Monday, June 30, 2014

मा. मधुकरजी पिचड आणि मा. वसंत पुरके साहेब यांना खुलं पत्र

प्रती,
मा. मधुकरजी पिचड
मा. वसंत पुरके
व ईतर मान्यवर आदिवासी नेते,
सप्रेम जय मल्हार !

 
पिचड साहेब आपले नेते शरद पवार यानी   आष्टा (सांगली ) येथे व परवा चौंडी (नगर) येथे त्यांच्या उपस्थितीत आपण स्वत: विद्यमान आदिवासी  आरक्षणाला धक्का न लावता भारतीय घटनेप्रमाणे
धनगर आदिवासी हक्काची आमलबजावणीस सहकार्य करणेचे मान्य केले आसता आज अशी उलटी भूमिका का ? आपल्यावर दबाव टाकणारे बोलवते धनी बारामतीत लोकसभा निवडणुकित धापा टाकत कसे बसे जिंकले आहेत या मध्ये हे आरक्षण आम्हीच देऊ शकतो असा समज अनेक धनगर नेत्यांचा केला त्या धनगर नेत्यांचा बारामती तालुक्यातील ९०००० मताधिक्यात सिंहाचा वाटा आहे तरी ते आपला बुध्दिभेद करत आहेत हे आता समस्त धनगर समाज जाणतो !

हजारो वर्षाच्या सामाजिक चढउतारत ज्या समाज
घटकाना अस्पृश्य मानल जाऊन त्याना विकास प्रक्रिये पासून दूर ठेवल गेल त्या अस्पृश्य जाती भारतीयघटनेत  SC मध्ये तर ज्या जमाती लाजरे बुजरेपणामुळे या विकास प्रक्रियपासून दूर राहिल्या त्या जमती ST मध्ये समाविष्ट केल्या आहेत

   आरक्षण हे केवळ गरीबी हटवणेसाठी नसून या जाती व जमातीना सामाजिक न्याय ,मान ,सन्मान मिळावा त्याना राष्ट्रविकासात आपला हाक्क आधिकार जे हजारो वर्षे नाकारले ते देणेत यावेत हा मुख्य  उद्देश आहे .

  धनगर ही आशीच पांढरे कपडे घालून येणार्या पांढरपेश्या लोकाना आजही मासाळवाडी वा लवासा सारखे घबरणारी जंगल ,माळरानातील निर्भय जमात आहे .कोकणात धनगराचे केवळ वासाने वाघ पळुन जातो असा आजही समज आहे .ईतर आदिवासीप्रमाणे धनगर निसर्गपुजक आहेत .त्यांचे देव हे शेंदुर लावलेले दगडगोट्याचेच आहेत ते कोरीव नाक तोंड डोळे आसलेले नाहित .ईतर आदिवासीप्रमाणे धनगर समाजचे सामूहिक नृत्य आहे त्याला गजनृत्य म्हणतात .प्रचंड अंधश्राद्धा,देवभोळेपणा या समाजात आढ़ळतो .ईतर आदिवासी प्रमाणे धनगर समाजाचे भगत वा पुजारी हे त्याच समाजातील आसतात .नागरी समाजातील पुरोहित ,ब्राम्हण वा गुरव येथे आढ़ळत नाहित .धनगरी स्त्री पुरुषांची स्वतंत्र वेषभूषा आढळते.हां समाज आपल्या लाजरया बुजरया स्वभावामुळे आजही शहरात कळपाने राहतो .मोठ मोठ्या सामाजिक संस्था ,पक्ष  संघटना ,या मध्ये हा वर्ग कुठेच दिसत नाही.

  या सर्व बाबींचा विचार करून या जंगलातील भटक्या आदिवासी समाजास घटनाकारानी त्या त्या राज्याच्या ST म्हणजे आदिवासी यादीतच समाविष्ट केले आहे .
 मधुकर पिचड, वसंतराव पुरके वा अन्य ईतर आदिवासी नेत्यानी ही बाब समजुन घ्यावी .धनगर समाज हा आधीच आदिवासी व त्यात भटका त्या मुळे आधीच माकड त्यात मद्य प्याला अशी दयनीय अवस्था  झाली आहे .

