाकण्यात आल्याने काही बांधव उन्हात बसुन कार्यक्रम बघत होते 
एकदंरीत नागपुर शहरातील वर्धा रोड परिसर पिवलामय दिसत होता
तर धनगर साहित्याचे स्टॉल नसल्याची उणीव तिथे भासत होती
     शब्दरचना -रामभाऊ लांडे

टीप यात कुणाचे नाव टाकायचे चुकून राहिले असल्यास क्षमस्व आपले नाव अँड करून ही माहीती पुढे फॉरवर्ड करा

0 comments: