Friday, January 9, 2015

🌼सत्कार स्वीकारणारे सुपात ! सत्कार करणारे, मेळाव्यामधे भाषण ठोकणारे जात्यात !! तर समाज गोत्यात येणाऱ्या काळाकडे वाटचाल !!! 🌼

बहूचर्चीत नागपुर सत्कार मेळावा सुंदर झाला ! विरोधाभास निर्माण होऊनही समाजाने ठरवून घेतले काहीही करा परंतु आरक्षणापासून अता आम्ही माघार घेणार नाही !! पोटात एक व ओठात दुसरे असणाऱ्या पक्षांच्या भुमिका अता तो ओळखुन आहे ! अधिवेशनात निर्माण झालेला संभरंभ दूर करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी नागपुर च्या मेळाव्या प्रयंत वाट पाह्याला लावली हे खटकणारे होते ! त्यामुळे त्यांना क्लीपस दाखवुन आठवण घट्ट केल्याचा आनंद समाजाने लुटला !! सद्याच्या स्थीतीत विरोधी पक्षांनी आपली भुमिका निभावली असेच म्हणावे लागेल कारण शरद पवारांनी
नेहमी प्रमाणे जे बोलायचे ते करायचे नाही या यूक्तीप्रमाणे राजकिय आरक्षणासहीत सदनाबाहेर प्रतिक्रिया दिली होती ! ईतकेच काय मंञिमंडळाचे प्रमुख असल्याप्रमाणे स्वताः च्या लेटर पँडवरही पंतप्रधानांना  पञ पाठविले ! काँग्रेस अजूनही झोपी चे सोंग घेत आहे परंतु रामहरी रुपनवर साहेबांनी लीड घेतली एवढेच समाधान ! समाजातील युवक दिलसे मनसे च्या मागे धावूनही त्याने नाक मूरडले त्यामुळेच की काय त्यांचि दुकानं बंद पडत आहेत ! येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात म्हत्वाची भुमिका निभावणार्या रा.स.प.ने तर मूख्यमंञी महोद्यांना ईशाराच दिला की आपला लोकं अजीत पवार करु शकतात ! निर्णय राजकिय असल्यामुळे स्थिती मांडली !

मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी प्रतिक्रिया आम्ही आरक्षण देणारच अशीच धुमधडाक्यात मांडली ! सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला !! परंतु जबाबदारी सरकारची नसून कृती समिती वर सोपवली हे आम्हाला कळलेच नाही !!! पहिल्यांदाच अँडव्होकेट जनरलचे नाव ऐकणार्यांचा यात काय दोष ? म्हणजे काय म्हणाले आम्ही (सरकारने ) काहीच अभ्यास केलेला नाही ! आमची जबाबदारी ही नाही !! तुम्ही अभ्यास केलेला आहे , तुमच्या कडे पुरावे आहेतच ते तुम्हीच सरकारला सल्ला देणार्या वकिलाला दाखवा कि तुम्ही कसे आदिवासी अहात ! मी फक्त त्याच्याशी तुमची भेट घालून देतो ! तो जर म्हणाला हे कायद्यात टिकणार नाही तर जबाबदारी तुमची !! म्हणजे मी मुलगा दाखवतो तुमची मुलगी मुलाला पटली नाही तर माझा नाईलाज ! असा एकंदर त्यांच्या म्हणण्याचा अर्थ ! म्हणजे क्लीपस दाखवुन , लेखी अश्वासनाचे पञ दाखवून व उपोषण सोडताने बेंबीच्या देठापासुन बोंबलला त्याची थोडीशी लाज न ठेवता तुमचं तुम्हीच बघा हे ऐकण्यासाठी यांचा आपण सत्कार ठेवला होता का ? तसेच हिवाळी अधिवेशनात उपस्थित झालेल्या प्रश्नाचा , आदिवासी विकास मंञ्याच्या विधानाचा अभ्यास मुख्यमंत्री महोदयांनी मेळाव्याला येईपर्यंत केलाच नाही असा घ्यायचा का ?

अदिवेशनाच्या काळात अभ्यास करायला वेळ मिळणार नाही म्हणुन मोर्चा काढू नका असे म्हात्मेंना मुख्यमंञ्यांनी विंनती केली होती असे मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः च सांगितले व नंतर मेळावा घेण्यास सांगितले , त्यानंतर ही अतापर्यंत वेळ मिळाला नाही का ? मग दुसर्याच दिवशी आदिवासी मंञि सावरांनी दुसर्यांदा जाहीर विरोधी भूमिका अभ्यास न करता व ती मुख्यमंञ्यांच्या परवानगीशिवाय शिवाय केडरबेस पार्टीत घेतली जाऊ शकते का ? असे अनेक यांच्या नियतीवर शंका घेणारे प्रश्न निर्माण होतात ! हीच गोष्ट मराठा समाजाच्या आरक्षणात कोर्टाने फटकारुनही पुढे रेटल्याचे दाखवले जाते यावर सरकार मधील एखादा मंञि जाहीर विरोधी भुमिका घेतल्यावर फडणवीस व आर.एस.एस. ने काय केले नसते !! ? मिञांनो हा सर्व प्रकार रेणके आयोगातून तिसऱ्या सुचीकडे नेणारा आहे !!! हे सुर्य प्रकाशाएवढे स्वछ दिसत आहे ! कारण ते देणारच म्हणतात व देतीलच यात शंकाच नाही परंतु आदिवासी त दिले तर होळकरांची औलाद कुणालाही राजगादीवर त्यांना विचारल्याशिवाय बसू देणार नाही हे त्यांना पुरते ठाऊक आहे ! याबाबत पवार व गडकरी फडणवीस यांचे एकमत आहे ! कारण तुमचे २० ते २५ आमदार राखीव जागेवर व अता १० वर्षात ओपनच्या जागेवर २० ते २५ आमदार निवडुन आणण्याची ताकद यांची साक्षरते मुळे होईल ही भिती त्यांना सतावते आहे  !!!

म्हणजे आपण तीन महीन्यापूर्वी जिथे होतो तिथेच आहोत ! बदल फक्त एकच झालेला आहे दोन्हीही कृती समितीतील ७५ % पुढारी भाजपाने आपल्या गळाला लावून ठेवलेले आहेत ! व त्यात त्यांचे काही गैर आहे असे मी मानत नाही ! कारण जाणाराला सर्वानाच राजकारणात येऊन आपले करियर करण्याचा अधिकारही आहे ! तेव्हा दोन्हीही कृती समीतीने बारामती व नागपुर हे कार्यक्रम म्हणजे समाजाचा अमच्यावरच विश्वास आहे असे मानुन हुरळून न जाता जमीनीवर पाय राहू द्यावेत !! व परिषदेच्या नावावर सत्कार मेळावे घेऊन त्याला समाजाचा वेळ, ताकत व बुध्दी खर्च करण्यापेक्षा एकच कृती समीती म्हणा किंवा सुकाणु समिती ११ ते १५ समाजातील प्रमुख राजकिय पक्षांचे पदाधिकारी , आमदार , मंञि व तद्न्ं मंडळी घेऊन बनवावी जेणेकरुन सर्व पुढारी व पक्ष समाजाला ऊत्तर देण्यास बाध्य राहतील !!! व एकोप्याने जबाबदारीने काम करतील ! तसेच अता शासनाने आपले ओझे आपल्यावरच टाकलेले आहे तेव्हा २० तद्न्ं व अभ्यासु लोकांचा अभ्यास गट स्थापन करावा . तसेच फक्त वेळोवेळी सल्ला देऊ शकतील अशाही १० ईतर समाजातील किंवा कुठल्याही समाजातील लोकांची नावे शोधून ठेवावीत. या अभ्यास गटाला एक महिन्याच्या कालावधीत डिटेल रिपोर्ट कृती अहवाला सहीत सुकाणु समितिला सादर करण्याची तजविज करावीच लागेल ! यामधे विषयाचे अभ्यासक , वकिल , प्रशासकीय अनुभव असलेली मंडळी यांचा सहभाग असावा . तसेच या रिपोर्ट मधे ऊपस्थित होणारे संभाव्य प्रश्न व त्यांचि ऊत्तरे असाही एक अहवालात भाग असावा . तसेच सरकार मधील आदिवासी व समाज कल्याण विभागात या प्रशनाविषयी काय भुमिका चालू आहे याचीही माहीती काही मदत करणाऱ्यां अधिकार्यामार्फत काढत रहावी लागेल ! केंद्रीय आदिवासी मंञालयांच्या अधिकार्यामार्फत ही काही मदत मिळत असल्यास ती घ्यावी . देशामध्ये २५ वर्षात ओरिसा राज्यातून पटनाईक कुटुंबाने सर्वात जास्त समावेश व अमलबजावणी चे प्रश्न सोडवलेले आहेत ! तेही कशा पदधतीने सोडवले डोळ्याखालून घालायला हरकत नाही कारण कायद्याचा किस काढणारे आपले सरळ असतानेही कोर्टात फसविण्यासाठी प्रोजेक्ट करण्याच्या पदधतीत आपल्याला फसविता कामा नये ! जगामध्ये असे प्रश्न टीम च्या माध्यमातून सोडवले जातात त्यालाच आपण आयोग म्हनु परंतु शासकिय आयोग आपल्याला पसविणारच म्हनुन आपलाच खाजगी  आयोगाप्रमाने काम करायचे . त्यासाठी सर्वात म्हत्वाचे म्हणजे या अभ्यास गटाचा वेळ वाया न जाण्यासाठी अर्थिक तरतूद करावीच लागेल ! यात बैठकिची व्यवस्था , राहण्याची व्यवस्था, नेटवरुन कुठलीही माहीती या साठी काम्पयुटर हताळणारा तज्ञ ई. सर्वच सदस्याला उपलब्ध माहीती एकाच वेळी मेल केल्यावर अभ्यास करुन मिटींगा ठरवणे सोपे होईल . सर्व सविस्तर पल्हाळ लावण्याचे कारण शासन आपल्याला मदत करणारच नाही हे गृहीत धरल्याने आपले कोणते नुकसान होणार नाही ! उलट आपण ईतरांवर कमी अवलंबून राहू !!! व प्रत्येक माणसाला सर्व ज्ञान नसतेच एकञ येऊनच हे होईल !

अॅडव्होकेट जनरल बरोबरची मिटींग एक दिड महिने लांबण्याने आपले काहीही नुकसान होणार नाही मधल्या काळात सुकाणु समितीने शासनाबरोबरच बैठका घेऊन त्यांचीच भुमिका काय आहे हे जाणुन घेण्याचा प्रयत्न करणे जरुरी आहे ! तेव्हा अँडव्होकेट जनरलचा मुद्दा समितीने नामंजुर करुन शासनाची भुमिका जाणुन घ्यावी  जशी मराठा आरक्षणाच्या संदर्भात बैठका घेतल्या ! याकामी सर्वात म्हत्वाचे काम सर्वाना एकञित करुन दोन्हीही बाँड्या स्थापन करण्यासाठी काही सामाजिक मंडळी नी पुढाकार घेणे गरजेचे आहे तेव्हा विजयराव गावडे साहेब तुम्हीच पुढाकार घ्या ! हा लेख लिहिण्याचा हेतू कुणावरही टिका करण्याचा नसुन परिस्थिती चे गांभिर्य लक्षात येण्यासाठी सर्वच संदर्भ घेवुन लिहील्यामुळे कुणाचा नामोल्लेख अल्यास गैरसमज करुन घेऊ नये ! काही चुक झाल्यास माफ करावे !!! 

मोहन जानकर 
पैठण जि. औरंगाबाद 
मो.न. 9130160302

1 comments:

प्रकाश पोळ said...

मोहनराव जानकर आपला अभ्यासपुर्ण लेख वाचला आपण नागपूर अधिवेशनातील मुख मंत्री यांच्या भाषणातील बारकावे याची
अतीशय तर्कसंगत भुमिका विषद केली,व त्याबद्दल धन्यवाद ,
खर तर मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांचा अभ्यास दांडगा आहे, मुख्यमंत्री
विरोधी बाकावर असताना त्यांनी हा
विषय खुबीने विधानसभेत मांडला आहे,गेल्या 10 वर्षा पासून ते धनगर
आरक्षणाचा प्रश्न मांडत आले आहेत
शिवाय ते एल एल बि सुध्दा आहे
तरी सुद्धा मुख्यमंत्री महोदयांना
धनगर समाजाचा आरक्षणा साठी
महाधिवकता यांची गरज का पडलीय
मुख्यमंत्र्याला लीगल मॅटर मध्ये सल्ला हवी असते त्यासाठी सुध्दा
महाधिवकता असतो परंतु धनगर समाजाचा आरक्षणा संदर्भातील
सर्वच बार कवे फडणवीस साहेबांना
माहीती असताना त्यानी कृती समितीला महाधिवकता ची गरज आहे
असं सांगणं म्हणजे या एकंदरीत परीस्थितीवर संशय आल्याशिवाय
रहात नाही,
याचाच अर्थ मुख्यमंत्री महोदयांना आपल्याला आरक्षण द्यायचेच आहे
पंरतु आपल्याला अभिप्रेत असणारं
आरक्षण नाही तर रेणके आयोगाने
दिलेल्या शिफारशी संदर्भातील तिसरी
सूची हेच आहे,आणि तिसरी सूची नको ही धनगर समाजाची स्पष्ट भूमिका राहिलेली आहे,तिसऱ्या सूचित जर का धनगर समाजाचा समावेश केला तर यानंतरच्या तिस वर्षात धनगर समाजाचा कुठलाही फायदा होणार नाही, तसेच शरद पवार यांना धनगर समाजाला राजकीय आरक्षण मिळू नये असे
मनोमन वाटते ते सुद्धा धनगर समाजाचा विरोधात खुप मोठया Activities या काळात करण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच
आप आपसात भांडण लावण्यात येवू शकतात तसेच आदिवासी विरूद्ध धनगर असा नेहमीच्या पद्धतीने सुरू करू शकतात
आज केंद्रात 60 खासदार आदिवासींचे आहे तसेच 24 आमदार राज्यात आहे हया बाबी सुध्दा नाकारता येत नाही,
तसेच स्वजातीला आरक्षण देण्याची
मागणी जेव्हढ्या तत्परतेन ना,तावडे व ना खडसे यांनी दाखवली तेवढी तत्परता हे दोघेही धनगर समाजाबाबत का दाखवत नाही ?हा सुद्धा कळीचा मुद्दा आहे,उलट ऊठसूट
ना ,खडसे तिसर्‍या सूची ची वक्तव्य जाहीर माध्यमातून करीत आहेत
कुठल्याही जमातीच्या आरक्षण संदर्भात आजपर्यंत शासनाने एवढे
आयोग नेमले नसतील तेवढे आयोग
आजपर्यंत धनगराच्या साठीच का ?
कालेकरर आयोग पासुन तर रेणके आयोगा पर्यत कधी नव्हे तेवढे आयोग
फक्त धनगरा साठी तयार झाले आहेत
आणि ते सर्व आयोग कचरा कुंडीत गेले आहे आजपर्यंत 11 आयोगाची
स्थापना सरकारने केली तरीही 12 वा
आयोगाची स्थापना आपण सर्वांनी मिळून हाणून पाडला
मराठ्यांचे व मुसलमान यांच्या आरक्षणाला कुणीही विरोध के ला
नाही तर धनगराचा आरक्षणाला प्रत्यक्ष विरोध आदिवासी करीत आहेत तर अप्रत्यक्ष पणे सर्वच समाज
आपल्याला विरोध करून आदिवासी
समाजाला छुपा पाठिंबा देत आहेत
आणि आपण ओरडत आहोत ,सावरा ला आवरा ,आपल्या आरक्षणा च्या मागे खुप मोठे जर विरोधी धोरण आहे अस मला वाटतं ,
आता मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्ट पणे सांगण्याची हिच योग्य वेळ आहे,
मुख्यमंत्री महोदय आपण हुशार आहात आपल्या ला कायदाचा पुरेपुर अभ्यास आहे धनगराच्या आरक्षणाचा
प्रश्नाची जान आपल्याला आहे आपण
एल एल बि सुध्दा आहात खर तर आपल्याला आमच्या प्रश्न साठी महाधिवकता ची गरज नाही ,आता महाधिवकता सोबत आपणच बोलाव
राज्याच्या सूची मध्ये कुठेही धनगर नाही , आपण च आता हे काम करा
आमच च घोंगडं आमच्या खांद्यावर
देवू नका ,

साहेब आमचा समाज पण आता अडाणी राहिलेला नाही 4 जानेवारी ची आपली खरी परीक्षा होती ती आपण
पास झालात पण आता तुमची ही शेवटची परिक्षा आहे ही परीक्षा पण आपल्याला पास करायची आहे
कारण आमच जे हक्काच आहे आणि
न्याय संगत आहे तेच आम्हाला हव आहे ,महणून यानंतर आपण व आपल्या सरकारने आमची फसवणूक
करणारी भुमिका घेवू नये अस मला
मनोमन वाटते तिसरी सूचीची मागणी
आमची कधीच नव्हती आणि नाही सुद्धा
आपल्या मंत्री मंडळातील आपल्या
सहकार्यंनी वारंवार धनगराच्या आरक्षणाचा संदर्भात तिस रया सूचीचा उल्लेख करू नये,कारण ती
आमची मागणी नाही??

तसेच मा डॉ महात्मे साहेबांनी जी
मागणी अधिवेशनात जोर धरून लावून धरली वमुख्यमंत्री महोदयांनी
निवडणुकीत केलेल्या आश्वासन ची आठवण करून दिली खरच डा महात्मे सरांच्या कामाला मी एक सामान्य कार्यकर्ती महणून सलाम करते
व माझ्या लिहिण्यात काही चूका झाल्या असतील तर मला मोठ्या
मनाने माफ करा हिच माफक अपेक्षा

आपली सामान्य कार्यकर्ती
संगीता ढोके अमरावती 🙏🙏