    एकर ,ओरिसा ,तिवारी ,बलराम जाखर हे शब्द हिंदीत एकड़ ,ओड़िसा तिवाड़ी वा बलराम जाखड आशेच र एवजी ड हा शब्द घेउन लिहिले जातात.त्यामुळे मुळ आर्थ बदलत नाही.

 तसेच धनगर आदिवासी जमातीचा ST यादीत उल्लेख धनगड असाच झाला आहे हे सर्व जंगल रानोमाळच्या भटक्या समाजास १९८० सालापर्यंत कळलच नाही हे दूरदैव .कारण जरी धनगर सुसंस्कृत आसला तरी भटका असलेमुळे  निरक्षरच होता हे आपण समजुन घ्यावे ही धनगर समाजाची केविलवाणी कळकळीची विनंती आहे .
 आजअखेर या नागरी समाजाला समजावणेत स्वातंत्र्याची ६५ वर्ष गेली किती मोठी विकासाची दार केवळ लेखनिकाचे चुकीमुळे या समाजाला वंचित ठेवले आहे विचार करा कारण आपण समदुखी आहोत .आपण लवकर समजू शकाल .आज ज्यांची आदिवासी म्हणून आमलबजावनी होते त्याला धक्का न लावता ,तुमच आरक्षण सुरक्षित ठेउन NT-A, NT-B प्रमाणे मार्ग काढू या .देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदीनी घटनेत समाविष्ट आसलेले धनगरांचे आदिवासी हक्काची आमलबजावणीबाबत प्रचार केला आहे .महायूतीने सामाजिक न्याय या खाली धनगर आरक्षण आमलबजावणी चे मा देवेंद्र फडणवीस व सेनेचे मा सुभाष देसाई यानी आम्हाला लेखी दिले आहे .राज्यातील १२%धनगर समाजाचा विकासाच मार्ग उघडतो आहे .धनगर व ईतर आदिवासी वेगवेगळया भागात सुदैवाने एकवटले आहेत त्यामुळेआपले राजकीय भविष्य देखिल धोक्यात येणार नाही .राजकीय आरक्षण भागवार एकमेकाला आड़थळा होणार  नाही असे ठरवता येईल. आम्ही हे आरक्षण आता या लबाड़ाना दूसरा जोराचा  धक्का देऊन नक्की मिळवनार आहोतच आम्ही आज कोणाला जिंकवायचे व् कोणाला नाही या स्थितीत नक्की आलो आहोत हेही आपण हा विरोध करताना ध्यानी घ्यावे .  सत्या असत्यता न पहाता  ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी हे बर नव्हे "सत्यमेव जयते " हा प्राचीन संदेश विसरु नका .या आदिवासी हक्क आमलबजावणी मध्ये कायदेशीर लोकशाही मार्गाने होणारे लढाईत जे सोबत येतील त्यांच्यासह न येतील त्याना सोडून व विरोधात येतील त्याना राजकीय दृष्टया संपवून ही लढाई आम्ही जिंकणारच !

 आपले पुतळे जाळले , ही मोठी चूकच आहे .पुतळा शरदराव पवार यांचे विचाराचा जाळायला हवा होता कारण तेच तुम्हाला खोटी भीती घालत आहेत त्याबद्दल क्षमस्व !

संवादाने ५०%प्रश्न सुटतात हे आपण जाणता तरी या कळकळीची विनंती करणारया भारतीय धनगर परिषदेच्या खुल्या पत्राचा आपण सहजीवी आसल्याने सहानभूतीपूर्वक विचार करून या धनगरांचे आदिवासी हक्क आमलबजावणी कार्यात कोणाचही उलट सुलट न ऐकता मदत करून या भोळया भाबड्या समाजाचा दुवा घ्यावा .आपल्या विद्यमान आरक्षणास कोणताही धक्का न लावता हा प्रश्न सोडवणेचा प्रयत्न करू.

आपला मातृभुमीच्या सेवेतील सहकारी
          विजय ग गावडे ,
महासचिव ,भारतीय धनगर परिषद
         ७५८८१६७०३४

0 comments: