महाराष्ट्रातील विस्मृतीत गेलेले एक प्रतिभावंत साहित्यिक, रानकवी - यशवंत तांदळे यांच्याविषयी माहिती देणारा श्री. रघुराज मेटकरी लिखित लेख :
पृथ्वीमातेला पडलेले एक निरागस स्वप्न म्हणजे रानकवी यशवंत तांदळे. १९७६ साली ५१वे अखिल भारतीय साहित्य संमेलन कराड येथे भरलेले होते. या संमेलनात सहभागी व्हायला अनेक साहित्यिक जमलेले. या झकपक साहित्यिकांच्या गर्दीत मळकट धोतर, मळकट पांढरा शर्ट व लाल भडक मुंडासे आणि खांदयावर घोंगडे अशा अवस्थेत एक अडाणी धनगर व्यासपीठाजवळ आला. आणि "मला एक कुंडका म्हणू दया" अशा विनंत्या करू लागला. पण त्याच्याकडे लक्ष देते कोण ? संयोजक, निवेदक आपापल्या नादात गर्क. पण समोर